Breaking News
Home / मनोरंजन / बहिणीच्या लग्नात डान्स असावा तर असा, ह्या तरुणीने बहिणीच्या लग्नात केला अप्रतिम डान्स

बहिणीच्या लग्नात डान्स असावा तर असा, ह्या तरुणीने बहिणीच्या लग्नात केला अप्रतिम डान्स

आपल्या घरातलं लग्न असेल तर आपल्यात नकळत एक ऊर्जा प्रवाहित होते. या ऊर्जेने येणारा उत्साह हा काही औरच असतो. त्यातही आपल्या भावडांपैकी कोणाचं लग्न असेल तर मग बघायलाच नको. त्यांच्या लग्नात हक्काने धमाल मस्ती करता येणार हे अलिखित असतं. पण सोबतच त्यांच्या या नव्या वाटचालीच्या आपण त्यांना काही खास प्रकारे शुभेच्छा द्याव्यात अस आपल्याला वाटणं साहजिक आहे. मग कोणी काही भेटवस्तू घेऊन येतात, कधी कोणी त्यांच्या बाहेरगावी फिरण्याची व्यवस्था करतात आणि बरंच काही. पण या सगळ्यांत एक बाब मात्र हमखास होते ती म्हणजे त्यांच्या लग्नात आपण केलेला मनमुराद डान्स. त्यातही आपल्याला डान्स येत असेल तर क्या केहने.

याचीच अनुभूती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच पाहिला. आपल्या टीम प्रमाणेच जवळपास ६९ लक्ष लोकांनी हा व्हिडियो आजतागायत पाहिलेला आहे. आज याच व्हिडियो विषयी थोडक्यात जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे विधी भाटिया यांचा. विधी या उत्तम नृत्यांगना आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी स्वतःच युट्युब चॅनेल सुरू केलं आहे.

या चॅनेल वरून त्यांच्या डान्स परफॉर्मन्स चा आनंद आपल्याला घेता येतो. याच व्हिडियोज मधील एक व्हिडियो म्हणजे त्यांच्या बहिणीच्या लग्नात संगीत चालू असताना त्यांनी केलेला डान्स. वर उल्लेख केल्याप्रमाणे याच व्हिडियोला जवळपास ६९ लक्ष लोकांनी पाहिलेलं आहे. या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा विधी या ‘गुन गुन गुना ये गाना रे’ या गाण्यावर चालत येतात. मग हळूहळू संगीत बदलतं आणि ‘गर्ल्स लाईक यु’ हे इंग्रजी गाणं सुरू होतं. या गाण्यासोबत मग विधी यांचा उत्तम असा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतो. त्यांनी केलेल्या हस्तमुद्रा खासकरून लक्ष वेधून घेतात. संपूर्ण व्हिडियोत त्यांनी केलेल्या हस्तमुद्रा आणि हातांच्या हालचालींनी त्यांच्या परफॉर्मन्सला चार चांद लागतात असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये. या इंग्रजी गाण्यावर परफॉर्मन्स केल्यानंतर मग ए आर रहमान यांच्या सुरावटीने नटलेलं तेरे बिन हे गाणं सुरू होतं. या गाण्यावरही विधी मस्त असा परफॉर्मन्स देतात. त्या करत असलेल्या स्टेप्स, त्यातील नजाकत आणि सहजता यातून त्यांनी अनेक वर्षे नृत्य या कलाप्रकाराची सेवा केली आहे हे कळून येतं.

तर अशी ही अष्टपैलू कलाकार जेव्हा परफॉर्मन्सच्या शेवटाकडे येते तेव्हा कोणत्या गाण्यावर सादरीकरण करणार ही उत्सुकता आपल्या मनात असते. ‘नचदि फिरा’ या सुप्रसिद्ध गाण्यावर विधी डान्स करतात तेव्हा आपल्या उत्सुकतेचं आपल्याला उत्तर मिळतं. या सगळ्या परफॉर्मन्स मध्ये अजून एक व्यक्ती महत्वपूर्ण भूमिका बजावते. ही व्यक्ती म्हणजे या डान्स परफॉर्मन्स ची व्हिडियोग्राफी करणारा कॅमेरामन. हा डान्स होत असतो मोकळ्या मैदानात. त्यामुळे मोकळ्या आकाशाखाली शूटिंग करत असताना मिळणाऱ्या मोकळेपणाचा हा कॅमेरामन पुरेपूर फायदा उठवतो. आजूबाजूला अडथळे नसल्याने ३६०° कॅमेरा फिरत राहतो आणि त्यामुळे परफॉर्मन्स अजून छान वाटतो. विधी यांनी जो उत्तम परफॉर्मन्स दिला आहे त्यास तोड नाही. त्यासाठी त्यांचं आपल्या टिमकडून मनापासून अभिनंदन. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! त्याचप्रमाणे हा व्हिडियो शूट करणाऱ्या कॅमेरामनचं मनापासून कौतुक.

आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही आवडला असणार हे नक्की. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार असा विश्वास आहे. यानिमित्ताने आपल्या सगळ्या वाचकांचे आभार. आपण आपले लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करता आणि कमेंट्स मधून आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. यांमुळे आपल्यासाठी विविध विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा आम्हाला मिळत असते. आपण यापुढेही आपल्या टीमला असाच पाठिंबा देत राहाल आणि कौतुक करत राहाल हे नक्की. त्यासाठी आपले आभार आणि लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *