Breaking News
Home / मनोरंजन / बॅगा नाही तर चक्क बाईक डोक्यावर घेऊन बसवर चढला हा व्यक्ती, पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

बॅगा नाही तर चक्क बाईक डोक्यावर घेऊन बसवर चढला हा व्यक्ती, पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

आपल्यापैकी अनेकांनी बाहुबली हा सिनेमा पाहिला असेल. ज्यांनी पाहिला त्यांना तर बाहुबलीची ताकद माहिती असेल, पण ज्यांनी नसेल पाहिला त्यांनाही बाहुबली सिनेमाचा अंदाज आला असेल. असा उंचापुरा, शक्ती, बायसेप असलेला हिरो बघितल्यावर या हिरोच्या ताकदीचा आपल्याला अंदाज येतोच. प्रभास उर्फ अमहेंद्र बाहुबली या चित्रपटात आपल्याला अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन दाखवतो. कुठे तो शिवलिंग उचलतो, कुठे भला मोठा उंचच उंच असा असणारा पुतळा दोर पकडून धरतो. कुठे हत्तीला शमवतो, तर कुठे भला मोठा रथ एकटा ओढतो. असं काही काही करून बाहुबली आपलं शक्ती प्रदर्शन करत असतो. पण प्रभासला खऱ्याखुऱ्या आयुष्यात हे करायला लावले तर जमेल का? तर अजिबात नाही. कारण सिनेमा हा खोटा असतो. त्यात दाखवल्या जाणाऱ्या बहुतांश गोष्टी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केल्या जातात. पण आजवर आपण खऱ्या आयुष्यात मात्र अनेक बाहुबली बघितले असतील.

कुणी सिलेंडर उचलले असेल. कुणी पिसाळलेल्या कुत्र्याला कंट्रोल केले असेल, कुणी एखादा जाडजूड नवरदेव उचलून आपले कसब दाखवले असेल. आणि स्वतःला बाहुबली म्हणत आपण आपलीच वाह वाह करत असतो. कधी कधी एखाद्या पैलवान माणसाला सुद्धा आपण बाहुबली म्हणतो. पण आज जो व्हिडीओ आमच्यासमोर आला आहे, तो पाहून आम्ही अक्षरशः थक्क आणि हैराण झालो. आणि त्याच क्षणी आमच्या लक्षात आलं, यही है असली बाहुबली…

कारण विषय असाय भावांनो… आजवर तुम्ही गर्लफ्रेंडला, बायकोला उचलला असेल. मित्राला डोक्यावर घेऊन नाचवले असेल बायकोला घेऊन जेजुरीचे गड चढला असाल. पण आपल्या समोर आता ज्या भावाचा हा व्हिडीओ आहे, त्याने एक असे कसब दाखवले आहे, जे भल्याभल्यांना जमणार नाही. अगदी एखादा अट्टल पैलवान, जिम करणारा बॉडी बिल्डर आणला तरीबी हे शक्य नाही. कारण विषय हार्ड आहे भावांनो… आम्ही उगाच ऐरा-गैऱ्याला बाहुबली म्हणणार नाहीत.

त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका सामान्य आणि किरकोळ शरीरयष्टी असणाऱ्या माणसाने बाहुबलीसारखी आपल्या खांद्यावर गाडी उचलली आहे. विशेष म्हणजे त्याने गाडी फक्त उचलली नाही तर गाडी घेऊन तो चालताना दिसत आहे. चालताना म्हणजे तो काही सपाट रस्त्याने चालत नाहीये तर तो चक्क ही गाडी घेऊन कुठल्याही आधाराविना एसटीवर नेऊन ठेवतो आहे. आधीच गाडीचं एवढं मोठं वजन तेही त्याने फक्त डोक्यावर घेतले आहे. किती कष्ट आणि किती जबरदस्त इच्छा शक्ती…

दुचाकी असली तरी कमीत-कमी त्या गाडीचं वजन हे 100 किलोच्या आसपास असेल. 100 किलो वजन त्यासोबत बॅलन्स करून गाडीला खांद्यावर घेऊन त्या सिडीवरून वर जाणे आणि गाडी वर ठेवणे, हे किती अवघड आहे, याचा अंदाज आपल्याला व्हिडीओ बघताना येतोच. हे दिसतंय तितकं सोप्प नाही भाऊ…. त्यामुळे चित्रपटात तरी प्रभासने खरोखरी अवजड वस्तू उचलल्या नसल्या तरी या माणसाने आपली खरोखर दुचाकी उचलली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नेटकरीही हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. या व्हिडीओबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही की हा व्हिडीओ कुठला आहे, व्हिडीओमधील व्यक्ती नेमकी कोण आहे. मात्र हा व्हिडीओ प्रेरणादायी आहे, हे नक्कीच. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *