Breaking News
Home / ठळक बातम्या / बिबट्याने केला पोलिसांवर प्राणघा’तक ह’ल्ला… संपूर्ण घटना झाली कॅमेरामध्ये कैद, बघा व्हिडीओ

बिबट्याने केला पोलिसांवर प्राणघा’तक ह’ल्ला… संपूर्ण घटना झाली कॅमेरामध्ये कैद, बघा व्हिडीओ

जागतिक तापमानवाढ हा विषय गेली अनेक वर्षे चर्चिला जात होता. पण या वर्षी आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या कडकडीत उन्हाळ्यामुळे हा विषय अगदी ऐरणीवर आल्याचं लक्षात येतंय. या तापमानवाढीस अनेक घटक कारणीभूत आहेत हे आपण जाणतोच. पण त्यातही वृक्ष आणि वन्य तोडणी ही यांची प्रमुख कारणं आहेत हे नक्की. बरं या दोन गोष्टींमुळे केवळ तापमानवाढ झाली आहे असंच नाही. तर अन्य अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत.

यातील एक प्रश्न तर आपण अनेकवेळा वृत्तपत्रांतून सातत्याने वाचत आलेलो आहोत. हा प्रश्न म्हणजे वन्य जीवांनी मानवी वस्तीत प्रवेश केल्याचा प्रश्न होय. वन्य जीवांचा नैसर्गिक अधिवासच आपण मनुष्य प्राण्याने नष्ट केल्याने हे प्राणी शहरं आणि गावांकडे वळलेले दिसतात. त्यातही बिबट्या या मार्जार कुळातील प्राण्यांचं मानवी वस्तींकडे वळण्याचं प्रमाण प्रचंड आहे हे आपण जाणताच. अगदी ताज उदाहरण घ्यायचं झालं तर पानिपत येथील उदाहरण घेता येईल. पानिपत येथे यमुना नदीच्या तीराजवळ वसलेलं, अतौलापूर हे गाव आहे. मागच्या आठवड्यातील शनिवारी येथे एक बिबट्या घुसला होता.

मानवी वस्तीत असं हिंस्त्र श्वापद आलं की घबराट उडतेच. याही वेळी तसंच झालं. पण तेथील ग्रामस्थांनी वेळीच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना सदर प्रकार कळवल्याने ही सगळी मंडळी तातडीने आली. पण अस असलं तरीही या बिबट्याला पकडायला नाही म्हणायला साडे पाच तास लागल्याचं एका वृत्त पत्राच्या लेखनावरून कळतं. तसेच या सगळ्या मोहिमेचा एक व्हिडियो ही वायरल झाला होता आणि त्यामुळे याविषयी अजून माहिती मिळाली. हरयाणा आय.पी.एस. २०१५ बॅचचे शशांक कुमार सावन साहेबांनी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर सदर व्हिडियो शेअर केला होता. सावन साहेब हे सध्या पानिपत येथे सुप्रीटेंडट ऑफ पुलिस या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडियोला आजतागायत, पावणे सात लाखांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून हा व्हिडियो किती वायरल झाला असेल याची आपल्याला कल्पना येईल. या व्हिडियोत आपल्याला पोलीस अधिकारी आणि वन कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. अर्थातच, बिबट्याला हे सगळे आपल्यावर हल्ला करत असावेत अस वाटणं साहजिक आहे. त्यामुळे प्रतिउत्तर म्हणून त्याच्याकडून ही हल्ला केला जातो. ही घटना या व्हिडियोत आपल्याला बघायला मिळते.

यात एक दोघा जणांवर तर या बिबट्याकडून अगदी जवळून हल्ला होतो हे दिसून येतं. पण सावन साहेबांनी लिहिलेल्या पोस्ट नुसार यातील दोन जणांना काहीसा मार लागला असला तरी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्याचं कळतं. तसेच स्वतः बिबट्या आणि ही सगळी मंडळी आता सुखरूप असल्याच ही या पोस्ट मधून कळतं. तसेच या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचे मानपत्र आणि २५ हजार आणि १० हजार प्रत्येकी देऊन गौरव केल्याचं कळतं. या संपूर्ण प्रकरणात या सगळ्या अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती आणि जवळजवळ त्यांच्या जीवावर बेतलं होतं, यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी आम्हाला अभिमान ही वाटतो. पण ही किंवा अन्य घटना जर मुळात घडल्याचं नसत्या तर बरं झालं असतं अस वाटून जातं. अर्थात त्यासाठी पर्यावरणीय मुद्दे लक्षात घेऊन सगळ्यांनीच त्यावर तोडगे शोधून काढत अंमलबजावणी केली पाहिजे हे नक्की. जेणेकरून आता होत असलेले प्रकार कमी कमी होत थांबवता तरी येतील. असो. पुढे काय वाढून ठेवलं आहे ते येणारा काळच दाखवून देईल. असो.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *