Breaking News
Home / बॉलीवुड / बॉलिवूडच्या ह्या मराठी अभिनेत्रीने फक्त परदेशात राहण्यासाठी केले होते लग्न, बघा कोण आहे ती अभिनेत्री

बॉलिवूडच्या ह्या मराठी अभिनेत्रीने फक्त परदेशात राहण्यासाठी केले होते लग्न, बघा कोण आहे ती अभिनेत्री

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम ही गेल्या काही वर्षांत झपाट्याने पुढे आलेली माध्यमं आहेत. या माध्यमांतून दाखवले जाणारे वेबसिनेमे, वेब सिरीज यांची चर्चा सातत्याने होत असते. अनेक विषय बोल्ड आणि बिनधास्तपणे या माध्यमातून मांडले जातात, त्यामुळे तरुणाईच्या विशेष जवळ असलेलं असं हे माध्यम आहे. या नवं माध्यमातून अनेक चेहरे सातत्याने पुढे आले आहेत. राधिका आपटे हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण. नेटफलिक्स वरील विविध विषयांवरील वेब सिरीज मधून ही अभिनेत्री लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे भारतात नेटफ्लिक्सचा राधिका आपटे हा सेलिब्रिटी मुख्य चेहरा आहे, असं समीकरण प्रेक्षकांमध्ये मानलं जातं.

नुकतंच नेटफ्लिक्सने या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत विक्रम मासी या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा वेब संवाद घडवुन आणला. विक्रम हा सुद्धा नेटफ्लिक्सच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. या दोघांच्यात संपन्न झालेल्या खुसखुशीत संवादात राधिकाने स्वतःची लग्न संस्थेबद्दलची मते व्यक्त केली आणि त्यांच्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या संवादात दोघांनी एकमेकांना प्रश्न विचारले जे प्रेक्षकांच्या मनात होते पण इतर मुलाखतींदरम्यान विचारले गेले नव्हते. त्यात एका प्रश्न असा होता की राधिका ने लग्न कधी केलं. त्याला उत्तर देताना राधिका म्हणाली, की ती परदेशात असताना इथे विजा मिळणं सुकर व्हावं म्हणून तिने लग्न केलं. पण पुढे त्याबद्दल स्पष्टीकरण देताना तिने स्पष्ट केलं, की तिला तिचा नवरा बेनेडिक्ट आवडत असे. त्या दोघांमध्ये प्रेम भावना निर्माण झाली होती आणि त्यांना एकत्र राहण्याची इच्छा होती. यास पार्श्वभूमी आहे ती राधिका इंग्लंड येथे कंटेपररी नृत्यप्रकार शिकण्यास गेली होती त्या काळाची.

२०११ साली राधिकाने इंग्लंड येथे जाऊन कंटेपररी नृत्यप्रकार शिकण्यास सुरुवात केली. त्याआधी पुणे आणि मुंबई येथे तिने काही कालाकृतींमधून अभिनय केलेला होता. तसेच तिने विद्यार्थी जीवनात कथ्थकचे धडे घेतले होते. त्यामुळे फार पहिल्यापासून तिचा कलेशी संपर्क होता. त्यात अजून काही शिकावं असं वाटल्याने राधिका इंग्लंड येथे राहण्यास गेली. तिथेच तिची भेट तिचा नवरा बेनेडिक्ट टेलर याच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांना एकत्र राहण्याची इच्छा होती. राधिका या मुलाखतीत म्हणते की तिचा लग्न संस्थेवर जास्त विश्वास नव्हता. पण तेथील वास्तव्यासाठी विजा असणं आवश्यक होतं. पण एकट्या व्यक्तीस विजा मिळण्यास अडचणी येतात तर, लग्न केल्यास इंग्लंड येथे वास्तव्य करण्यास विजा मिळण्याची प्रक्रिया सुलभ होते. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना एकत्र राहण्याची इच्छा होती. त्यामुळे दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राधिका प्रमाणेच तिचा नवरा बेनेडिक्ट टेलर हा सुदधा एक कलाकार आहे आणि संगीत क्षेत्राशी निगडित आहे. तिथे कंटेपररी संगीतात त्याने नवनवीन प्रयोग केले आहेत. इंग्लंड आणि युरोप मधील एक आघाडीचा संगीतकार म्हणून तो लोकप्रिय आहे. राधिकाने नेहमीच तिला स्वतःला जे वाटतं आणि पटतं तेच केलं आहे आणि तसेच विचार मांडण्याची वृत्ती कायम ठेवली आहे. तिची ही नवीन मुलाखतही यांस अपवाद नाही.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.