कलर्स मराठीवरील ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’ हि मालिका बघता बघता मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ह्या मालिकेची क्रेज इतकी वाढली कि, मराठी प्रेक्षकच नाही, तर अमराठी प्रेक्षकही अगदी तन्मयतेने, श्रद्धेने ह्या मालिकेकडे वळत चालला आहे. ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’ हि मालिका पौराणिक कथेवर आधारित असून संत बाळूमामा ह्यांचा बालपणीपासूनचा प्रवास आपल्याला ह्या मालिकेतून पाहायला मिळत आहे. मालिकेतील बहुतेक कलाकार नवीन असूनही त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर आपल्या कामाची छाप सोडली आहे. ह्या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे हे संत बाळूमामा ह्यांचे पात्र साकारत असून कोमल मोरे हि बाळुमामाची पत्नी सत्यवाची भूमिका निभावत आहे. ह्या मालिकेत एक लोकप्रिय भूमिका आहे, ती भूमिका म्हणजे तात्यांची. अभिनेता अक्षय टाक हा तात्यांची भूमिका निभावत आहे.
अक्षय २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्नी निकिता बुरांडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. ह्याच वर्षी ११ ऑगस्टला अक्षय आणि निकिता ह्या दोघांचाही साखरपुडा झाला होता. अक्षयने आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील सोशिअल मीडियावर शेअर केली होती. दोघांचाही विवाह २८ नोव्हेंबर ला आष्टी येथील गणेश मंगल कार्यालयात झाला. त्या अगोदर दोघांनीही प्रीवेडिंग फोटोशूट देखील केले होते. दोघांच्या प्रिव्हेडिंग फोटोशूट आणि व्हिडीओला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. पत्नी निकितासह अक्षयच्या परिवारात वडील सोमनाथ, आई मीनाक्षी आणि भाऊ अभय हे सदस्य आहेत. अक्षय टाक सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. परंतु अक्षय हा मूळचा पैठणचा आहे. अक्षयने आस्वाद प्राथमिक शाळा आणि श्रीनाथ हायस्कुल पैठण येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने आपल्या अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ थेटर आर्टस्’, मुंबई युनिव्हर्सिटी येथे ऍडमिशन घेतले. ‘अकॅडमी ऑफ थेटर आर्टस्’ मध्ये असताना त्याने अनेक नाटकांत कामे केली. सुरुवातीला त्याने काही दिवस मराठी नाटकांमध्ये कामे करायला सुरुवात केली. त्यातलेच ‘पार्टी’ हे एक नाटक आहे. ते शिकत असतानाच त्याने काही शॉर्टफिल्म मध्ये देखील कामे केलीत.
त्यातील ‘कलंक’ ह्या शॉर्टफिल्म साठी त्याने खूप मेहनत घेतली. त्याची हि शॉर्टफिल्म इतकी गाजली कि हिंदीतल्या प्रसारमाध्यमांनी देखील त्याची दखल घेतली. अक्षयने सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यामुळे त्याला ‘बाळुमामाच्या नावाने चांगभलं’ ह्या मालिकेत तात्यांची भूमिका करण्याची संधी मिळाली. आपल्या उत्तम अभिनयाने त्याने तात्यांची भूमिका जिवंत करून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. ह्या मालिकेतील पंच आणि बाळूमामा ह्यांच्यासोबतच अक्षयची भूमिका अगदी मजेशीर दाखवली आहे. त्याचा अभिनय आणि त्याचे संवादाचे अचूक टायमिंग ह्यामुळे प्रेक्षकांनाही त्याची भूमिका जास्त पसंत पडत आहे. ह्या मालिकेतून फक्त मनोरंजनच नाही तर भक्तीवाद देखील वाढत असल्याचे आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे अक्षय सारख्या मोठ्या कलाकाराचा अभिनय आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय आणि त्याच्या पत्नीला आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा कडून मनापासून शुभेच्छा.