सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांचे तर कधी प्राण्यांनी माणसांवर ह’ल्ले केल्याचे व्हिडीओ सोशल व्हायरल होतात. एका माणसानं बैलाची खोडी काढली आणि रागाच्या भरात बैलानं त्याला चांगली अद्दल घडवल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळाली आहे. सहसा प्राणी माणसांवर विनाकारण हल्ला करत नाहीत पण माणसानंच खोडी काढली तर प्राणी देखील त्याला सोडत नाहीत हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. शेवटी कर्म असते…. आणि आपण जे पेरतो तेच उगवत असते. काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यामुळेच कदाचित त्यांना पाळीव प्राणी असं म्हटलं जातं. परंतु या पाळीव प्राण्यांना जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर झाला तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते घातक ठरू शकतात.
मग अशावेळी त्या चवताळलेल्या प्राण्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं. परंतु काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शांत उभा असलेल्या बैलाशी पंगा घेणं एका माणसाला चांगलंच महागात पडलं. मग काय आला अंगावर, घेतला शिंगावर या म्हणीप्रमाणे बैलाने या माणसाला चांगलीच अद्दल घडवली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.आ बैल, मुझे मार असे म्हणत या वृद्ध व्यक्तीने बैलाशी पंगा घेतला आणि मग बैलाने पण मागे पुढे न बघता थेट शिंगावर बसवून उडवला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बैल रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा आहे आणि इकडे तिकडे पाहत आहे. बहुदा तो अन्न मिळण्याची वाट पाहत आहे.
मात्र या बैलाला आपल्या घराच्या आसपास पाहून एक वृद्ध व्यक्तीला राग येतो. आणि अंगात किडे असणारं हे म्हातारं थेट घरात जाऊन काठी घेऊन आले. बर म्हाताऱ्याने एकदा डिवचून बघायचं आणि हाकलून लावायचं…. पण म्हाताऱ्याच्या अंगात पण ना ना कळा…
शेवटी म्हाताऱ्याने हातात असलेल्या काठीने बैलाला बडवायला सुरुवाती केली. पहिल्या दोन वार पहिलानं झेलले मात्र तिसरा वार डोक्यावर बसला आणि बैलाचं मस्तक फिरलं आणि त्यानं थेट या वृद्धाला शिंगावर घेतलं. आणि शिंगावर घेऊन असं जोरदार आपटले की, पुन्हा म्हातारं कधीच बैलाच्या जवळ पण जाणार नाही. बैलाशी पंगा घेणं या आजोबांना चांगलंच महागात पडलं आहे. आपल्याशी पंगा घेणाऱ्या आजोबांना धडा शिकवून हा बैल पुढे जातो आणि आजोबा काही वेळ आहे त्याच ठिकाणी बसलेले दिसून येत आहेत.
बघा व्हिडीओ :