‘निकल.. पेहली फुरसत से निकल’ हे डायलॉग तर काही दिवसांपूर्वी प्रत्येकाच्या तोंडावर होते. आणि हे डायलॉग फेमस करणारा अवलिया म्हणजे हिंदुस्थानी भाऊ. हिंदुस्थानी भाऊ म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर सफेद रंगाचा शर्ट घालून कपाळाच्या मध्यभागी टिळा लावून अगदी संजय दत्तच्या स्टाईल मध्ये ‘जय हिंद दोस्तो’ म्हणणारा एक हसरा चेहरा येतो. भाऊ लोकप्रिय झाले ते म्हणजे त्यांच्या यु ट्यूब चॅनेल मुळे. त्यामागचे कारणही तसे विशेष आहे. पा किस्तानातील काही महाभागांना जे आपल्या देशाविरुद्ध खोट्या माहिती किंवा बरे वाईट बोलतात त्यांना धडा शिकवण्यासाठी भाऊंनी स्वतःचे यु ट्यूब चॅनेल उघडले. आणि अगदी वेगळ्या शैलीत जवळपास संजय दत्त स्टाईलमध्ये त्यांनी अश्या महाभागांचा समाचार घेतला. प्रेक्षकांनाही त्यांची हि वेगळी शैली आवडली. सोशिअल मीडियावर भाऊंचे मिम्स वायरल होऊ लागले. मग काय कमी कालावधीतच भाऊ लोकप्रिय झाले.
त्यांच्या युट्युब चॅनेलने सुद्धा कमी कालावधीतच १० लाखांच्या वर झेप घेतली होती. भाऊंच्या ह्याच लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी बिग बॉस वाल्यांनी त्यांना आपल्या घरी वा ईल्ड कार्ड एंट्रीमधून बोलावून घेतलं. भाऊंची तिथे सुद्धा खूप चर्चा झाली. प्रेक्षकांना सुद्धा बिग बॉसच्या घरातील भाऊंचा अंदाज खूप भावला. भाऊ बिगबॉसचे विजेता तर नाही बनू शकले, परंतु त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांची बिनधास्त बोलण्याची स्टाईल लोकांना खूप आवडली. हिंदुस्थानी भाऊंचे खरे नाव विकास पाठक असे आहे. तुमच्या मनात एक विचार नक्की येत असेल कि भाऊंची बोलण्याची स्टाईल, बिनधास्त वागणं हे अगदी पहिल्यापासून होते कि आता. आणि खऱ्या आयुष्यात वावरताना भाऊ कसे वावरत असतील. त्यांचे राहणीमान कसे असेल, असे असंख्य प्रश्न तुम्हालासुद्धा पडले असतील. आज लोकांमध्ये लोकप्रिय असणारे आणि लाखों रुपये कमावणाऱ्या भाऊंनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. आज आम्ही भाऊंच्या जीवनाशी निगडित काही किस्से सांगणार आहोत. चला तर आजच्या लेखात हिंदुस्थानी भाऊंबद्दल जाणून घेऊया.
भाऊ मराठी कुटुंबातून असून शाळेत सातवीत असतानाच त्यांना कुटुंबाच्या आर्थिक हलाकीच्या परिस्थितीमुळे वेटरचे सुद्धा काम करावे लागले होते. ह्याशिवाय ते घरोघरी जाऊन अगरबत्त्या सुद्धा विकत असे. परंतु भाऊंनी आपले शिक्षण चालूच ठेवले. भाऊ चे आताचे बिनधास्त रूप बघून कधी ना कधी तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल कि भाऊ अगोदर कोणते काम करायचे. परंतु तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हाल कि, इंटरनेट सेन्सेशन भाऊ एके काळी क्रा ईम रिपोर्टर होते. भाऊंनी ‘दक्ष पोलीस टाइम्स’ नावाच्या मराठी वृत्तपत्रासाठी नोकरी केली. त्यांनी पत्रकारितेच्या जगात आपल्या कामाची छाप सोडली. यासाठी त्यांना २०११ मध्ये बेस्ट चीफ क्रा ईम रिपोर्टर चा अवार्ड हि मिळाला आहे. भाऊंनी २०१४ मध्ये आपले यु ट्यूब चॅनेल उघडले. ते संजय दत्त स्टाईलमध्ये विरोधकांचा खास करून सीमेपलीकडे असलेल्या देशातील युटूबर्सचा, जे आपल्या देशाविरुद्ध बरे वाईट बोलतात, अश्या लोकांचा खरपूस समाचार घेऊ लागले. त्यामुळे भाऊ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. आता काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘मुंबई मंचांड’ नावाचा म्युजिक व्हिडीओ रिलीज झाला. त्यात भाऊ रॅप करताना दिसत आहे.
ज्याप्रकारे भाऊ व्हिडीओज मधून विरोधकांचा समाचार घेतात, अगदी त्याउलट ते खऱ्या आयुष्यात आहेत. विकास उर्फ हिंदुस्थानी भाऊंचा विवाह अश्विनी पाठक ह्यांचा सोबत झाला आहे. फोटोत तुम्ही दोघांची केमिस्ट्री बघू शकता. ४० वर्षाचे भाऊ त्यांचा मुलगा आदित्यच्या खूप जवळ आहेत आणि त्यांनी आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर काढला आहे. भाऊंना बाईकचा खूप छंद आहे. इतकंच नाही तर भाऊंना समजापोटी सुद्धा तितकंच प्रेम आहे. भाऊंची स्वतःची एक सामाजिक संस्था आहे. ज्याचे नाव ‘आदित्य युवा प्रतिष्टान’ आहे. ते त्यांच्या जवळील लोकांवर खूप प्रेम करतात. मित्रांना सख्ख्या भावांप्रमाणे मानतात. तसेच त्यांचे भाषेवर सुद्धा योग्य नियंत्रण आहे. जिथे गरज आहे तिथेच ते आपली वेगळी शैली वापरतात. अश्या ह्या हिंदुस्थानी भाऊंनी त्यांच्या पुढील वाटचाली साठी मराठी गप्पा टीमकडून खूप खूप शुभेच्छा.