बिवी बिवी बिवी मायके चली गयी हा हा.. हे मेरी बिवी मायके चली गयी.. बादल पटांगा सितारा बन गया हु.. लोगों मैं फिर से कुंवारा बन गया हु.. ऐश का जमाना आया, मौसम आशिकना आया.. साथ ये बहाणा आया.. आया, आया, आया, आया.. मेरी बिवी मायके चली गयी…
हे गाणं आजवर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. खरं पाहिलं तर पती-पत्नीचे नाते म्हटले की प्रेम आणि त्यासोबत रूसवे फुगवे आलेच. लग्नानंतर मुलींना नवरा म्हणजे डोक्याची कटकट वाटू लागते. नवऱ्याची कटकट कधी एकदाची संपते असं अनेक मुलींना वाटत असतं. पण नवऱ्याची कटकट वाटत असली तरी लग्न केल्यानंतर नवऱ्याचे अनेक फायदे हे मुलींना होतात. डोकेदुखी वाटणारा नवरा मुलींना बऱ्याच गोष्टींसाठी कामी पडत असतो. नवरे लोकांची पण सेम अशीच भावना असते. बायको त्यांना कटकट वाटत असते आणि कधी एकदा ही आपल्याला निवांत सोडते, असं वाटत असतं. बायको जेव्हा माहेरी जाते, तेव्हा नवऱ्याला जेवढा आनंद होतो, तेवढा कुणालाच होत नाही. जगात सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कधी झाला? हा प्रश्न कुठल्याही नवऱ्याला विचारला तर तो ‘बायको माहेरी गेल्यावर’ असेच उत्तर देईल.
तर विषय असाय भावांनो… नवरा बायको म्हटलं की, प्रेम भांडण-तंटे, होत असतात. एकमेंकांना एक दुसऱ्यांपासून होत नाही. पण रुसल्याशिवाय ते राहत नाहीत. परंतु वाद वाढविण्याऐवजी मिटवले पाहिजेत. लग्नानंतर नवरा बायकोच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. त्यामुळे एकमेकांबद्दल काही गोष्टी त्यांना माहित नसतात, ज्यामुळे एकमेकांना समजून घेण्यापासून ते त्यांचा स्वभाव जाणून घेईपर्यंत सगळ्याच गोष्टींची नव्याने सुरूवात त्यांना करावी लागते. त्याचप्रमाणे काही गोष्टी न पटल्यामुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, त्यात तसं फारसे नवीन काही नाही. कारण हे प्रत्येक नवरा-बायको सोबतच घडतं. मात्र हे सगळं एका बाजूला आणि बायको माहेरी जाण्याचा आनंद एका बाजूला… असाच एका नवऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बायको माहेरी गेल्यामुळे नवरा प्रचंड आनंदी आहे आणि आनंदाच्या भरात त्याने एक व्हिडिओ तयार केला आहे. हा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ पाहणं फारच मनोरंजक आहे. डोकेदुखी वाटणाऱ्या नवऱ्याची असेही काही रूप पाहून अनेक मुली-बायका या व्हिडीओचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसून येईल की, नवरा बायकोच्या माहेरी गेल्याच्या आनंदात मनसोक्त नाचत आहे. त्याचा आनंद तो नाचण्यातुन व्यक्त करत आहे. एवढंच नाही तर त्याचा आनंद एवढ्या मोठ्या लेव्हलला आहे की, तो जमीन सोडून थेट बेडवर नाचत आहे.
“बिवी बिवी बिवी मायके चली गयी हा हा.. हे मेरी बिवी मायके चली गयी” या गाण्यावर त्याने केलेला डान्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :