मराठी मालिका क्षेत्रात वेळोवेळी नवनवीन मालिका दाखल होत असतात. बहुतांश वेळेस त्यांच्यातून सामाजिक विषय हाताळले जात असतात. अशीच एक नवीन मालिका जी एका सामाजिक विषयावर आधारित आहे, ती येत्या काळात कलर्स मराठी वर दाखल होणार आहे. स्त्रिया म्हणजे चूल आणि मूल अशी जुनाट भूमिका असणारा नवरा, पण त्याची तेवढीच पुरोगामी अशी बायको असं या मालिकेचं एकूण कथानक वाटतंय. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो आपण सगळ्यांनीच पाहिला आहे आणि त्याला पसंतीही दिली आहे. ‘बायको अशी हव्वी’ असं या नवीन मालिकेचं नाव. या मालिकेच्या प्रोमोतून काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे ही आपल्या दृष्टीस पडतात. यातील एक चेहरा म्हणजे मालिकेच्या नायिकेचा. तिला नुकतंच काही जणांनी एका ऑनलाईन नाटकांतून पाहिलं असेलंच.
या नायिकेचं मालिकेतील नाव जान्हवी असं असून खऱ्या आयुष्यातलं नाव आहे गौरी देशपांडे. गौरी हिला लहानपणापासून अभिनयाची आवड. आपण तिला डब्बा गुल या कार्यक्रमातुन ही पाहिलेलं आठवत असेल. पुढे तिने बाबांची शाळा या चित्रपटातही अभिनय केलेला होता. ‘बायको अशी हव्वी’ ही गौरीची पहिलीच मालिका. चित्रपट, मालिका, रियालिटी शो यांच्यासोबत गौरी ने नाटकांतूनही अभिनय केलेला आहे. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन नाटकाची नेटक ही संकल्पना खूप प्रसिद्ध झाली. या नवीन पद्धतीच्या नाटकांमधील पहिलं नाट्यपुष्प म्हणजे मोगरा. ह्रिषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन लाभलेली ही कलाकृती. गौरी सोबत या कलाकृतीत वंदना गुप्ते, स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, मयुरा रानडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. अवघ्या काही महिन्यांत ही कलाकृती जगभर प्रसिद्ध पावली आहे. गौरी हिच्या अभिनयाचं ही विशेष कौतुक झालं आहे. अभिनयात अग्रेसर असणारी ही कलाकार नृत्यातही तितकीच कलानिपुण आहे. तिने कथक चे प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच तिला कवितांची विशेष आवड आहे. त्यामुळे अनेक समारंभांतून गौरी आपल्याला कवितांचं अभिवाचन करताना दिसते.
तसेच तिच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चाहत्यांसाठी ती अनेक वेळेस कवितांचं वाचन आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरूनही करत असते. या सगळ्यांसोबत तिने मॉडेलिंग ही केलेलं आहे. अशी ही अष्टपैलू कलाकार आपल्याला ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेतून दररोज भेटीस येईल. तिच्या नाटकांच्या प्रयोगांप्रमाणेच ती या मालिकेच्या प्रत्येक भागातही आपल्या अभिनयाचे रंग भरेल हे नक्की. या उदयोन्मुख अभिनेत्रीस पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! मराठी गप्पाच्या टीमने मनोरंजन क्षेत्रातील अनेक उदयोन्मुख कलाकारांविषयी वेळोवेळी लेख लिहिलेले आहेत. आपण या लेखाप्रमाणेच त्या लेखांचाही आनंद घ्या. त्यासाठी वे’बसाई’टवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन उदयोन्मुख असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध लेख वाचनास उपलब्ध होतील. पण त्याआधी हा लेखही सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !