Breaking News
Home / मनोरंजन / “मर्दाला इज्जत हाय का, आता सरपंच झाल्या हो बायका”, एका नवऱ्याने बनवलेली हि अतरंगी कविता ऐकून हसू आवरणार नाही

“मर्दाला इज्जत हाय का, आता सरपंच झाल्या हो बायका”, एका नवऱ्याने बनवलेली हि अतरंगी कविता ऐकून हसू आवरणार नाही

स्त्रिया कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत, मग ते उद्योग व्यावसाय असो वा समाजकारण, संस्कृती आणि राजकारण… समोरच्याचं डिपॉझिट पण जप्त करतील इतक्या ताकदीने निवडणूका लढतात. बरं आपल्या कविराजांच्या होम मिनिस्टर सरपंच बनल्या. आता आधीच घरी कविराजांचं काही चालत नव्हतं. बायको सरपंच झाली म्हटल्यावर काही खरं नायं ना. तसंच काहीसं झालंयं कविराजांचं. बायका सरपंच झाल्याचा गावाला फायदा झाला की नाही माहिती नाही पण नुकसान मात्र, त्यांच्या नवऱ्याला फार झालंयं. याचं खापर त्यानं नशिबावर फोडलंयं. अर्थात सरपंचपद महिलांसाठी राखीव झाल्यावर तो तरी काय करणार आता पाच वर्षे सुटका नाही. त्यानंतरही माजी सरपंचांचा मान काही कमी होत नाही. एकदा का कविराजांनी भांडी घासायला सुरू केली की, पुन्हा सुटका होणं कठीणंच. म्हणून पोटतिकटीनं आपलं गाऱ्हाणं आपल्या मित्रमंडळींपुढं मांडतायतं.

या सगळ्यात आपल्या घरात इज्जतीचा पार कचराच झालायं हे एव्हाना कळून चुकलं होतं. त्याचीच व्यथा आपल्या मंडळींपुढे मांडायला सुरुवात केली होती. त्यांना कंटाळा इतका झालाय की बायकांनो इतका राग कसला दाखवतायं तुमच्या ओठावर मिसरळूर तरी हाय का, असा जाब विचारायला लागला. बाहेरचं थोडं अन् घरीच आग लागल्यानं व्याकूळ होऊन तो गातोय. म्हणतोय “माझ्यावाली साली मेंबर झाली, सरपंच झाली बायको, ठसक्यात बोलतेयं, दम मले घालतेय बोलतेय सुनुंगी कायको”, सरपंचांचा तोरा काय घरीपण कमी नसतो. जसा कामकाजाचा तोरा बाहेर तसाच घरीही. आपलीच बायको उशीरा उठतेय हे सांगणं थोडं नवऱ्याला कठीण जातंयं, त्यामुळं सकाळी उठा आणि घरं झाडा या कामांनी सुरुवात कविराजांची होतेंयं. घरातलं रांधा-वाढा उष्टी काढाचा फेरा पार घरच्या धन्यांवरच उलटून पडला आणि सरपंचांच्या नवऱ्याला ही झान कविता सुचली.

पुढे व्हिडिओत पत्नीची व्यथा देखील उत्तमरीत्या मांडली गेली आहे. मजेशीररित्या नवरा आणि त्याच्या मित्रांचे संदर्भ जोडले गेले आहे. त्यामुळे पुरुषमंडळीच्या बाजूने एकतर्फी न होता शेवटला महिलांची देखील बाजू उपहासात्मकरित्या मांडली गेली आहे. सदर व्हिडीओमध्ये कवीने स्वतःच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे कि संपूर्ण काल्पनिक आहे, ह्याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपण केवळ मनोरंजन म्हणून ह्या कडे पाहूया. हा लेख केवळ मनोरंजनात्मक उद्देशाने लिहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालादेखील नक्कीच मजा येईल. केवळ आणि केवळ निखळ मनोरंजन व्हावे, हाच ह्यामागे प्रामाणिक हेतू असून तुम्ही सुद्धा व्हिडीओ पाहून आनंद घ्या आणि आपले लेख वाचून कमेंट्स करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *