इंटरनेट वर कधी काय बघायला मिळेल याचा अंदाज देता येत नाही. अनेकवेळा आश्चर्य वाटावं अशा काही गोष्टी या माध्यमातून बघायला मिळतात. अर्थात त्यांच्यामुळे जेवढं जास्त आश्चर्य वाटेल तेवढी ती गोष्ट जास्त वायरल होते हे आपल्याला माहीत आहेच. काही वर्षांपूर्वी पर्यंत वायरल होण्यात फोटोजची संख्या अधिक असे. पण गेल्या काही काळात ही संख्या नगण्य म्हणावी इतकी रोडावली आहे.
याच कारण ही सर्वश्रुत आहेच. गेल्या काही काळांत व्हिडियोज चा प्रभाव हा इतका वाढला आहे की विचारता सोय नाही. अर्थात ते साहजिक ही आहे म्हणा ! कारण केवळ एखाद्या फोटोतून जे कळू शकतं, त्यापेक्षा कैक पटीने अधिक बाबी एखाद्या व्हिडियोतून कळू शकतात. बरं या वायरल व्हिडियोत अनेक प्रकारचे व्हिडियोज बघायला मिळतात. काही व्हिडियोज हे केवळ मनोरंजन म्हणून बनवलेले असतात. त्यात मनोरंजन करणारी मंडळी जे काही नावीन्य दाखवतील त्यावर त्याची लोकप्रियता ठरते. लोकांना भारी वाटेल असं काही असलं की हे व्हिडियोज वायरल होतात
पण एक असतं, ते म्हणजे या व्हिडियोसाठी काही वेळा रिटेक्ट्स घेता येतात. पण याच्या अगदी उलट असे व्हिडियोज हे प्राण्यांचे, पक्ष्यांचे असतात. कारण या मंडळींना कितीही प्रशिक्षण दिलं तरी यांचा मूड कधी काय असेल सांगता येत नाही. बरं त्यातही एकवेळ पाळीव प्राणी असतील तर गोष्ट वेगळी समजू. पण वन्य प्राण्यांच्या बाबतीत जर एखादी घटना चित्रित केली गेली तर तशी ती एकदाच घडलेली. त्यामुळे आपोआप त्याच महत्व वाढतं. तसेच वर उल्लेख केलेला आश्चर्याचा धक्का जितका जास्त तितका व्हिडियो वायरल हे समीकरण असतंच. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो आहे. हा व्हिडियो तसा गेल्या काही काळातलाच असावा असा अंदाज आहे. पण याविषयी जास्त माहिती न मिळाल्याने यावर काहीही भाष्य करता येत नाही. पण एक मात्र खरं की हा व्हिडियो परदेशातील आहे.
या व्हिडियोत आपल्याला दोन प्राणी भेटतात. त्यातील एक म्हणजे चित्ता आणि दुसरा प्राणी म्हणजे एक छोटं हरीण ! जवळपास पाडस म्हणू या वयाचं हे हरीण असतं. तसेच यांच्या सोबत एक मुलगी ही असते. आता यात एक नैसर्गिक शिकारी आणि दुसरा त्याची शिकार आहे हे कोणालाही कळून येईल. पण अस असूनही शिकारी या हरिणाची शिकार करू शकत नाही. बरं ते ही अगदी जबड्याजवळ असून सुद्धा ! म्हणजे आपल्याकडे एखादी जागा हाकेच्या अंतरावर आहे अस म्हणण्याची पद्धत आहे. या दोघांमधील अंतर हे यापेक्षा ही कित्येकपटीने कमी असतं. पण तरीही का काही होत नाही? याचं उत्तर आहे या दोघांमध्ये एक संरक्षक कुंपण असतं. तसेच त्याची उंची ही बऱ्यापैकी मोठी असते. त्यामुळे सावज समोर असूनही चित्याला काही करता येत नाही. आणि हे सगळं चित्रित करण्याचं काम वर उल्लेख केलेली मुलगी करत असते. अर्थात ती स्वतः ते हरीण असलेल्या ठिकाणी उभी असते हे काही वेगळं सांगायला नको. तसेच तिचं त्या हरिणासोबत बोलणं ही चालू असतं. तिच्या मते त्या हरिणाने घाबरण अपेक्षित असतं. कारण अर्थातच स्पष्ट आहे. पण का कुणास ठाऊक पण हे हरीण घाबरत नाही. अशावेळी एक तर्क असा करता येतो की ही संरक्षक जाळी ओलांडून तो शिकारी अलीकडे येणार नाही याची त्याला खात्री असावी !
पण अस असलं तरी ते हरीण आणि ती मुलगी या चित्त्याच्या अगदी जवळ असताना ही घाबरत नाहीत हे जरा वेगळं वाटतं. त्यामुळे या व्हिडियोत दिसतंय त्यापेक्षा ही कडक सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात असणार हे नक्की ! तसेच हा चित्ता एखाद्या अभयारण्यातील असावा असा अंदाज सहज करता येतो. त्यामुळे तो काहीसा माणसाळलेला असावा असा अंदाज बांधता येतो. किंवा यापेक्षा ही काही वेगळं कारण असू शकतं. कारण काही वेळेस खरं आयुष्य हे कल्पनेपेक्षा ही अचंबित करणार असू शकतं. असो. पण हा व्हिडियो बघितला आणि खरंच अचंबित व्हायला झालं. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी कळायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.
आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :