देश ज्या वेळी एक महासंकटाशी सामना करत आहे, त्याच दरम्यान महानगरी मुंबई मधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने मोहित करणारे अभिनेता इरफान खान आता ह्या जगात राहिले नाही. बुधवार दिनांक २९ एप्रिलला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. बॉलिवूड अभिनेते इरफान खान ह्यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. ते मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये भरती होते. त्यांची प्रकृती खूप गंभीर होती. रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, इरफान खान हे पोटाच्या समस्येपासून लढत होते. त्यांना कोलोन इन्फेक्शन (Colon Infection) झाले होते.
दिग्दर्शक शुजीत सरकार ह्याने इरफान खान ह्यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्विट करून लिहिले कि, ‘माझा प्रिय मित्र इरफान. तू लढलास आणि लढलास आणि लढलास. मला तुझ्यावर नेहमी अभिमान राहील. आपण पुन्हा भेटणार. सूतापा आणि बाबील ह्यांना माझ्या संवेदना. तुम्ही सुद्धा लढल्या. सूतापा ह्या लढाई मध्ये तू जे काही देऊ शकत होती, तुने ते सर्व दिलेस. ओम शांती. इरफान खान ह्यांना सलाम.’ इरफान खान ह्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर प्रत्येकजण आपलं दुःख व्यक्त करत आहे. अमिताभ बच्चन ह्यांनी सुद्धा दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूडच्या अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये शामिल असलेले इरफान खान ह्यांचे असे अचानक निघून जाण्याने त्यांचे फॅन्स आणि बॉलिवूड सेलिब्रेटी दुःखात आहेत. दोन वर्षांअगोदर मार्च २०१८ मध्ये इरफान खान ह्यांना न्यूरो इंडोक्राइन ट्युमर नावाच्या आजाराची माहिती झाली होती. परदेशात ह्या आजारावर उपचार करून इरफान खान ठीक झाले होते. भारतात परतल्यानंतर इरफान खान ह्यांनी ‘अंग्रेजी मिडीयम’ ह्या चित्रपटात काम केले होते. कोणाला माहिती होते कि हा चित्रपट इरफान खान ह्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट असेल म्हणून. इरफान खान ह्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.