Breaking News
Home / बॉलीवुड / बॉलिवूडच्या ह्या सहा अभिनेत्रींनी केले आहे परदेशीय नवरे, एकीचा नवरा आहे १० वर्षांनी छोटा

बॉलिवूडच्या ह्या सहा अभिनेत्रींनी केले आहे परदेशीय नवरे, एकीचा नवरा आहे १० वर्षांनी छोटा

सेलिना जेटली

‘अपना सपना मनी मनी’, ‘खेल’, ‘नो एन्ट्री’ ह्या सारख्या चित्रपटांत काम करणाऱ्या सेलिना जेटलीचा नवरा परदेशी आहे. सेलिनाने दुबईचे हॉटेल व्यासायिक पीटर हॉग बरोबर २०११ ला विवाह केले. पीटर आणि तिची भेट दुबईला झाली होती. त्यावेळी ती दुबईला फॅशन ब्रँड च्या स्टोरला लॉंच करीत होती. हे प्रेम एकतर्फी होते. त्यानंतर पीटरने तिला मागणी घालून घरच्यांसोबत बोलणी केली. सेलिना आणि पिटरची चार मुले आहेत. सन २०१२ मध्ये तिला जुळी मुले झाली, विराज आणि विस्टन अशी त्या दोन मुलांची नावे आहेत. त्यानंतर २०१७ साली पुन्हा ती आई बनली आणि पुन्हा तिला जुळी मुले झाली. फक्त सेलिना जेटलीच नाही तर इतरही अभिनेत्रीने परदेशीय जीवनसाथी शोधले.

प्रीती झिंटा

डिंपल गर्लच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रीती झिंटा च्या सुंदरतेवर भाळलेले बरेच दिवाने आहेत. प्रितीने आपल्या फिल्मी करियर मधे ‘कल हो ना हो’, ‘वीर जारा’ आणि ‘दिल चाहता है’ अशा लोकप्रिय चित्रपटांत काम केले. त्यानंतर प्रितीने आयपीएलचा रस्ता धरला आणि चित्रपटापासून दूर राहिली. चित्रपटसृष्टीत थोडं काम करून ती गुपचूप विवाह बंधनात अडकली. तिने २०१६ मधे अमेरिकन व्यावसायिक जीन गुडईनफ सोबत विवाह केला.

राधिका आपटे

वेब सिरीज आणि बॉलिवूड चित्रपटात आपली छाप उमटवलेली राधिका आपटेने आपला जीवनसाथी परदेशीय निवडला. तिने २०१२ मधे युके तील बेस्ट म्युझिशिअन बेनेडिक्स टेलर सोबत लग्न करून संसार थाटला. २०११ मधे त्या दोघांची ओळख झाली होती, जेव्हा राधिका कंटेम्पररी डांस शिकायला लंडनला गेली होती.

प्रियांका चोप्रा

‘देशी गर्ल’ प्रियांका चोप्राचा विवाह म्हणजे या वर्षीच्या बहू चर्चित विवाहांपैकी एक आहे. तिने आपल्या पेक्षा १० वर्षांनी लहान परदेशीय बॉयफ्रेंड निक जोनस सोबत उदयपुर मधे लग्न केले. लग्ना नंतरच्या रिसेप्शन पार्टीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. निक जोनस बद्दल बोलायचे झाले तर त्याचा जन्म अमेरिकेतील टेक्सस मधे झाला. निक एक गायक, लेखक आणि कलाकार आहे.

श्रीया सरन

अजय देवगणच्या दृश्यम या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री श्रीया सरनने गेल्या वर्षी रुसी बॉयफ्रेंड आंद्रे कॉसचिव सोबत लग्न केले. त्यांनी आपला विवाह राजस्थानच्या एका पॅलेस मधे केला.श्रीया सरन दाक्षिणात्य चिञपटातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. दृश्यम मधे तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका निभावली होती.

आशका गोराडिया

टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया साल २०१७ मधे परदेशीय प्रियकर ब्रेंट गोबले सोबत विवाह बंधनात अडकली. दोघांनीही हिंदू आणि ख्रिश्चन रीती रिवाजानुसार लग्न केले. ब्रेंट व्यावसायिक आणि वेपन इन्स्ट्रक्टर आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.