Breaking News
Home / मनोरंजन / भर ट्रॅफिकमध्ये भिडले साप आणि मुंगूस, रस्त्यावर बघायला जमली लोकांची गर्दी

भर ट्रॅफिकमध्ये भिडले साप आणि मुंगूस, रस्त्यावर बघायला जमली लोकांची गर्दी

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यजीवांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. वन्य प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. त्यात साप म्हटलं की, उत्सुकता शिगेला पोहोचते. आपण अनेकदा ऐकलं असेल की साप आणि मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यामुळे दोघं एकमेकांसमोर आले तर काय होईल याबाबत मनात प्रश्न निर्माण होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मुंगूस आणि साप यांच्यातील द्वंद पाहायला मिळत आहे. मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वांनाच माहिती आहे. हे दोघेही एकमेकांचे दुश्मन समजले जातात. साप आणि मुंगूस हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात लढाई सुरू होणारच यात शंका नाही. अशाच एका झुंजीचा थरार एका निमशहरी भागातील एका रस्त्यावर पाहायला मिळालाय. नाग आणि मुंगूस थेट रोडवर एकमेकांना भिडले आणि त्यानंतर थेट गाड्याच थांबल्या. लोक गाड्या थांबवून यांची लढाई बघू लागले.

रस्त्याच्या मधोमध कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. या लढाईतील मुंगुस तसं लहान दिसत होतं आणि नाग मात्र चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगसाने नागाला जेरीस आणलं. मुंगुसाचं रौद्ररुप पाहून नागही बिथरला. त्यानेही आपल्या बचावासाठी हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, मुंगूस वारंवार हल्ला करत असल्याने मग नाग मुंगूसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. विषारी नाग मुंगूसावर हल्ला करत होता. तरीदेखील मुंगूस या नागाला मारण्याचा प्रयत्न करतच होता. मुंगुसानं हल्ला केल्यानंतर नागानं त्याला चांगलाच झटका दिला. पण, यात नाग यशस्वी होऊ शकला नाही. नाग मुंगुसाला मारण्याचा प्रयत्नात होता. पण, आक्रमक झालेलं मुंगूस नागावर जोरदार पलटवार करतच होता.

व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, साप आणि मुंगूस यांच्यात लढत चालू आहे. साधारणपणे, आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ऐकले असेल की साप आणि मुंगूस एकमेकांसमोर आले की त्यांच्यात लढाई होते. या लढाईत अनेकदा सापाला पराभवाला सामोरे जावे लागते आणि मुंगूस त्याला मारून खातो. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला जात असलेल्या सापासमोर अचानक एक मुंगूस येतो. मग काय साप आणि मुंगूस यांची झुंज सुरु होते. मुंगूस सापाला वळसा घालू लागतो, तर सापही फणा पसरवून त्याच्याकडे तोंड करताना दिसतो. आपला जीव वाचवण्यासाठी साप मुंगूसावर विषारी दंश मारताना दिसत आहे. चपळ मुंगूल सापाचा वार चुकवत हल्ला करताना दिसतो. साप आणि मुंगसाच्या लढाईचा हा प्रकार काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात काढला. आणि त्यांच्या लढाईचा हा विडिओ व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या लढाईत शेवटी कोण जिंकलं हे तुम्हीच पहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *