Breaking News
Home / मराठी तडका / बघा खऱ्या आयुष्यात असे आहेत डॉ अमोल कोल्हे, पत्नी आहेत अध्यापिका

बघा खऱ्या आयुष्यात असे आहेत डॉ अमोल कोल्हे, पत्नी आहेत अध्यापिका

रुबाबदार व्यक्तिमत्व, उत्तम संवादफेक, थेट विचार आणि आचार, ऐतिहासिक भूमिका करण्याची हातोटी, अभिनयाबरोबरच राजकारणातही रस आणि सक्रीय सहभाग आणि तरीही जमिनीवर पाय. हे सगळं वर्णन आहे डॉ. अमोल कोल्हे यांचं. त्यांचा नारायणगावातून सुरु झालेला प्रवास, पुणे-मुंबई शहरांत शिक्षण करता करता आज शिरूरचे खासदार म्हणून चालू आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने अभिनेत्याबरोबरच एक नेता म्हणून लोकांची वाहवा ते मिळवत आहेत. अर्थात आपण त्यांना ओळखतो ते छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज यांच्या भूमिकांसाठी. नाटक, मालिका असं कोणतही माध्यम असो त्यांनी या दोन्ही भूमिका मनोभावे केल्या. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठीत काम करताना हिंदीतही छत्रपति शिवाजी महाराज साकारले. अभिनेता म्हणून जशा या भूमिका ते जगले तसेच निर्मात्याच्या भूमिकेतून या अजरामर व्यक्तिरेखा जगभर जातील हे पाहिलं.

सध्या चालू असलेल्या “स्वराज्य जननी जिजामाता” या ऐतिहासिक मालिकेचेही ते निर्माते आहेत. अभिनेता, निर्माता, नेता या सगळ्या भूमिका करताना कामाचा ताण हा येतोच. खासकरून ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांसमोर मांडताना. त्यातील ऐतिहासिक संदर्भ बरोबर असणं इथपासून ते त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा मान कायम टिकून राहील हे अगदी डोळ्यात तेल घालून पहावं लागतं. अशावेळी खंबीर साथ असल्याशिवाय सतत कार्यरत राहणं कोणत्याही कलाकाराला अशक्य. अशीच साथ लाभली अमोलजींना ती म्हणजे त्यांच्या पत्नी, डॉ. अश्विनी कोल्हे यांची. अश्विनीजी या डॉक्टर असून त्या अध्यापिका म्हणून कार्यरत असतात. त्यांची हि साथ किती अमूल्य आहे जे अमोलजी ओळखतात, किंबहुना ती व्यक्त होते त्यांच्या एका जुन्या इंस्टाग्राम पोस्ट मधून. हि जोडी नेहमीच स्वतःच वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवताना दिसून आली आहे.

पण, या पोस्ट च्या निमित्ताने अमोलजींनी आपल्या भावना मात्र नक्कीच व्यक्त केल्या होत्या. त्यातली शेवटची ओळ म्हणजे, “तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे. तुला वजा केलं तर सगळं व्यर्थ आहे.” या वाक्यातूनच अश्विनिजी यांचा त्यांना आयुष्यात किती खंबीर पाठींबा आहे ते दिसतं. हि पोस्ट जुनी आहे पण दरवर्षी अमोलजी सहा डिसेंबर ला अश्विनीजीं बरोबरचा एखादा फोटो अपलोड नक्की करतात. अगदी आठवणीने, कारण या दिवशी असतो त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यामुळे त्यांच्या नात्यातला समंजस आणि आदरभाव व्यक्त होतो. आज या दोघांना दोन मुलं आहेत. या लॉकडाऊन मध्ये अमोलजी आणि अश्विनीजी आपल्या मुलांना वेळ देताना दिसले होते. तसा फोटोच त्यांनी इंस्टाग्रामवर टाकला होता. पण तसेच ते कोवि डच्या या काळात दोघेही आपापल्या परीने गरजूंना मदत करताना दिसले आहेतच. घराची आघाडी सांभाळताना सामाजिक कामांचा तोल या दोघांनी उत्तम रीतीने सांभाळला आहे. अशा या समंजस आणि सदैव समाजभान बाळगणाऱ्या जोडप्याला येत्या काळात त्यांच्या कामात भरघोस यश मिळो अशा मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.