Breaking News
Home / बॉलीवुड / बघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च

बघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च

आपला पहिला पगार सगळ्यांनाच आठवतो. सामान्य माणसा पासून बॉलिवूडच्या तारकांना जेव्हा त्यांच्या पहिल्या कमाई विषयी विचारले जाते तेव्हा ते खूप आवडीने सांगतात. जरी हे अभिनेते आज बॉलीवूड मधील करोडपती अभिनेते असले तरी एके काळी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. आज नक्कीच या अभिनेत्यांकडे एवढी संपत्ती आहे कि ते जगातील सारे ऐश्वर्य आणि सुख खरेदी करू शकतात. पण एक वेळ अशीही होती कि, ते आपल्या मेहनतीने मिळालेल्या थोड्याशा पैशात पण खुश व्हायचे. आज च्या बातमीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कोणत्या अभिनेत्याने त्यांची पहिली कमाई कशी खर्च केली.

शाहरुख खान
शाहरुख खानच्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. जगात त्यांना बादशाह किंवा किंग खान च्या नावाने ओळखले जाते. एका मुलाखतीत शाहरुख ने सांगितले कि, एकदा त्यांनी जास्त पैसे कमवण्यासाठी गायक पंकज उदास ह्यांच्या कार्यक्रमात काम केले होते. ज्यासाठी त्याला ५० रुपये मिळाले. या पैशानी त्याने ताजमहालचे तिकीट काढले.

कल्की कोचलीन
कल्की कोचलीन बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जरी तिने खूप कमी सिनेमात काम केले असेल परंतु तिची काम करण्याची पद्धत जगाला माहित आहे. एका मुलाखतीत कल्की ने सांगितले कि तिने आपल्या पहिल्या कमाई ने तिच्या घराचे भाडे दिले होते. तिने तिची कमाई किती होती हे सांगितले नाही.

इरफान खान
इरफान खान चे नाव बॉलिवूड मधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. काही महिन्यांपूर्वीच त्याने ह्या जगाचा निरोप घेतला. इरफानने यशाचे शिखर गाठायला खूप मेहनत घेतली आहे. इरफान बॉलीवूड मधील एक असा अभिनेता ज्याला हॉलिवूड मध्येही काम करण्याची संधी मिळाली होती. इरफान ने एका मुलाखतीत सांगितले कि जास्त पैसे कमावण्यासाठी त्याने मुलांचे ट्युशन हि घेतले आहेत. त्यातून त्याला महिन्याला २५ रुपये मिळाले होते आणि त्याने त्या पैशातून एक सायकल घेतली.

अर्जुन कपूर
सध्या अर्जुन कपूर आपल्या सिनेमा पेक्षा मलाईका सोबतच्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत असतो. रोज त्या दोघांबद्दल नवीन बातमी समोर येत आहे. या दिवसात अर्जुन त्याचा शूटिंग मध्ये व्यस्त आहे. अर्जुन ने सांगितले की त्याची पहिली कमाई १८ व्या वर्षी ३५ हजार रुपये होती आणि त्यातून त्याने ‘कल हो ना हो’ चे दिद्गर्शक निखिल आडवाणी ची मदत केली होती.

रणदीप हुड्डा
‘सरबजीत’ सिनेमातून प्रेक्षकांची माने जिंकणारा रणदीप हुड्डा या दिवसात सिनेमाक्षेत्रा पासून दूर आहे. तसेच, रणदीप हुड्डाने ऑस्ट्रेलिया मध्ये एक ऑटो साफ करून पैसे कमावले होते. ज्यासाठी त्याने ४० डॉलर मिळालेले. या पैशानी त्याने एक जार विकत घेतला होता.

ह्रितिक रोशन
ह्रितिक रोशन बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. तो एक सुपरस्टार म्हणून एक उत्तम उदाहरण आहे. ह्रितिक दिसायला सुंदर तर आहेच पण त्यांचा अभिनयसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतो. सध्या आलेला त्याचा नवीन सिनेमा ‘सुपर ३०’ प्रेक्षकांना खूप आवडला. बाल कलाकार म्हणून काम केलेल्या ह्रितिक ला वयाच्या ६ व्या वर्षी ‘आशा’ या सिनेमासाठी १०० रुपयांचे बक्षीस दिले गेले. या पैशानी त्यांनी स्वतःसाठी एक खेळण्यातील गाडी घेतली होती.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *