Breaking News
Home / मनोरंजन / ‘बचपन का प्यार’ मालवणी व्हर्जन पाहिले का, बघा हा अतरंगी व्हिडीओ

‘बचपन का प्यार’ मालवणी व्हर्जन पाहिले का, बघा हा अतरंगी व्हिडीओ

वायरल वायरल म्हणत अनेक व्हिडियोज प्रसिद्ध होत असतात. पण यातही काही व्हिडियोज अतिशय लोकप्रिय ठरतात. एवढे लोकप्रिय की त्यातील सहभागी व्यक्ती ही आपसूक चर्चेचा भाग बनतात. अगदी नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे ‘बचपन का प्यार’ हा ट्रेंड प्रसिद्ध ज्यामुळे झाला तो वायरल व्हिडियो. या व्हिडियोत आपल्याला सहदेव दिर्दो हा मुलगा ‘बचपन का प्यार’ हे गाणं गाताना दिसून येतो. त्याच्या आवाजातलं हे गाणं एवढं लोकप्रिय झालं की अगदी प्रथितयश वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेतली. त्यातून असं लक्षात आलं की त्याच्या घरी टीव्ही, रेडिओ, फोन असं काही नाहीये. कोणाच्या तरी मोबाईल वर ऐकलेलं गाणं आठवून आणि पुन्हा पुन्हा म्हणून त्याचं तोंडपाठ झालं होतं. त्याची परिणिती पुढे या व्हिडियोत झाली आणि पुढील इतिहास तर आपल्याला माहिती आहेच.

याच व्हिडियोतील त्याच्या या स्टाईलवर आधारित काही व्हिडियोज निघाले. इतकंच कशाला तर सुप्रसिद्ध रॅपर बादशाह यांच्या म्युझिक व्हिडियोतही हा मुलगा हे गाणं गाताना दिसला. अन्य काही व्हिडियो ही प्रसिद्ध झाले. त्यातील काही प्रहसनात्मक होते. त्यातील एक प्रसिद्ध व्हिडियो म्हणजे रिल्स मालवणी यांनी केलेला एक व्हिडियो. रिल्स मालवणी हे एक सोशल मीडिया अकाउंट आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आत अतिशय वेगाने लोकप्रियता मिळवलेलं हे सोशल मीडिया अकाउंट आहे. या सोशल मीडिया अकाउंट वरून विविध प्रसिद्ध सिनेमे, त्यातील प्रसंग आणि गाणी, यांच्यावर प्रहसनात्मक विडोयोज केले जातात. सोबतीला खट्याळ, मधाळ पण तेवढीच झणझणीतअशी मालवणी भाषा वापरलेली असते. त्यामुळे मजेत अजून भर पडते. हे सोशल मीडिया अकाउंट काही मित्र मंडळी एकत्र येऊन चालवतात असं कळतं. त्यांनी ‘बचपन का प्यार’ वर केलेल्या व्हिडियोत यातील अनेक मंडळी दिसून येतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा, आपल्याला एक मुलगा बसलेला दिसून येतो. भजनाच्या सुरुवातीस जशी टाळ मृदुंगाने सुरवात होते तशी सुरुवात या गाण्यातून झालेली दिसून येते. आपल्याला आधी कल्पना नसते तेव्हा हे एखादं भजनरुपी काही असावं असं वाटतं.

नंतर व्हिडियो पुढे सरकतो आणि सगळी मंडळी जणू भजनाला आल्यागत जमलेली दिसून येतात. पण नंतर जेव्हा त्यांनी केलेलं ‘बचपन का प्यार’ चं मराठी भाषांतर हसवुन सोडतं. त्यात त्यांचे एकेकांचे चेहऱ्यावरचे भाव नकळत हसू आणतात. त्यांचे अन्य व्हिडियोही वायरल झाले आहेतच. त्यात या व्हिडियोमूळे अजून एका उत्तम व्हिडियोची भर पडली आहे. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्या वाचकांना या व्हिडियो विषयी आणि ‘रिल्स मालवणी’ विषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं म्हणून हा लेखप्रपंच मांडला.

आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असणार हे नक्की. यानिमित्ताने रिल्स मालवणी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. यापुढेही त्यांच्या कडून अनेक लोकप्रिय कलाकृती घडून येतील या शुभेच्छा !! तसेच आपल्या सगळ्या वाचकांचे ही यानिमित्ताने आभार मानावेसे वाटतात. आपण आपल्या टीमला नेहमीच प्रोत्साहन देत असता. आपले लेख शेअर करत असता, सकारात्मक कमेंट्स करत असता. त्यातून आपल्या साठी विविध विषयांवर लेखन करण्यास उत्साह निर्माण होतो आणि टिकून राहतो. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम राहू द्या ही विनंती. लोभ कायम असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.