Breaking News
Home / बॉलीवुड / बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत आपल्या पतींपेक्षा वयाने खूप मोठ्या, ५ नंबरची अभिनेत्री बघा

बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत आपल्या पतींपेक्षा वयाने खूप मोठ्या, ५ नंबरची अभिनेत्री बघा

‘ना उम्र का हो, ना जन्म का हो बंधन’ गाण्याची ही ओळ काही लोकांना खूप लागू होते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात असते, तेव्हा तिला जात, छोटा किंवा मोठा दिसत नाही किंवा त्या व्यक्तीच्या वयामध्ये किती अंतर आहे, ह्याचा सुद्धा फरक पडत नाही. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही अभिनेत्रींची ओळख करुन देणार आहोत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना आपला सोबती म्हणून निवडले आहे.

प्रियांका चोप्रा

गेल्या वर्षी देसी गर्ल प्रियंका चोप्राने अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास सोबत लग्न केले. या दोघांच्याही लग्नाने गेल्या वर्षी खूप मथळे बनवले होते. निक जोनास हा पत्नी प्रियंका चोप्रापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २६ वर्षांचा आहे. जेव्हा दोघांचे लग्न झाले होते, तेव्हा लोकांनी त्यांच्या वयाच्या अंतरांबद्दल बरंच ट्रॉल केले होते. परंतु याचा परिणाम या दोघांवर झाला नाही आणि आज ते दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत.

ऐश्वर्या राय
२००७ साली अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले होते. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. ऐश्वर्या ४५ वर्षांची आहे तर अभिषेक ४३ वर्षांचा आहे. असे असूनही, हे दोघेही एकमेकांना चांगले समजून घेतात आणि दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. तथापि, दोघांच्या वयोगटात फारसा फरक नाही, परंतु तरीही काही लोकं लग्नाच्या वेळी त्यांची खिल्ली उडवत होते.

अर्चना पूरण सिंह

अर्चना पूरन सिंग ही बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने अनेक हिट चित्रपटांमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत कि, अर्चना पूरन सिंगने आपल्यापेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या परमीत सेठीशी लग्न केले होते. वयातील अंतर नक्कीच अधिक आहे, परंतु दोघांमधील प्रेम बरेच खोल आहे.

नम्रता शिरोडकर

नम्रता शिरोडकर एकेकाळी बॉलिवूड हिट अभिनेत्री होती. नम्रताने ‘कच्चे धागे’ आणि ‘वास्तव’ सारख्या सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. मिस इंडिया म्हणून काम करणार्‍या नम्रता शिरोडकर यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९८ मध्ये ‘जब प्यार कोई से से होता है’ या चित्रपटाद्वारे केली होती. २००४ मध्ये आलेल्या ‘रोक सको तो रोक लो’ या सिनेमात ती कथावाचकांच्या भूमिकेत दिसली होती. नम्रताने त्याच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्न केले आहे.

प्रिटी ज़िंटा

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने जेन गुडिइनफशी लग्न केले आहे. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेन लॉस एंजेलिसमध्ये राहतो आणि फायनॅन्शिअल अनॅलिस्ट म्हणून काम करतो. दोघांच्या वयामध्ये खूपच फरक आहे. जेन गुडइनफ हा प्रीती झिंटापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

सोहा अली खान

सोहा अली खान पतौडी कुटुंबातील मुलगी आहे. सोहा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोहाने बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू सोबत प्रेम विवाह केला आहे. दोघांनाही इनाया नावाची एक सुंदर मुलगी आहे. कुणाल सोहापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.