नेहा पेंडसेने मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदीच्या छोट्या पडद्यावर सुद्धा काम केले आहे. ती कधी ‘मे आय कमी इन मॅडम’ तर कधी ‘बिग बॉस १२’ मुळे चर्चेत राहिली. मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस 12 ची स्पर्धक नेहा पेंडसे काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून ती आपल्या प्रियकरा सोबत चर्चेत असून, तिने तिचा प्रियकर शार्दुल सिंह सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो फोटो पहिल्यानंतर नेहाच्या प्रियकराची लठ्ठपणामुळे खिल्ली उडवली गेली. त्यावेळी नेहा काही म्हणाली नाही, परंतु एका मुलाखतीत खिल्ली उडविणार्यांना तिने चांगलेच प्रतिउत्तर दिले. लोकांनी नेहाच्या प्रियकराच्या शरीराची चेष्टा केली आणि तिच्या पसंतीवर प्रश्न केले. नेहाने आपल्या बॉयफ्रेंडला लठ्ठ बोलणार्यांना धारेवर धरलं आहे. ती म्हणाली कि ती ट्रॉलर्सना चांगलाच धडा शिकवेल.
बॉम्बे टाईम्स मध्ये दिलेल्या मुलाखतीत नेहा पेंडसे म्हणाली,’ शार्दूलच का? माझीही कितीतरी वेळा खिल्ली उडवली गेलीय. जेव्हा मी ‘मे आय कमीन मॅडम’ या मालिकेत वजन वाढवले होते. तेव्हा मलासुद्धा निशाण्यावर घेतले गेलेले.’ नेहा पुढे म्हणाली की, असेही होऊ शकते की ,तो कदाचित शारीरिक, मानसिक किंवा एखाद्या आजाराशी लढत असावा. शार्दुलचा तर मनोरंजनाच्या इंडस्ट्रीशी काहीच संबंध नाही. तो एक व्यावसायिक आहे आणि त्याची खिल्ली उडवणे हास्यास्पद आहे. हाच मिळाला का, दुसरा कोणी नाही मिळाला का? लोकांनी असे विधाने करायला नकोत.’ नेहाने ट्रॉलर्सवर निशाणा साधत म्हटले कि, ट्रॉलर्सना हा अधिकार कोणी दिला कि ते कोणालाही ट्रॉल करू शकतात ते. एखाद्या दर्शकानुसार ते कलाकारांच्या लुक्सवर बोलू शकतात, पण त्यांना अश्याप्रकारे टार्गेट करू शकत नाही.
नेहा पुढे म्हणाली, ‘मी खिल्ली उडविणार्यांना विचारू इच्छिते, तुम्हाला माहिती आहे का, तो मला किती खुश ठेवतो ते? तुम्ही कोण आहात हे ठरवणारे की, तो माझ्यासाठी चांगला आहे का नाही? मला माहिती आहे ही नकारात्मकता रागामुळे येते. कोणी लक्ष्य वेधून घेण्यासाठी, तर कोणी आपल्या आयुष्यात लक्ष्य नसल्यामुळे येते.’ लग्नाच्या प्रश्नावर नेहा म्हणाली की, “आम्ही दोघे 2020 मध्ये महाराष्ट्रीयन रीती-रिवाजानुसार लग्न करू.” नेहाने सांगितले कि शार्दूलने सध्या अंटार्टिका क्रूजचे फोटोज दाखवले आहेत, आम्ही कदाचित अश्या ठिकाणी हनिमूनसाठी जाऊ शकतो. नेहा पेंडसेचा बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीतला नसून, तो व्यवसायाने बिझनेसमॅन आहे.