Breaking News
Home / मराठी तडका / बेबी मावशी आहे ह्या लोकप्रिय सुपरस्टारची मुलगी, बघा जीवनकहाणी

बेबी मावशी आहे ह्या लोकप्रिय सुपरस्टारची मुलगी, बघा जीवनकहाणी

गेल्या काही दिवसांपूर्वी, मणिराज पवार या गुणी अभिनेत्याबद्दल मराठी गप्पावर एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मणिराज याला आपण जसे नाटक, जाहिराती यांतील कामासाठी ओळखतो, तसेच सध्या चालू असलेल्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील रणजीत ढाले पाटील या भूमिकेसाठी विशेष ओळखतो. या मालिकेने, अतिशय कमी काळात, प्रेक्षकांच्या मनात, मानाचं स्थान मिळवलंय. रणजीत या व्यक्तिरेखेप्रमाणेच, यातील विविध व्यक्तिरेखा फार प्रसिद्ध होत आहेत. त्यातील एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे बेबी मावशी. हि व्यक्तिरेखा साकारली आहे, ‘गार्गी फुले-थत्ते’ यांनी. १८ ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा ! तसेच, या शुभ दिवसानिमित्त, त्यांच्या अभिनय प्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न.

गार्गी या स्व र्गीय निळू फुले यांच्या कन्या. निळू फुले, हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं अजरामर नाव. वैविध्यपूर्ण भूमिका, विचारी वृत्ती, संयत वागणं, मोजकं बोलणं यासाठी आपण त्यांना ओळखतो. असंच काहीसं व्यक्तिमत्व गार्गी यांचंही आहे. गार्गी यांचं बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. वडिलांप्रमाणेच गार्गी यांच्या आईसुद्धा रेडियोच्या माध्यमातून कलाक्षेत्राशी संबंधित. त्यामुळे घरी वाचन, कालाक्षेत्रासाठी पोषक वातावरण. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार, शालेय शिक्षण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी, म्हणजे निळू फुले यांनी, त्यांना नाट्यशिबिरातून सहभागी होण्याचा सल्ला त्यांना दिला. गार्गी यांनी तो सल्ला मानत, नाट्य शिबिरं, अभिनयाचं प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम यांच्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली. हळू हळू अभिनायाची आवड होती, तिचं पूर्णवेळ काम करण्यात रुपांतर झालं. पण हे फक्त अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांना वेशभूषा काम करण्यातही रस घेतला. याच काळात, समन्वय या प्रायोगिक नाट्यसंस्थेशी त्या जोडल्या गेल्या ते आजतागायत. या नाट्यसंस्थेतून त्यांनी अभिनय, वेशभूषा अशा विविध कामांतून स्वतःचं योगदान दिलं.

काही वर्षांपूर्वी एका मालिकेसाठी त्यांना विचारणा झाली. त्या मालिकेचं नाव, ‘कट्टी बट्टी’. यात त्यांनी अभिनय तर केलाच सोबत काही भागांसाठी, वेशभूषेचं कामही केलं. सध्या त्यांची, ‘राजा राणीची गं जोडी’ हि मालिका चालू आहे. यातील, मनमिळाऊ बेबी आत्या हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. पण कट्टी बट्टी आणि ‘राजा राणी’ या मालिकांच्या दरम्यान आलेल्या एका मालिकेतील त्यांच्या एका भूमिकेला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील, ईशा या व्यक्तिरेखेची आई, हि ती भूमिका. स्वभावाने साधी आणि निरागस अशी हि व्यक्तिरेखा, गार्गी यांनी अगदी उत्तमरीतीने वठवली. त्यांच्या टेलीविजनवरील या प्रवासात, ‘चला हवा येऊ द्या : शेलिब्रिटी पॅटर्न’ या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी, उत्तम स्कीट्स सादर केले आहेत.

गार्गी ह्यांचे लग्न ओमकार थत्ते ह्यांच्याशी २००७ मध्ये झाले. ओमकार हे पुण्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना अनय नावाचा मुलगा आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्यांना कुकिंग ची आवड आहे. तसेच त्यांनी शेअर केलेल्या एका सोशल मिडिया पोस्टमध्ये त्यांनी, त्यांच्या सुरेल आवाजात आर. डी. बर्मन यांना आदरांजली वाहिली होती. गार्गीजींचा कलाक्षेत्राशी संबंध लहापणापासून आहे. तसेच, त्यांनी कित्येक वर्ष स्वतः विविध माध्यमांतून कलाक्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे. पण तरीही प्रसिद्धीचा मोह आहे असं कधीच जाणवत नाही. कदाचित हाच त्यांचा साधा स्वभाव, त्यांच्या मायाळू आणि मनमिळाऊ व्यक्तिरेखांमधून झळकतो आणि प्रेक्षकांना आवडतो. आज वरच्या वाटचालीत त्यांनी जे काम केलं ते सदैव उत्तम केलंय. यापुढेही त्या, नेहमीच प्रेक्षकांसाठी, उत्तम व्यक्तिरेखा घेऊन येतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *