Breaking News
Home / मनोरंजन / बहिणीसाठी वाट्टेल ते… भाऊ असावा तर असा, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या लहानग्याचे कौतुक कराल

बहिणीसाठी वाट्टेल ते… भाऊ असावा तर असा, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या लहानग्याचे कौतुक कराल

नाती ही जेवढी जवळची तेवढीच गुंतागुंतीची असतात. पण कदाचित नात्यांमधली हीच गुंतागुंत त्या नात्यांना वेगळं बनवते. प्रत्येक नात्याला स्वतःचं असं वेगळं वैशिष्ट्य त्यामुळे प्राप्त होतं. पण प्रत्येक नात्यात एक गोष्ट मात्र नेहमीच हवी असते ती म्हणजे – जिव्हाळा ! नात्यांमधली विविधता कितीही असली तरी जिव्हाळा हा एक सामायिक भाग नेहमीच असतो.

मग ते नातं अगदी भावा बहिणीच असू दे, मित्र मैत्रीणीचं असू दे वा अगदी नवरा बायको, पालक आणि मुलं किंवा अजून कोणतंही असू दे. प्रत्येक नात्यात काही ना काही कारणाने जिव्हाळा हा असावा लागतो. हा जिव्हाळा असेल तर मग नात्याला एक छान असा पाया मिळतो आणि त्यावर हे नातं घट्टपणे उभं राहू शकतं. बरं हा जिव्हाळा छोट्या छोट्या क्षणातून वाढीस लागत असतो. एकमेकांविषयी असणारी आदराची आणि मायेची भावना ही यातून वाढीस लागते. आता आज आम्ही बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो काही काळापूर्वीचा आहे. या व्हिडियोत आपल्याला दोन लहान मुलं दिसून येतात. त्यातील एका लहान मुलाच्या डोईपासून पायापर्यंत चादर टाकलेली असते. त्यामुळे मुलगा आहे की मुलगी आहे हे कळत नाही. त्यामुळे इथे आपण त्यास लहान भावंड म्हणू. अर्थातच जो मोठा मुलगा आहे तो याबाबतीत दादा होऊन जातो.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला ही जोडगोळी रस्त्यावरून चालत येताना दिसते. रस्ता पूर्ण चिखलाने माखलेला असतो. सततच्या वर्दळीमुळे रस्त्याची वाट लागलेली असते. त्यातुनच ही जोडी जात असते. कुठून आली आणि कुठे जात असते हे त्यांनाच किंबहुना त्या मोठ्या भावालाच माहीत. कारण पूर्ण व्हिडियो भर तोच वाटाड्या म्हणून काम करत असतो. बरं त्याचंही ध्यान अगदी लक्षात घ्याव असच असतं. पायात कोणातरी मोठ्या माणसाचे बूट घातलेले असतात. अर्थातच त्यामुळे धड चालता येत नसतं. बरं नुसतं चालायचं नसत. तर पुढ्यात चालणाऱ्या आणि अंगावरील चादरीमुळे पुढचं काही न दिसणाऱ्या भावंडाला दिशादर्शन ही करायचं असतं. बरं हे भावंड अगदीच लहान असल्याने स्वतः काही करण्यास असमर्थच वाटत असतं. अशावेळी मोठा भाऊ म्हणून जबाबदारी येऊन पडलेली असते ती या मोठ्या भावावर ! अर्थात वय कोणतंही असो, एकदा का जबाबदारी अंगावर पडली आणि आपण ती स्वीकारली की माणूस आपसूक मोठा होतो. हा वयाने लहान तरीही मोठा भाऊ याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणायला हवा. याचं कारण ही भावंडांची जोडगोळी चालत जात असताना रस्त्यावरचा एक कुत्रा जवळ येऊ पाहतो.

आता कुत्रा म्हंटलं की वास घेणं आणि नवीन गोष्टींविषयी उत्सुकता असणं हे आलंच. त्यात चादरीखाली चालणार ध्यान आणि त्याचा भाऊ यांच्याविषयी त्याला कुतूहल निर्माण झालं असावं. पण मोठ्या भावाला मात्र ही गोष्ट धो’कादायक वाटते. अर्थात त्याचंही चुकत नाहीच म्हणा. त्यामुळे हा कुत्रा दिसल्यापासून तो त्याला हटकतो. पायाने लाथ मा’रल्यासारख करतो. हेतू अर्थातच त्या लहानग्या भावंडांच संरक्षण करण होय. बरं आधी उल्लेख केल्याप्रमाणे पायात मोठ्या माणसांचे शूज असतात. मग काय एकदा पाय इतक्या जोरात फिरवतो की पायातून शूज बाहेर निघतो. एव्हाना कुत्रा ही शेपटी घालूनच असतो. त्याला फक्त उत्सुकता असावी एवढंच जाणवतं. पण या मोठ्या भाऊरायांचा आवेश मात्र इतका असतो की शेवटपर्यंत त्या कुत्र्याला तो जवळ येऊ देत नाही. तर असा हा व्हिडियो. अगदी कमी वेळेचा आणि बघायला गेला तर टाईमपास वाटणारा ! पण या छोट्याश्या व्हिडियोतुन ही आपल्याला भावंडांमध्ये असलेला जिव्हाळा दिसून येतो. वय अगदीच लहान असलं तरी आपल्या भावंडविषयी असलेलं प्रेम येथे दिसून येतं. येत्या काळातही हेच प्रेम कायम राहू दे ही सदिच्छा. त्यांचं वय तसं लहानच आहे. पण तरी वय वाढल्यावर आणि जगाच्या रहाटगाडग्यात आल्यावरही त्यांच्यातील हा जिव्हाळा कायम राहावा हीच इच्छा.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. मानवी नात्यांविषयी लिहावं अस मनात होतंच. या लेखाच्या निमित्ताने ती इच्छा पूर्ण झालीच. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा आणि त्या पाठी आपला आमच्याप्रति असलेला जिव्हाळा येत्या काळात ही टिकून रहावा ही सदिच्छा. आपली टीमही येत्या काळातही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.