शाळेचे दिवस सर्वात चांगले दिवस असतात. ती वेळ अशी असते कि जेव्हा आपण नविन मित्र बनवतो. अर्थात शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण संपतो, तेव्हा प्रत्येकाचा मार्ग वेगळा होतो. या नंतर खूप कमी मैत्री तशीच राहते. अशातच आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही कलाकारां विषयी सांगणार आहोत. जे कधी एका शाळेत शिकले. यातील काही एक दुसऱ्याचे क्लासमेट आहेत. अशातच एवढे वर्ष लोटून सुद्धा ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शाळेच्या वेळेत त्यांनी विचारही केला नसेल कि आपण एकाच बॉलिवूडचा हिस्सा बनू आणि सोबत काम करू.
नव्या नवेलीनंदा आणि आर्यन खान
अमिताभ बच्चन ची नात म्हणजे त्यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी नव्या नंदा आणि शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान दोन्ही नामवंत कलाकारांची मुले आहेत. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो सतत झळकत असतात. किती तरी वेळा दोघांचे सोबत फोटो सोशल मीडियावर दिसतात. याचे हे एक कारण आहे ते लंडन मधील एका शाळेत एकत्र शिकतात.
सलमान खान आणि आमिर खान
कमी लोकांना माहिती असेल सलमान खान आणि आमिर खान हे दोघेही एकाच शाळेत शिकले. बॉक्स ऑफिसवर ह्यांच्या चित्रपटांनी ३०० करोड हुन जास्त बिझनेस केलेला आहे. ‘अंदाज अपना अपना’ मधे दोघांनी सोबत काम केले आहे आणि या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले. आत्ता सुद्धा सलमान आणि आमिर चांगले मित्र आहेत.
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर
‘बागी’ चित्रपटात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या दोघांच्या जोडीला खूप पसंत केलं होतं. हे दोघेही नविन जनरेशन चे सुपरस्टार आहेत. दोघांचेही फॅन्स करोडो मधे आहेत. खास बातमी ही आहे की हे दोघे फक्त एकाच शाळेत शिकले नाहीत तर चांगले क्लासमेट्स आहेत. श्रद्धाने करण जोहर बरोबर चॅट करताना सांगितले हाते की माझा शाळेत असताना टायगर श्रॉफ बरोबर क्रश होता.
अथिया शेट्टी आणि कृष्णा श्रॉफ
सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा दोघीही एकाच शाळेत शिकत होत्या आणि क्लासमेट्स होत्या. आत्ता सुद्धा त्या चांगल्या मैत्रीणी आहेत आणि दोघी एकत्र फिरत असतात. कृष्णाला चित्रपट सृष्टीत काहीही इंटरेस्ट नाही तर अथिया ‘मोतीचूर चकनाचूर मधे दिसली होती.
ट्विंकल खन्ना आणि करण जोहर
ट्विंकल आणि करण बॉलिवूडचे पॉप्युलर BFF म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर आहेत. करनच्या चॅट शो मधे ते दोघे या विषयावर खूप बोलले होते.
हृतिक रोशन आणि उदय चोप्रा
ही गोष्ट कदाचित सर्वाना माहीती नसेल हृतिक रोशन आणि उदय चोप्रा दोघेहि बालपणीचे चांगले मित्र आहेत. यांची मैत्री इयत्ता ४ थी पासून आहे.दोघांनी धूम २ मधे सोबत काम केले. आजही या दोघांची मैत्री तशीच आहे जशी बालपणी होती.