सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात काही पोलीस आणि चोर मंडळींचे फुटेज व्हिडीओ सुद्धा असतात. काही व्हिडीओ फुटेज पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. तर काही व्हिडीओ फुटेज मजेशीर असतात. असाच एक मजेशीर असलेला एका अट्टल बेवड्याचा आणि अतरंगी माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अट्टल असणाऱ्या चिलीम पिणाऱ्या कार्यकर्त्याने चक्क पोलिसांना चुना लावला आहे. सगळ्यात हाईट म्हणजे पोलिसांना येड्यात काढून हा भाऊ त्यांनाच सरकारी नियम शिकवत होता. तर हा किस्सा लै भन्नाट आहे, व्हिडीओ बघून तर तुम्हाला समजेलच पण हे खालचा लेख वाचला तर तुम्हाला व्हिडीओ बघताना मजा येईल.
आता लोकांच्या फसवणूक कुणीही करतो, अगदी भुरट्या चोर पण लोकांचे पाकीट मारायचे काम करतो. तर अट्टल चोर असेल तर एखाद्या घरावर किंवा दुकानावर दरोडा टाकतो. मात्र या सगळ्यांना पुरून उरणारी काही साधी-भोळी माणसे असतात. ही माणसे घरच्यांना गंडा घालतात मग मित्रांना मग नातेवाईकांना… पण सगळ्यांना गंडा घातल्यावर यांच्याकडे घर सोडण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. मग पैशाचे पण वांधे होतात. विशेष बाब म्हणजे यांना चोरी पण करता येत नाही. पण फसवणूक मात्र सहजपणे करता येते.
आता तुम्ही म्हणाल… एवढ्या एपितर माणसाला चोरी करता कसकाय येणार नाही? तर विषय असा असतो की, चोरी करायला स्किल लागतं, पकडल्यावर चव जायची भीती असते, मार खावा लागतो एवढ्यावर पण नाही भागले तर जेल मध्ये लन जावं लागतं. त्यामुळे फसवणूक करणे, कधीही सोपे असते, असे या डोक्यात शॉट असणाऱ्या लोकांना वाटते. अशाच एका डोक्यात शॉट असणाऱ्या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात याने चक्क पोलिसांना येड्यात काढले.
या व्हिडीओत चाललेल्या संवादातून आपल्याला दिसून येते की, एका चिलीम पिणाऱ्या बेरोजगार माणसाने चक्क 100 नंबरला फोन लावून पोलिसांना बोलवून घेतले. आणि स्वतःला दुसऱ्या जिल्ह्यातील त्याच्या गावी सोडवण्यासाठी सांगितले. आणि मला सोडून या, असे म्हणत गाडीत बसला आणि गावी सोडून येण्यासाठी हट्ट धरला. पोलिसांना वाटले, हा एकतर वेडा आहे किंवा बेवडा आहे. पुढे त्याला तशी विचारणा केल्यावर त्याने फक्त चिलीम पितो आणि लहानपणी पासून फक्त चिलीमचा नाद आहे, असं सांगितलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. खरी मजा तर पुढे आहे.
पोलिसांनी त्याला एकदम व्यवस्थित पध्दतीने समजून सांगितले की, भाऊ… हे असं एका हद्दीतून दुसऱ्या हद्दीत असल्या भंकस गोष्टी साठी जाता येत नाही.. तर या भावाने पुढची अक्कल पोलिसांना शिकवली आणि मग पोलिसांनी याची चांगलीच शेकवली. मात्र पोलिसांची या पठ्ठ्याने केलेली फजिती पाहता व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला हसू आवरता येत नाही.फसवणूकीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता फसवणूकचा हा एक असा अतरंगी व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
या व्हिडीओकडे नीट पाहिल्यास लक्षात येते की, कुठे, कधी, कशी व कुणाची तसेच कशा पद्धतीने फसवणूक करायचं याचं त्याने प्लॅनिंगच केलं होतं, असं एकंदर व्हिडीओ पाहताना दिसतं. पण त्याचा हा प्लॅन फसतो. पण हा एकूण व्हिडीओ प्रचंड मजेशीर आहे. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :