Breaking News
Home / मनोरंजन / बांबू ओलांडण्यासाठी ह्या चार गाढवांपैकी तिसऱ्याने वापरलेली आयडिया पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

बांबू ओलांडण्यासाठी ह्या चार गाढवांपैकी तिसऱ्याने वापरलेली आयडिया पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ

जगात तुम्ही कुठंही जा माणसाची तुलना गाढवाबरोबर करणारे लोक तुम्हाला जगभरात दिसून येतील. काय गाढव माणूस आहे हा, असं आपणही एखाद्याला येता जाता म्हणतच असतो. अगदी अमेरिकेत पण गाढवाची उपमा मूर्खाला दिली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला असा काही व्हिडीओ दाखवणार आहोत, जे पाहून गाढवाची उपमा दिलेले लोक खुश होतील. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित गोंडस, रागीट तसेच विचित्र क्षणांचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमींना किंवा कॉमेडी व्हिडीओ असेल तर हे व्हायरल व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहायला लोकांना आवडतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर असा कोणताही व्हिडीओ, फोटो अपलोड झाला की तो लगेचच व्हायरल होतो. सध्या गाढवाच्या संबंधित एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही या 4 गाढवांपैकी तिसऱ्या गाढवाचे कौतुक कराल. व्हिडीओमध्ये गाढव ज्या पद्धतीने सराईतपणे अक्कल चालवत आहे. या तिसऱ्या गाढवाने शोधून काढलेली आयडिया पाहून ‘वाह गाढवा’ असे शब्द तुमच्या तोंडात येऊ शकतात. अवघ्या 40 सेकंदाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

या व्हिडीओला यूजर्सना खूप पसंती मिळत आहे. सर्वसाधारणपणे अनेक लोक दिवसभरात सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडीओ बघत असतात. मात्र हे बघताना आपण आपली कामे पटकन उरकतो आणि व्हिडीओ पाहायला बसतो. आपले खूप वेळ चालणारे काम पटकन होण्यासाठी आपण सर्वांनी अनेक वेळा जुगाड किंवा शॉर्टकटचा अवलंब केला असेलच. त्यातल्या त्यात भारतीय माणसं जुगाड करण्यासाठी सगळ्यात पुढे असतात. त्यातल्या त्यात आळशी लोकांसारखा जुगाड कुणीच करू शकत नाही. तुम्ही जुगाड करणारी माणसं बघितली असतील पण जुगाड करणारे प्राणी बघितले आहेत का? त्यातही गाढवासारखा प्राणीही अक्कल वापरून जुगाड करू शकतो, यावर तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. कारण मुळात गाढवाला अक्कल असते, हेच कुणाला पटू शकत नाही. पण दचकून जाऊ नका. गाढवाला अक्कल असते, याचा व्हिडीओसह पुरावा घेऊन आम्ही आलो आहोत. 4 गाढवं असतील तर त्यातल्या एकाला का होईना अक्कल असते, याचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला याची देही याची डोळा दाखवणार आहोत.

तर घडलं असं की, 4 गाढवं एका रस्त्यावरून जात आहेत. आणि रस्त्याच्या मध्येच एक बांबू आडवा बांधलेला आहे. एक फूट उंचीवर बांधलेला हा बांबू पहिली 2 गाढवं त्यावरून उड्या मारून ओलांडतात. तिसऱ्या गाढवाने म्हणजेच आळशी असलेल्या गाढवाने अक्कल लावली आणि शक्कल लढवली. हातापायाचा वापर करण्याऐवजी मेंदूचा वापर करत या तिसऱ्या गाढवाने सगळ्यांचे काम सोपे केले. खरं तर तिसऱ्या गाढवाने या सगळ्यांचे नेतृत्व करायला हवे, असे वाटावे एवढे झक्कास काम त्याने केले आहे.

हा जबरदस्त व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट हसाल. तिसऱ्या गाढवाने केलेलं काम पाहण्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडीओ बघावाच लागेल ना भाऊ… जे जे लोक तुम्हाला आळशी गाढवं अशा उपमा देत असतील, त्यांना हा व्हिडिओ टॅग करायला विसरू नका. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.