नुकतीच सनी देओलचा मुलगा सुपुत्र करण देओल याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘पल पल दिल के पास’ प्रकाशित झाला असून जेव्हापासून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात मग्न आहेत. तसेच मुंबई येथे मागील रात्रीस चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली गेले होती. या स्क्रीनिंग मधे देओल कुटुंबीयांचे सर्व सदस्य उपस्थित होते. तेव्हाच या स्क्रीनिंगवर खूप वर्षांनी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर दिसली. प्रकाश यांना खूप वर्षांनी समोर पाहून सगळे कैमरे त्यांच्याकडे आकर्षित झाले. नातू करण याचा डेब्यू चित्रपट पाहण्यासाठी आजी पोहोचली. त्यांचे फोटोज सोशिअल मीडिया वर वाऱ्यासारखे पसरत होत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न जरूर केलेलं आहे. परंतु त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. प्रकाश यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास सक्त नकार दिला. अशात कायद्याने पहिली बायको जीवंत असताना दुसरं लग्न करू शकत नाही. याच कारणामुळे धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नंतर हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. असे म्हटले जाते की, धर्मेंद्र जेवढे हेमा मालिनीच्या जवळ आहेत, तेवढेच ते प्रकाश कौर यांना ही मानतात. ‘पल पल दिल के पास’ च्या स्क्रीनिंगची गोष्ट पाहिलीत, तर यात धर्मेंद्र आणि प्रकाश तर नजरेस पडले, पण ते वेगवेगळे दिसून आले.
धर्मेंद्र यांनी प्रकाश यांच्याशी 1954 साली विवाह केला होता. दोघांची चार मुले म्हणजेच सनी, बॉबी, विजेता आणि अजिता असे आहेत. तसेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचेही दोन मुली अहाना आणि ईशा आहेत. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या व्यतिरिक्त सनी देओल आणि त्यांची बायको पूजा देओल, बॉबी देओल यांचे कुटुंब, अभय देओल समेत बॉलिवूड चे बरेच सेलिब्रिटींनी हिस्सा घेतला. या चित्रपटात करण देओलसोबत अभिनेत्री सहर बंबा यांनीही डेब्यू केला आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असून आता बघण्याची गोष्ट अशी की, करण त्याच्या आजोबा धर्मेंद्र व वडील सनी देओल सारखे बॉलिवूड मधे आपली छाप सोडतो का नाही! तसेच पूर्ण देओल कुटुंबी या चित्रपटाला हिट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते स्वतः जागो जागी जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करित आहेत.