Breaking News
Home / बॉलीवुड / बघा किती कोटींची मालकीण आहे श्रद्धा कपूर, एका चित्रपटासाठी घेते तब्बल इतके मानधन

बघा किती कोटींची मालकीण आहे श्रद्धा कपूर, एका चित्रपटासाठी घेते तब्बल इतके मानधन

श्रद्धा कपूर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता शक्ती कपूर ह्यांची मुलगी आहे. श्रद्धाच्या आईचे नाव शिवांगी कोल्हापुरे आहे. श्रद्धा ने बॉलिवूडमध्ये २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ चित्रपटातून पर्दापण केले होते. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. परंतु ह्या चित्रपटातील श्रद्धाने केलेल्या कामाचे कौतुक झाले होते. ह्यानंतर श्रद्धा ‘लव्ह का दि एन्ड’ नावाच्या चित्रपटात दिसली होती. परंतु हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. श्रद्धाला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती म्हणजे ‘आशिकी २’ ह्या चित्रपटापासून. ह्या चित्रपटामुळे तिची बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तुलना होऊ लागली. त्यानंतर मात्र श्रद्धाने कधी मागे वळून पाहिले नाही. आणि एकापाठोपाठ एक चित्रपट करत गेली.

सध्या श्रद्धाजवळ अनेक चित्रपटांचे प्रोजेक्ट्स आहेत. अशामध्ये तिची सध्या बॉलिवूडमध्ये कमाई सुद्धा चांगलीच होत आहे. चित्रपटांशिवाय श्रद्धा ब्रॅण्ड्सचे प्रमोशन करून सुद्धा खूप पैसे कमावते आहे. श्रद्धा एक चांगली अभिनेत्री होण्यासोबतच एक चांगली गायिका सुद्धा आहे. तिने आपल्या चित्रपटांत ‘तेरी गलिया’ आणि ‘बेजुबान फिर से’ सारखी हिट गाणी गायली आहेत. ३ मार्च १९८७ ला जन्मलेली श्रद्धा ३३ वर्षांची आहे. ती आज एक यशस्वी मुलगी आहे. ३३ वर्षाच्या वयामध्येच श्रद्धा करोडो रुपये कमावते. चला तर तिची एकूण संपत्ती किती आहे ते पाहूया. सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाचे एकूण नेट वर्थ ५७ कोटी रुपये आहे. ती आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी तब्बल ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये श्रद्धा कपूरच्या एकूण संपत्तीत ७२ टक्के वाढ झालेली आहे. हा आकडा २०१८ चा आहे. श्रद्धा ला लग्जरी गाड्यांची सुद्धा आवड आहे. तुम्हांला हे जाणून आश्चर्य होईल कि, श्रद्धा कपूर जवळ ९० लाखांची स्वानसी मर्सिडीज एमएल क्लास एसयूव्ही सुद्धा आहे.

श्रद्धा चॅरिटी मध्ये सुद्धा विश्वास ठेवते. ती वेळेवेळेला अनेक सामाजिक कार्य सुद्धा करत असते. चित्रपट, जाहिराती आणि गायिका ह्या शिवाय श्रद्धा लाईव्ह शो मध्ये परफॉम करून सुद्धा पैसे कमावते. श्रद्धा जर कोणत्या फॅशन शो मध्ये जाते किंवा कोणत्या शॉप चे ओपनिंग करते तेव्हा त्याचे सुद्धा वेगळे चार्जेस घेते. श्रद्धाचे चे टॅलेंट इथेच नाही संपत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल कि, श्रद्धा जेव्हा बारावीला होती तेव्हा तिला ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. तिच्या आईवडिलांना वाटत होते कि श्रद्धा शिक्षिका बनावी, परंतु श्रद्धाला अभिनेत्री व्हायचे होते. श्रद्धा काही दिवसांअगोदरच ‘स्ट्रीट डान्स ३ डी’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. ह्यानंतर श्रद्धाने ‘बागी ३’ मध्ये टायगर श्रॉफ सोबत काम केले. हा चित्रपट सुद्धा खास कमाल दाखवू शकला नाही. श्रद्धा ने काही काळापासून हिट चित्रपट दिलेला नाही आहे. परंतु असे असूनही तिच्या स्टार पावर वर ह्याचा जरा सुद्धा फरक पडलेला नाही आहे. तिला चित्रपटसुद्धा खूप मिळत आहेत आणि ती कमाई सुद्धा खूप करत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.