Breaking News
Home / जरा हटके / भर रस्त्यात ट्रकचा ब्रेक फेल झाला होता, पण त्यानंतर ट्रक ड्राइवरने जे केलं ते कौतुकास्पद होते

भर रस्त्यात ट्रकचा ब्रेक फेल झाला होता, पण त्यानंतर ट्रक ड्राइवरने जे केलं ते कौतुकास्पद होते

आयुष्यात अनिश्चित गोष्टी घडणं ही एक निश्चित गोष्ट आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. अर्थात सदासर्वकाळ अनिश्चित गोष्टी घडत असतात असं नाही. पण जेव्हा त्या घडतात तेव्हा आणि त्याच्या नंतर बराच काळ त्या आठवणीत राहतात. काही तर अशा असतात की आपल्या प्रसंगावधनाची परीक्षा पाहतात. असंच काहीसं घडलं एका ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत आणि त्यानं दाखवलेल्या प्रसंगावधनाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कोणत्याही वाहन चालकास सगळ्यात जास्त भीती कोणत्या अनिश्चिततेची असू शकते ती म्हणजे वाहनाचे ब्रेक फेल होणं. वाहनाचे ब्रेक फेल झाले की कोणतंही वाहन थांबवणार कसं आणि कुठे हे दोन प्रश्न उभे राहतात. सोबत वाहनातील व्यक्ती, सामान आणि आजूबाजूची वाहने, व्यक्ती ह्यांना होऊ शकणाऱ्या संभावित नुकसानाचा विचारही डोक्यात येतोच.

एकूणच किती गंभीर परिस्थिती असेल हे लक्षात येईल. असंच काहीसं झालं आपल्या महाराष्ट्रातील एके ठिकाणी. एका ट्रकचे ब्रेक लागेनात. ट्रक चालत होता उलट्या दिशेने. ब्रेक न चालणं आणि तेही वाहन सरळ चालत असताना धोकादायक असतं. आता तर वाहन उलट दिशेने जात होतं. पण त्या वाहन चालकाने स्वतःवर कसा काय तो ताबा मिळवला. त्या मानाने कमी वेगात त्याने ट्रक जाऊ दिला. या दरम्यान जवळपासच्या मुलांना याचा अंदाज आला असावा. त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हरला मदत म्हणून ट्रक च्या मागून आणि पुढून रस्त्यावरील इतर वाहनांना दिशा देणं सुरू केलं. दरम्यानच्या काळात या ट्रक चालकाला मोकळ्या जागेत ट्रक घेऊन जाण्याविषयी सूचना दिल्या जात होत्या. याचा व्हिडियो बनवणाऱ्या मुलांनी ह्या सूचना देऊन पाहिल्या. पण त्यांच्या मनातही धाकधूक होतीच. ट्रक अचानक अंगावर आला तर. पण ट्रक चालकाने दाखवलेलं प्रसंगावधान कौतुकास्पद ठरतं. त्याला एक मोकळी जागा दिसल्यावर ट्रक त्या दिशेने नेला. जागीच फिरवला आणि काही वेळाने ट्रक थांबला. बहुतांश वेळा ब्रेक फेल झाल्यास वाहन कुठे तरी आदळते आणि थांबते हे आपण सिनेमा, मालिकांतून पाहतो. पण ह्या ट्रक चालकाने हे कसं काय साध्य केलं, याचं उत्तर मिळत नाही.

पण जी घटना दिसते ती एखाद्या थरारपटाला शोभेल अशी भासते. शेवटी हा व्हिडियो रेकॉर्ड करणारी व्यक्ती त्या ट्रक चालकाच्या कौशल्याचे कौतुक करते तेव्हा आपणही नकळत त्यात सामील होतो. ह्या लेखामधील गोष्टी या आमच्या टीमने पाहिलेल्या व्हिडियो वर अवलंबून आहेत. त्यात असलेल्या माहितीवर आधारित हा लेख असल्याने याची सत्याअसत्यता किंवा असं काही घडू शकतं याची शक्यता अशक्यता याबाबतीत आमची टीम ही कोणतेही भाष्य करण्यास योग्य नाही. केवळ जे दिसले ते लिहिले या पद्धतीने हा लेख लिहिलेला आहे. पण अनेक वायरल व्हिडियोज हे आपल्या संपर्कात येत असतात. त्यातील अनेक चांगल्या व्हिडियोज वर आमच्या टीमने उत्तम लेख लिहिले आहेत. आपणास ते लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध विषयांवरील लेख वाचनास उपलब्ध होतील.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.