जगातील कोणतीही कला ही प्रामुख्याने दोन उद्देशांसाठी वापरली जाते. त्यातील पहिला उद्देश अर्थातच मनोरंजन करणे हा असतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो, थकवा दूर होतो आणि प्रसन्न वाटतं. त्याचप्रमाणे या कलांचा दुसरा उपयोग हा ज्ञान प्रबोधन करण्यासाठी ही केला जातो. आपल्या समाजात तर याची एक मोठी परंपराच आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये आणि अर्थातच हे समाजोपयोगी काम सगळ्यांत जास्त कोणी केलं असेल तर लोक कलाकारांनी केलं आहे. त्यांनी त्यांच्या गायन, नृत्य, अभिनय आणि इतर कलांनी सतत समाजात वैचारिक प्रबोधन चालूच ठेवले आहे.
अर्थात इतर माध्यमातील कलाकार ही आपापला वाटा हा उचलतच असतात. त्यांना जमेल त्या पद्ध्तीने ते ही प्रबोधन करत असतात. पण अस असलं तरी लोक कलाकारांकडून प्रामुख्याने समाजप्रबोधन हे होताना दिसतं. त्यातही शाहीर यात आघाडीवर असतात. याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या टीमला पाहायला मिळालं. अर्थात हे उदाहरण काही वैयक्तिकरित्या अनुभवायला मिळालं नाही. त्यासाठी कारणीभूत ठरला एक वायरल व्हिडियो !
तो सुद्धा दोन वर्षांपूर्वीचा वायरल व्हिडियो होय. या वायरल व्हिडियोत आपल्याला एक गायक कलाकार दिसून येतात. नंतर कळतं की ते एक शाहीर आहेत. व्हिडियो सुरु होतो तेव्हा शाहीर रस्त्याच्या कडेला पथारी टाकून बसलेले असतात. या शाहिरांचं नाव शाहीर बापू जाधव असल्याचं कळतं. मूळचे कुर्डुवाडी येथील असलेले शाहीर आता विविध ठिकाणी समाजप्रबोधन करत असतात. त्यांच्या कुटुंबात लोक गीतांची परंपरा होती हे कळून येतं. शाहिरांनी त्यांच्या वडिलांकडून हा वारसा घेतला आणि जपला सुद्धा ! पण त्यासाठी अर्थातच तालीम ही आवश्यक असते. शाहिरांनी ही लोक गीतांचं शिक्षण घेतलं आहेच. म्हैसगाव, सोलापूर येथील दगडूअण्णा यांच्याकडून शाहिरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. अर्थात येथे शिक्षण म्हणत असलो तरी त्याचा रूढार्थाने शिक्षण असा अर्थ होत नाही. शिक्षण याचा येथे लोककला असा अर्थ घ्यावा. त्यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शालेय शिक्षण न झाल्याचे म्हंटले होते यासाठी हा खुलासा. पण अस असलं तरी त्यांच्या वडिलांनी आणि गुरूंनी त्यांना जे जे शिकवलं ते मुखोद्गत असल्याचं म्हंटलं होतं. असो.
आता या व्हिडियो विषयी थोडं जाणून घेऊयात. व्हिडियो सुरू होतो आणि काही वेळाने कॅमेरा झुम केला जातो. कॅमेरा झूम केल्यावर त्यांच्या जवळ जेवणाचा डबा आणि पाणी ही दिसतं. जवळच काही माणसं बसलेली असतात. त्यातील एखाद दुसरी व्यक्तीच दिसून येते आणि बाकीच्यांचा आवाज ऐकू येत असतो. पण अस असलं तरी हे दादा गायला लागले की मग मात्र आपलं संपूर्ण लक्ष केवळ त्यांच्यावर केंद्रित होतं. कारण त्यांच्या गाण्याचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा असतो. हा विषय असतो आई ! कोणत्याही माणसाच्या मनात घर करून राहील असा हा विषय ! या आई विषयी आपण मुलं मुलींनी कसं वागावं याविषयी शाहीर आपल्याला सांगत असतात. हातात घुंगरू असतात आणि जवळच डफली आणि हातात एक काठी असते. या तिघांचा वापर करत त्यांनी ताल धरलेला असतो. आतापर्यंत आपण सगळेच गाणं ऐकताना लक्ष देऊन ऐकतोच असं नाही. म्हणूनच गाणी गुणगुणत असताना आपण अनेकवेळा चुकतो. केवळ तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहतो. पण या गाण्याच्या वेळी मात्र असं काही होत नाही. कारण आपण कानात प्राण आणून त्यांचं गाणं ऐकत असतो. त्यामुळे प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात राहतात.
अर्थात त्यातील अर्थही तितकाच महत्वाचा आहे. खासकरून आई वडिलांना कस्पटासमान लेखणाऱ्या अनेकांना बरंच काही शिकवून जाणारं हे गाणं आहे. त्यास या शाहिरांची साथ लाभल्याने ते अजून प्रभावी ठरतं. या गाण्याचे शब्दन शब्द हा व्हिडियो बघून झाल्यावर ही आपल्या लक्षात राहतात हे नक्की. असो.
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. हा व्हिडियो बघितला आणि त्याविषयी लिहावं असं अगदी पहिल्याच फटक्यात वाटलं. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :