लहान मुलांचं कौतुक असणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. लहान मुलं असतातच अशी गोड, लब्बाड, निरागस की त्यांच्या विषयी प्रेम आणि कौतुक हे वाटत राहतंच. इतकं की त्यांनी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा केली तरी त्याचं अगदी घरभर कौतुक होतं. त्यात ही मंडळी जात्याच हुशार असली तर मग हे कौतुक हे वारंवार होतच राहतं. अर्थात त्यात त्यांच्या पालकांच्या हुशारीचा ही कस लागतो. कारण काही वेळा या लहान मंडळींचा शिकण्याचा वेग आणि आवाका वयाच्या मानाने मोठा असतो. त्यामुळे आनंद आणि आश्चर्य वाटायला लावणारे अनेक सुखद प्रसंग हे वरचेवर येत असतात.
बरं हल्लीचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे या अशा प्रसंगांचं चित्रीकरण करण्याचं पालकांमधील प्रमाण हे वाढलं आहे. अर्थात व्हिडियो म्हंटला की तो शेअर होतोच आणि तेवढा मस्त आणि जबरदस्त असेल तर आपसूक वायरल ही होतोच. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या. हा व्हिडियो आहे एका लहान मुलाचा आणि त्याच्या अचाट स्मरणशक्तीचा. बरं हे बाळराजे इतके लहान आहेत की या व्हिडियोतचं स्वतः अनेक छोटी छोटी पुस्तके बघून त्यातील गोष्टींची ओळख करून घेत आहेत.
या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईलच की हा बाळ अगदीच लहान आहे. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर या लहान मुलाचं दर्शन ही झालं असेल. पण त्याच्या स्मरणशक्तीची दाद द्यावी अशीच आहे. कारण हा व्हिडियो सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत दोन मिनिटं आणि काही सेकंद लागतात. या संपूर्ण वेळेत कॅमेऱ्यामागून एक ताई या मुलाशी संवाद साधत असतात. या मुलाची आईच असावी. त्या या बाळाला बोलतं करतात आणि दोन मिनिटांत देशातील राज्यांच्या राजधान्यांची नावे विचारतात. खरं तर शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला हे असे प्रश्न जाचक वाटावेत असेच. तसेच या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या लक्षात राहावीत यासाठी शाळेतील मास्तर किती प्रयत्न करत असतात. तरीही प्रत्येक वेळी उपयोग होतोच असे नाही. पण हे बाळ मात्र अगदी सहजगत्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात यशस्वी होतं. ते ही हा वयात. बरं हे करत असताना बुद्धीला फार जोर द्यावा लागतोय असं ही नाही. त्यामुळे या बाळाचं हे वय, उत्तरांतील सहजता यांमुळे आपण मात्र अचंबित झालेले असतो. या लहान वयात हे कसं काय शक्य आहे असं वाटून जातं. पण ते खरंच शक्य असल्याचं दिसत असल्यामुळे आपण आपसूक या बाळाचं आणि त्याच्या पालकांचं मनोमन कौतुक करतो. यात आपली टीम ही समाविष्ट होतीच.
त्याचमुळे हा व्हिडियो बघून कौतुक वाटलंच. पण केवळ कौतुक वाटून थांबू नये, आपल्या वाचकांना याविषयी कळावं अस मनापासून वाटलं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही या बाळाचं कौतुक वाटलं असेलच. पण आपण हा व्हिडियो अजूनही बघितला नसेल , तर जरूर बघा. आपल्याला हा व्हिडियो आवडून जाईल आणि आनंद देईल. असो.
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :