खरं प्रेम तेच आहे जे आयुष्याच्या सुरुवातीलाच नाही तर शेवटपर्यंत सुद्धा तसेच राहते. जेव्हा आपण कोणासोबत लग्न करतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत सात जन्मापर्यंत सोबत राहण्याचे वचन देतो. खरंतर, हे वचन निभावण्यात प्रत्येक जणच यशस्वी होतोच असे नाही. अनेकदा असं दिसून आले आहे कि, सुरुवातीच्या काळात नवरा बायकोत खूप प्रेम असते. परंतु जसे जसे वर्षे पुढे जात राहतात तसे त्यांचे प्रेम सुद्धा कमी होत जाते. काही जोडपे तर एकमेकांसोबत फक्त फॉरमॅलिटीसाठीच राहतात. तर काही जोडपे लग्ना अगोदर जगावेगळे प्रेम देतात आणि लग्नाच्या काही वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. असं बोललं जातं कि प्रेमाला वय नसतं. खरंतर, अस्सल प्रेम तर अश्यातच आहे कि, वेळेची कोणतीच सीमा तुमच्या प्रेमाला कमी करू शकणार नाही. मग त्या प्रेमाला कितीही वर्षे का होईना.
अश्यातच आज आम्ही तुम्हांला एका अश्या वयस्कर जोडप्याला भेटवत आहोत, ज्यांचा एक सुंदर फोटो लोकांचे हृदय जिंकत आहे. खरंतर, ह्या सुंदर फोटोला कोलकाताच्या मेट्रो स्टेशनवर क्लिक केले गेलेले आहे. ह्या फोटोला रिषी बाग्री नावाच्या व्यक्तीने शेअर केले आहे. ह्या फोटोत एक वयस्कर महिला खूपच प्रेमाने आपल्या वयस्कर पतीच्या गळ्यात मफलर बांधताना दिसत आहे. अजून एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, जेव्हा त्या असं करत आहेत तेव्हा त्यांच्या पाठीमागे एलआयसीची जाहिरात ‘खुशियों की शुरुआत और जिंदगी भर का साथ’ दिसत आहे. अशामध्ये हि जाहिरात ह्या फोटो आणि सुदंर क्षणाला अजूनच खास आणि अर्थपूर्ण बनवते. एका यशस्वी आणि सुखी वैवाहिक जीवनात ‘काळजी घेणं’ सर्वात जास्त महत्वपूर्ण भूमिका निभावते. तुमचा जीवनासाठी कितीही सुंदर असो, कितीही पैसे कमावत असो ह्यामुळे काही खास फरक पडत नाही. जी गोष्ट खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण असते ती म्हणजे तुमच्या जीवनसाथीला तुमची किती काळजी आहे आणि ती व्यक्ती तुमची किती काळजी घेते. जीवनसाथी कडून जेव्हा कोणत्याही स्वार्थाशिवाय ‘केयरिंग’ आणि प्रेम मिळते तेव्हा मन असंच भरून येतं. नंतर हे प्रेम दिवसागणिक अजून मजबूत होत जाते.
सोशिअल मीडियावर सुद्धा लोकांना हा फोटो खूप पसंत पडत आहे. हा फोटो पोस्ट होताच लगोलग वायरल सुद्धा झाला. ह्या फोटोला हजारोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. लोकांना ह्या वयस्कर जोडप्याची जोडी खूप आवडत आहे. ते ह्या फोटोपासून प्रेरित सुद्धा होत आहेत. तर दुसरीकडे अनेक जण ह्या जोडीला खूप मोठे आयुष्य लाभो म्हणून प्रार्थना सुद्धा करत आहेत. खरंच हा फोटो आपल्याला नकळत खूप काही शिकवत आहे. आपल्याला आयुष्यातील ह्या छोट्या परंतु महत्वपूर्ण क्षणांची किंमत सांगून जातो. तसे तुम्हाला हा फोटो कसा वाटला, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सोबत तुम्ही इतरांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे प्रत्येकजण ह्यामुळे प्रेरित होऊन एक प्रेमाने भरलेले आयुष्य जगू शकेल. एक गोष्ट तुम्ही सुद्धा आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा कि, तुमच्या पार्टनरची साथ कधीच सोडू नका. त्याची काळजी घ्या. ह्यामुळे तुम्हां दोघांच्या प्रेमात कोणतीच कमतरता येणार नाही. मग काय माहिती, कदाचित ह्या जोडप्यासारखं तुमचे प्रेम सुद्धा एक दिवस सोशिअल मीडियावर वायरल झालेलं असेल.