Breaking News
Home / मनोरंजन / बघा किती छान म्हणते हि मुलगी ‘शुभं करोति कल्याणम्’, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा देखील दिवस बनून जाईल

बघा किती छान म्हणते हि मुलगी ‘शुभं करोति कल्याणम्’, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचा देखील दिवस बनून जाईल

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, घडवावा तसा तो घडतो अस म्हणतात. याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा येत असतो. काही वेळा स्वानुभवातून तर कधी कधी इतरांच्या अनुभवातूनही हे खरं असल्याचं जाणवतं. किंबहुना आपल्या संपूर्ण आयुष्यावर आपल्या बालपणाचा खूप मोठा प्रभाव असतो हे आपण स्वतः पालक झाल्यावर जास्त उमगायला लागतं. त्यामुळे आपसूक आपल्याकडील उत्तमोत्तम संस्कार, शिकवण ही आपण आपल्या पाल्यांना देत असतो.

बरं ही मुलं लहान असताना त्यांना सगळ्याच गोष्टींचं आकर्षण असतं. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे त्यांना एका जागी बसवून शिकवण तसं अंमळ कठीण कामच म्हणायला हवं. पण त्यांच्या कलाकलाने घेत, त्यांचे मूड सांभाळत आणि वेळप्रसंगी काहीसं दटावत शिकवलं तर ती शिकतात. किंबहुना, त्यांना एकदा एखादी गोष्ट जमायला लागली, त्या गोष्टींचा लळा लागला की मग दटावण बटावण, कशाचीही गरज लागत नाही. फक्त त्यांना थोडीशी सुरुवात करून द्यावी लागते आणि मग त्यांच्या बाललीला पाहणं एवढंच आपलं काम असतं. या सगळ्यांचं अगदी प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय.

हा व्हिडियो खरं तर आपल्या टीमच्या अचानकच बघण्यात आला. पण म्हणतात ना, अनेक सुंदर गोष्टी काही वेळा न सांगता घडत असतात. त्याचा प्रत्यय आमच्या टीमला आज या व्हिडियोच्या निमित्ताने आला. हा व्हिडियो आहे एका लहान निरागस मुलीचा ! लहान म्हणजे अगदीच लहान ! पण वर उल्लेख केलेला तिचा निरागसपणा आपलं मन जिंकून जातो. पण ती असं काय करते? तर ती ‘शुभंकरोती कल्याणम’ ही प्रार्थना म्हणत असते. पण त्याआधी ती तिच्या खेळण्यासोबत खेळत असते. खुश असते. अशावेळी तिच्या कलाने घेत घेत तिच्याकडून शुभंकरोती म्हणून घेण्याची हुशारी तिचे पालक दाखवतात. सुदैवाने याचं चित्रीकरण ते करत असतात आणि हे चित्रीकरण म्हणजेच हा व्हिडियो होय. सुरवात होते तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे तिचं खेळणं सुरू असतं. तेवढ्यात पाठून एक आवाज येतो आणि तिला शुभंकरोती म्हणायला सांगतो. अगदी तिच्या खेळण्याला ही तिने बोलतं करावं अशा आशयाचे एक वाक्य ऐकायला येतं. त्यामुळे तिच्या कलाकलाने घेणं सुरू असतं. याचा परिणाम दिसण्यास ही सुरुवात होते. तिच्या गोड आवाजात ती शुभंकरोती म्हणायला सुरुवात करते आणि आपण मनातल्या मनात तिची दृष्ट काढतो.

आधी तिचं लक्ष केवळ त्या खेळण्याकडे असतं. पण यथावकाश ते लक्ष त्या स्तोत्रावर केंद्रित होतं. मग अगदी मनापासून ती ही प्रार्थना म्हणते. मध्ये एकवेळ अशी येते जिथे थोडेसे शब्द गाळले जातात. पण तिचं वय बघता, आपण याकडे सहज दुर्लक्ष करतो. सोबतच तिची हुशारी पाहून, येत्या काळात यातही सुधारणा होईल असा विश्वास नकळत आपल्या मनात व्यक्त होत असतो. पण या सगळ्यांच्या उप्पर लक्षात राहतो तो तिचा निरागसपणा ! तिचं ते गोड वागणं व्हिडियो संपल्यावरही लक्षात राहत. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असेलच. पण नसेल बघितला तर जरूर बघा. आपल्याला काही आनंदाचे क्षण नक्कीच अनुभवायला मिळतील. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *