Breaking News
Home / जरा हटके / बहिणींचे लग्न एकत्र लावत असताना अचानक लाईट गेली आणि नवऱ्यांची अदलाबदल झाली, बघा त्यानंतर काय घडलं ते

बहिणींचे लग्न एकत्र लावत असताना अचानक लाईट गेली आणि नवऱ्यांची अदलाबदल झाली, बघा त्यानंतर काय घडलं ते

मध्यंतरी एक जाहिरात की एक सिनेमा बघण्यात आला होता. नक्की काय ते आठवत नाही. पण, त्यातला एक सिन काहीसा लक्षात राहिला आणि आज पुन्हा त्याची आठवण झाली. त्या सीनमध्ये एक समारंभ चालू असतो आणि अचानक लाईट जाते. परिणामतः लाईट येते तेव्हा त्या समारंभात काही तरी गडबड झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला हसायला येतं. सिनेमांत, जाहीरातीत वा अन्य कोणत्याही कलाकृतीत ही बाब आपण नक्कीच हसण्यावारी नेऊ शकतो. पण हीच बाब आपल्या आयुष्यात घडली तर काय काय गोंधळ उडू शकतात याची आपण कल्पनाच न केलेली बरी !

किंबहुना नुकताच असा एक प्रकार मध्यप्रदेशातील एका ठिकाणी झाला होता. याच प्रकारामुळे वर उल्लेख केलेला सिन पुन्हा आठवणीत आला. पण वर म्हंटल्याप्रमाणे सिनेमात वा जाहिरातीत जी बाब खपून जाते ती खऱ्या आयुष्यात डोक्याला ताप देऊ शकते. इथेही तेच होताना दिसलं. झालं काय तर एका गावातील एका व्यक्तीच्या घरी लग्न होतं. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा. यापैकी तिन्ही मुलींची लग्न एकाच मांडवात लावून देण्यासाठी समारंभ आयोजित केला.

आता तीन तीन मुलींच लग्न म्हंटल्यावर तिन्ही नवऱ्यांकडील वऱ्हाडी मंडळी ही लग्न स्थळी पोहोचली. नवऱ्या मुलीकडची मंडळी तर होतीच. खरं तर अशा प्रसंगी अंगणात भरल्या गोकुळाचा आनंद व्हायला हवा. तो तसा झालाही असणार. सगळे विधी होत होते. त्यापैकी मातृपूजन हा विधी होत होता. पण नेमकी याचवेळी लाईट गेली. आता विधी आणि एकूणच लग्न समारंभ हा अर्ध्यावर येऊन थांबला होता. तेव्हा अंदाज घेऊन घेऊन लग्न समारंभ आटपावा असं ठरलं असावं. बरं हे सगळं संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी होत असाव. गावी दुर्दैवाने तासन तास लाईट जाते. त्यामुळे गावकरी आणि लग्न घरातील मंडळी यांसमोर दुसरा पर्याय उपलब्ध नसावा. त्यामुळे लग्नातील विधी होत गेले. यानंतर मात्र कहाणीतील थोड्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. काहींच म्हणणं असतं की काही वेळाने लाईट आल्यानंतर काय गोंधळ झाला तो लक्षात आला. तर काहींच्या म्हणण्यानुसार नवरदेवांच्या गावी वरात पोहोचल्यावर गोंधळ लक्षात आला. ते काहीही असलं तरी गोंधळ झाला होता आणि तोही अगदी मोठ्ठा ! कारण ज्या तीन मुलींची लग्न झाली होती त्या आणि त्यांच्या नवऱ्यांची अदलाबदल झाली होती. त्यातही काहींच म्हणणं अस पडतं की यातील दोन नवरे एकसारखे दिसत असल्याने हा गोंधळ झाला. तर काहींच्या मते वधूंनी एकसारखे पोशाख केल्याने हा गोंधळ उडाला.

लग्न म्हंटल्यावर आधीच किती गडबड असते. त्यात नवरा आणि नवरी यांच्यावर तर किती ताण असतो. त्यामुळे अशी काही चूक झाली असेल. कारण काहीही असलं तरी जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं होतं. सुदैवाने तेथील जुन्या जाणत्या आणि अधिकारी मंडळींनी सदर मुलींचे आणि मुलांचे लग्न विधी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आणि मग यथायोग्य जोड्या जुळवूनच लग्न गाठी बांधली गेल्याचं कळतं. पण हे सगळं उरके पर्यंत पहाटेचे पाच ते साडे पाच झाले होते. त्यामुळे केवळ वीज गेल्यामुळे डोक्याला किती ताप झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. असो. आमच्या टीमने ही बातमी ऑनलाईन वाचली. त्यावर अजून थोडी माहिती घेतली आणि याबद्दलच्या अजून काही बातम्या बघितल्या आणि वाचल्या. त्यानंतर मग त्यातील समान मुद्दे लक्षात आले. आणि या समान मुद्द्यांचा आधारे आजचा हा लेख लिहावा अस ठरलं. या लेखाच्या माध्यमातून केवळ घडलेली घटना आपल्या वाचकांपर्यंत पोहोचावी हीच इच्छा होती व आहे.

आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *