देशभरात रोजच अश्या नवीन नवीन घटना पाहायला आणि ऐकायला मिळतात, जे जाणून सगळे आश्चर्यचकित होतात. काही घटना अश्या सुद्धा असतात ज्या आपल्याला खूप भावुक करतात. रोजच न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रात अश्या अनेक प्रकारच्या घटना आपल्याला दिसतात. ह्याच दरम्यान उत्तर प्रदेश येथील अमेठी जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे, हि घटना जाणून घेतल्यावर तुम्ही चकित व्हाल. खरंतर, येथील त्रिलोकपुरी गावातील कोणी अनोळखी व्यक्ती बुधवारी एका बॅग मध्ये ५ महिन्याचे बाळ सोडून गेला. पीआरवी पोलिसांना बुधवारी संध्याकाळी उशिरा हि सूचना मिळाली कि बॅगमध्ये सामानासोबत कोणी बाळ सोडून गेले आहे. ह्याची सूचना कॉलरने यूपी ११२ ला दिली. ज्यावर पीआरवी २७८० राकेश कुमार सरोज आणि चालक उमेश दुबे हे कोतवाली मुशिगंज क्षेत्रातील त्रिलोकपूर आनंद ओझा जवळील परिसरात पोहोचले. जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तर आतमध्ये एक नवजात बाळ होते त्यासोबतच थंडीचे काही कपडे, चपला, जॅकेट इत्यादी सामान होते. सोबत पाच हजार रुपये सुद्धा ठेवले होते. ह्या सर्व वस्तूंसोबतच अज्ञात व्यक्तीने एक पत्र सुद्धा ठेवले होते.
पत्रात लिहिली होती हि भावुक करणारी गोष्ट
ह्या पत्रात अज्ञात व्यक्तीने अशी गोष्ट लिहिली होती कि कुणीही भावुक होऊन जाईल. पत्रात हे लिहिले आहे कि, “हा माझा मुलगा आहे. ह्याला मी तुमच्याजवळ ६-७ महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे, ह्यामुळेच मी माझे बाळ तुमच्याजवळ ठेवत आहे. ५००० महिन्यांच्या हिशोबानुसार मी तुम्हांला पैसे देईल. तुम्हाला हाथ जोडून विनंती आहे कि कृपया ह्या बाळाचा सांभाळ करा. माझ्या काही मजबुरी आहेत. ह्या मुलाची आई नाही आहे आणि माझ्या कुटुंबात ह्या बाळासाठी धोका आहे, ह्यासाठी सहा-सात महिन्यांपर्यंत तुम्ही हे बाळ तुमच्याजवळ ठेवा.”
त्या व्यक्तीद्वारा पत्रात लिहिलेल्या गोष्टी वाचून असंच वाटतं कि हि व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत फसली आहे, ज्यामुळे त्याने असे काम केले. ह्या व्यक्तीने पत्रात पुढे लिहिले आहे कि, “सर्व काही ठीक केल्यावर मी तुम्हांला भेटून माझे बाळ घेऊन जाईल. कोणी तुमच्याकडे बाळ सोडून गेले आहे, हि गोष्ट कोणाला सांगू नका. नाहीतर सर्वाना हि गोष्ट माहिती होईल. सर्वाना हे सांगा कि, हे बाळ तुमच्या कोण्या मित्राचे आहे, ज्याची बायको इस्पितळात को मा मध्ये आहे. तेव्हापर्यंत बाळ तुमच्याकडेच ठेवा. मी तुम्हाला भेटून सुद्धा हे बाळ देऊ शकलो असतो, परंतु हि गोष्ट माझ्यापर्यंतच राहिली तर योग्य आहे, कारण माझे एकच बाळ आहे. तुम्हांला अजून पैसे हवे असतील तर सांगा, मी अजून देईल. फक्त, मुलाला ठेवून घ्या, ह्याची जबाबदारी घेण्यास घाबरू नका. देव ना करो, जर काही झाले तरी मी तुम्हाला जबाबदार धरणार नाही. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.”
पीआरवीने बाळ मिळण्याची माहिती कोतवाली प्रभारी मिथिलेश सिंह ह्यांना दिली. ज्यावर त्यांनी बाळाला कॉलरकडेच सुपूर्द करण्याचा आदेश दिला. ह्या अनोखी घटनेवर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. कोणी ह्या बाळाच्या आईला वाईट बोलत आहेत. तर कोणाला ह्या घटनेत एका वडीलाचे स्नेह आणि मजबुरीमधले प्रेम दिसत आहे. ह्या सारख्या घटना अनेकदा माणसाला हैराण आणि विचलित करून सोडतात, ज्याप्रकारची हि घटना समोर आली आहे, ते पाहून असंच वाटत आहे कि ह्या बाळाचे बाप खूप मोठ्या मजबुरीमध्ये आहे.