बिस्कीट हा शब्द ऐकल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का. काय करणार तोंडाला पाणी सुटणारच, कारण हि वस्तूच इतकी स्वादिष्ट आहे. तुम्ही नाश्त्यात बिस्किटं जरूर खात असाल. सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये चहा सोबत बिस्किटं खाण्याची मजाच काही और असते. वेळेसोबतच बिस्कटाचं रंगरूप सुद्धा बदलत गेले, चव सुद्धा बदलत राहिली. परंतु बिस्किटांना चहा सोबत खाण्याची मजा अजूनपर्यंत नाही बदलली. आपण अनेक प्रकारचे गोड खारट बिस्कीट खातो. लोकं अनेक वर्षांपासून बिस्किटं खात आहेत.
परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर कधी लक्ष दिलं नसेल. आजकाल बिस्किटांवर खूप प्रकारच्या डिझाइन्स असतात. ह्या डिजाईन व्यतिरिक्त बिस्किटांवर छोटे छोटे छिद्र सुद्धा असतात. तुम्ही बिस्कीट खात असताना त्यावर छोटे छोटे छिद्र तर नक्कीच पाहिले असतील. किंबहुना काहीवेळा कदाचित हा विचारही आला असेल कि हे छिद्र काय असावेत बरे. तर मग आज आपण ह्या लेखात पाहुयात बिस्किटांवर छोटे छोटे छिद्र का असतात ते. तसेतर तुम्ही खूपवेळा विचार केला असेल कि हि फक्त डिजाईन साठी असेल, तर असं बिलकुलच नाही. हि फक्त डिजाईन नाही, ह्यामागे एक खास कारण सुद्धा आहे. क्रीम वाल्या बिस्किटांवर हे छिद्र जास्त पाहायला मिळतात.
आताच काही दिवसांपूर्वी बिस्किटं बनवणाऱ्या प्रसिद्ध बुरबॉन कंपनी युनाइटेड बिस्कीट फॅक्ट्रीच्या टीम मॅनेजर मार्क ग्रीनवेल ने ह्या गोष्टीचा खुलासा केला कि शेवटी काही बिस्किटांमध्ये छिद्र तर काही बिस्किटांमध्ये छिद्र का नसतात. मार्क ने सांगतिले कि काही सॉफ्ट बिस्किटं जसे कि क्रीम वाले बिस्किटांतून हवा जाण्यासाठी अशाप्रकारचे छिद्र केले जातात. बिस्किटं बनवण्याच्या दरम्यानच त्यात सर्वात अगोदर क्रीम भरलं जाते. त्या दरम्यान ते गरम होतात. नंतर वरून बिस्कीट ठेवलं जाते. आतून हवा निघण्यासाठी जागा मिळाली नाही तर, बिस्किटं तुटून जातील आणि त्यांना मॅनेज करणं मुश्किल होऊन जाईल. बिस्किटांमधून हवा जाण्यासाठी जागा राहावी ज्यामुळे बिस्किटं तुटणार नाहीत ह्या कारणामुळे बिस्किटांवर छोटे छोटे छिद्र असतात.