बॉलिवूड मधे कितीतरी प्रकारच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. या जोड्यांच्या लिस्टमधे आहे बहिणी – बहिणी ची जोडी. तसं पाहायला गेलं तर बॉलिवूड मधे खूप साऱ्या बहिणींच्या जोड्यानी ऍक्टींग क्षेत्रात आपले नशीब अजमावले आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा ५ बहिणींच्या जोड्यां बद्दल सांगणार आहोत, ज्या जोड्यां पैकी मोठी बहीण हिट झाली तर छोटी बहीण फ्लॉप.
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी
सर्वात पहिले आपण जाणून घेऊ शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी या दोन बहिणींच्या जोडी विषयी. या दोन बहिणीं पैकी शिल्पा मोठी बहीण. तिने चित्रपटात खूप नावलौकिक मिळवले. तिने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. नंतर चित्रपट सृष्टीतुन लांब गेल्यानंतर आजही शिल्पाची जादू छोट्या पडद्यावर चालतेय. पण तिचीच छोटी बहीण शमिताचे करियर काही ठीक चालले नाही, तिला प्रेक्षकांनी जास्त पसंत केलं नाही. शमिताने ‘मोहब्बते’ चित्रपटातुन बॉलिवूड मधे पदार्पण केले. चित्रपट सुपरहिट झाला परंतु हा चित्रपट मल्टीस्टारर असल्यामुळे ह्यात अनेक अभिनेत्री होत्या. त्यामुळे शमिता ह्या चित्रपटांत जास्त वेळ स्क्रीन वर दिसू शकली नाही. त्यानंतर शमिताचे चित्रपट फारसे चालले नाही. तिची फ्लॉप अभिनेत्रीमध्ये तुलना होत असते.
काजोल मुखर्जी आणि तनिशा मुखर्जी
काजोलने आपल्या वेगवेगळ्या भूमिकां मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शाहरुख सोबत काजोलची जोडी प्रेक्षकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतली. काजोलने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. जरी काजोल बॉलिवूडमध्ये सध्या फारसे काम करत नसली तरी तिच्या जवळ आजही चित्रपटाच्या ऑफर्स येतात. तीने फक्त बॉलिवूडच नाही तर ती दाक्षिणात्य चित्रपटातही झळकली. तर दुसरीकडे काजोलची बहीण तनिशाने ‘निल एन निक्की’ या चित्रपटातून पदार्पण केले. तनिशाचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर तानिशाने काही चित्रपट केले, परंतु त्यांना फारसे यश न मिळाल्यामुळे तिचे करियर पुढे जाऊ शकला नाही.
मलाईका अरोरा आणि अमृता अरोरा
मलाईका अरोरा काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने ती मीडिया समोर येत असते. अरबाज पासून ब्रेकअप ते अर्जुन कपूर सोबतचे रिलेशनशिप पर्यंत ती मीडियामध्ये खूपच चर्चेत असते. तसेच मलाईकाचे आयटम सॉंग्स लोकांना खूप आवडले. मलाईकाने ‘मुन्नी बदनाम’, ‘छईंया छईंया’, ‘होंथ रसिले तेरे होंथ रसिले’ ह्यासारखे एकाहून एक आयटम नंबर दिले. तसेच ती रिऍलिटी शो मध्ये जज म्हणून खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिचे करिअर चित्रपटांत जास्त काम न करता सुद्धा चांगले चालले. तर दुसरीकडे तिची छोटी बहीण अमृता अरोरा आपल्या जोरावर एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही. तिने अनेक चित्रपटांत साईड हिरोइन्सच्या भूमिका निभावल्या. आता ती चित्रपटापासून लांब राहते.
डिंपल कपाडिया आणि सिंपल कपाडिया
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीच्या लिस्ट मधील डिंपल कपाडियाचा पहिलाच चित्रपट ‘बॉबी’ नेच सर्वांची मने जिंकले. डिंपलने सनी देओलसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याचबरोबर सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केले. डिम्पल बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तर दुसऱ्या बाजूला चित्रपट ‘अनुरोध’ ने करियरची सुरुवात करणारी सिम्पल कपाडियाची जादू मात्र बॉलिवूडमध्ये चालली नाही. तिची पुढील वाटचाल सुद्धा खूप चांगली राहिली नाही.
ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना
अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता बॉलिवूड पासून दूर आहे पण तिच्या लेखणीतून ती चर्चेत असते. तसेच ट्विंकलने आपल्या मर्जीनेच बॉलिवूडला बाय बाय केले. पण तिने जिथपर्यंत चित्रपटात काम केले तो पर्यंत तिला प्रेक्षकांनी पसंत केले. ट्विंकलच्या खात्यात बरेच हिट चित्रपट आहेत. तर दुसरीकडे तिची बहीण रिंकी खन्नाचे बॉलिवूड करियर मात्र बिलकुल चांगले चालले नाही. रिंकी खन्नाने गोविंदा सोबत ‘जिस देश मे गंगा बहता है’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तिने काही चित्रपटांत काम करूनही तिला चित्रपटांत यश मिळाले नाही.