गाय म्हणजे वास्तल्य, प्रेम तसेच सुबत्तेचं प्रतिक. घरी गाय वासरू असणं हे शुभं मानलं जातं. इतकंच काय आपण दिवाळीत वसुबारस ही साजरा करतोच. त्यामुळे गाय ही आपल्या कडे गावाकडील अनेक घरांमध्ये असतेच. तिची निगा राखणं हे होतंच. वर म्हंटल्याप्रमाणे गाय म्हणजे वात्सल्याचं प्रतिक. एखाद्या शांत आणि सोशिक मुलीस गरीब गायीची उपमा दिली जाते. पण जर कोणी या गायीच्या वासराला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिच्यातील मातृत्व हे आक्रमक रुप धारण करतं. त्यामुळे त्याची सुरक्षितता तिच्यासाठी तेवढीच महत्वाची. अनेक प्राण्यांमध्येही ही भावना असतेच. त्यामुळे एखाद्या प्राण्यास पिल्लू झालं, तर फार क्वचित लोकांना जवळ येऊ दिलं जातं. त्या नवजात पिल्लाला त्रास होऊ नये हा उद्देश. पण जर का हेच पिल्लू राहत्या जागेपासून दूर कुठे जन्माला आलं असेल तर?
असंच काहीसं घडलं दक्षिण भारतातील एका भागात. एका घरातील गाय चरत चरत रानावनात निघून गेली होती. ती गर्भार होती आणि रानातच तिने आपल्या वासराला जन्म दिला. नुकतंच जन्माला आलेलं वासरू इतक्या लांब कसं येणार. तसेच मधल्या वाटेवर त्याच्या जीवाला ही धोका. तेव्हा या गायीने आपल्या पाडसाला तिथेच ठेवलं. सोबत गुरं राखणारी कुत्री असावीत. ती ही तिथे थांबली असावीत आणि गायीने मात्र ती राहत असलेल्या घराचा रस्ता धरला. त्या घरी पोहोचल्यावर तिच्या वागण्यामुळे घरातील सदस्य तिच्या पाठी निघाले. यात काही महिला आणि एक पुरुष अशी मंडळी होती. मधेच एके ठिकाणी इतर गायींचा कळपही त्यांना दिसतो. मजल दरमजल करत त्या पाडसाला ठेवलेल्या ठिकाणी पोहोचतात. तोपर्यंत काय चालू आहे याचा अंदाज ते बांधत असावेत आणि तिथे पोहोचल्यावर या नवजात पाडसाला पाहून त्यांना अतिशय आनंद होतो. या संदर्भातला व्हिडियो आमच्या टीमने पाहिला आणि मग या विषयी लेख लिहावा असं ठरलं. त्या पाडसाला पाहिल्यावर हा व्हिडियो तयार करणारी व्यक्ती आपसूक ओरडते, शाब्बास ! इतर वेळेस स्थानिक भाषेत बोलणं चालू असतं पण शाब्बास या शब्दामुळे त्यांचा आनंद कळून येते. पुढे सोबत आलेल्या महिला त्या गायीला आणि पाडसाला सांभाळताना दिसतात आणि व्हिडियो संपतो.
या व्हिडियो मध्ये पाडसाला ठेवलेली जागा जवळ येताना व्हिडियोत राखण करणारी कुत्री अचानक आलेली दिसतात. यावरून ती त्या नवजात पाडसाची राखण करत असावेत असा अंदाज बांधलेला आहे. अर्थात हा पाहिलेल्या व्हिडियोवरून अंदाज बांधलेला आहे आणि सत्य परिस्थिती वेगळी असू शकते. तसेच स्थानिक भाषा अपरिचित असल्याने या व्हिडियोवर अजून काही भाष्य करता येत नाही. पण एकूणच वेगळा प्रसंग आपल्याला या व्हिडियोच्या निमित्ताने पाहायला मिळाला हे खरं. आपल्याला अशा वायरल विडोयोज वरील लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला अनेक लेख वाचायला मिळतील.
बघा व्हिडीओ :