Breaking News
Home / मनोरंजन / ‘बाळा.. तुने नाही पाणी पाजिले’ ह्या माऊलीने बनवलेलं गाणं ऐकून तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

‘बाळा.. तुने नाही पाणी पाजिले’ ह्या माऊलीने बनवलेलं गाणं ऐकून तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

आपली टीम विविध विषयांवर लेखन करत असते हे आपण जाणताच. यानिमित्ताने विविध लेख, विविध व्हिडियोज हे डोळ्याखालून घातले जातात. बहुधा त्यातील अनेक हे मनोरंजक स्वरूपाचे असतात. त्यामुळे आम्हाला ही आनंद होतो आणि आम्ही त्यावर लिखाण केलं की आपल्याला वाचक म्हणून ही आनंद होतोच. आपल्या सकारात्मक प्रतिक्रियांतून ते कळत असतं. पण मंडळी, कधी कधी आम्हाला असा ही कंटेंट बघायला मिळतो ज्यामुळे जीवनातील गंभीर बाजू ही अधोरेखित होते.

आयुष्यात जेवढी मजा, मस्ती, आनंद हा गरजेचा असतो. तितकीच आयुष्याची ही गंभीर बाजू ही माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात एकप्रकारचा समतोल राहतो. भलेही आपल्या बाबतीत भल्याबुऱ्या गोष्टी नको होऊ देत, पण आजूबाजूला काय चालतं, याच ज्ञान असणं आवश्यक असते. त्यामुळे आपली कर्तव्य, अधिकार यांचीही जाणीव राहते. एककल्ली कारभार होत नाही. मनात आणि मग कृतीत समतोल साधला जातो. असाच काहीसा समतोल साधायला लावणारा एक व्हिडियो आमच्या टीमने आज बघितला.

हा व्हिडियो एका आजींचा आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आजी आपल्या घरातील पडवीत बसलेल्या असतात. कदाचित चहापाण्याची वेळ असावी. काही चिल्लीपिल्ली सुद्धा आपल्याला त्यांच्या समवेत दिसून येतात. या सगळ्यांचं चित्रीकरण करणारे दादा खरं तर यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी आजींच्या खणखणीत आवाजात गाणं ऐकलेलं असतं. त्या गाण्याचे शब्दही तसे अर्थपूर्ण आहेतच. त्यास या आजींच्या आर्त स्वरांची साथ लाभते आणि हे गाणं इतकं परिणामकारक होतं की डोक्यात अगदी फिट्ट बसत. आमच्या टीमने ही हा व्हिडियो काही वेळापूर्वी पाहिला होता. पण अजूनही त्या आजींचे सूर डोक्यात घुमताहेत. एरवी चटाचट लेखन करणारे हात आज काहीसे हळुवारपणे लेखन करताहेत. कारण या गाण्यात जे बोल आहेत, ते एक मृत आईच्या मनातील भावना व्यक्त करतात. या गाण्यातील / कवितेतील आई आता जगात नाही. त्यामुळे आता हंबरडा फोडून रडणाऱ्या मुलाला ती काहीसे खडे बोल सुनावते. तिच्या शेवटच्या क्षणांतील परिस्थिती व्यक्त करते. तिच्या मनातील भावना प्रत्येक ओळीबरोबर व्यक्त होत जातात अन, आपण निशब्द होत जातो. खरं तर आपल्या आजूबाजूला अनेकवेळा निरर्थक गोंधळ चालू असतो. पण खरं तर आपल्याला त्याचीच सवय झालेली असते.

त्यामुळे तो गोंगाट बरा वाटतो. पण हे असे अर्थपूर्ण लेखन, गायन मात्र आपल्याल निशब्द शांतता देतं. आपण आपल्या आयांशी चांगलं वागत असलो तर, आपल्याला या सगळया भावनांशी कधी संबंध येत नाही. पण प्रत्येक मुल, तसं नसतं. त्यामुळे त्या त्या माउलीला त्रास होत असतो. हा होणारा त्रास या शब्दांतून जेव्हा व्यक्त होतो तेव्हा तो त्रास आपल्याला ही अनुभवता येतो. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे या आजींचा आर्त स्वर त्यातील परिणामकारक इतकी वाढवतो की त्यांचा आवाज डोक्यातून जात नाही. पण अस असलं तरी आजी या गाण्याच्या शेवटी अगदी शांत असतात. शेगावच्या गजानन महाराजांचा जयजयकार करत त्या आपलं सादरीकरण संपवतात. त्यांचं हे सादरीकरण जवळजवळ काही वर्षे जुनं आहे. पण एखादी कला अगदी अस्स्लरीतीने सादर झाली की ती सदासर्वदा टिकून राहते. या आजींचा हा आवाज या गाण्याला ही परिणामकारकता देतो. आमच्या टीमने आतापर्यंत नेहमीच मनोरंजक विषयांवर जास्त प्रमाणात लिहिलं आहे. म्हंटलं आज त्यापलीकडे जाऊ आणि या विषयावर लिहू. थोडा समतोल आपणही आपल्या लेखनातून आणू. असो.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *