Breaking News
Home / मराठी तडका / भाऊ कदम ह्यांची मुलगी आहे वडिलांसारखी टॅलेंटेड, जाणून घ्या तिच्याविषयी हि खास गोष्ट

भाऊ कदम ह्यांची मुलगी आहे वडिलांसारखी टॅलेंटेड, जाणून घ्या तिच्याविषयी हि खास गोष्ट

नमस्कार. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिसादामुळे मराठी गप्पाच्या टीमला विविध विषयांवर लेख लिहिण्यास उत्साह मिळतो. आपण आजपर्यंत मनोरंजन क्षेत्रातील बातम्या, जगभरात घडत असलेल्या उद्बोधक गोष्टी, कलाकारांच्या कलाप्रवासाचा आढावा असे अनेक विषय हाताळले आहेत. यापैकी एक विषय म्हणजे कलाकारांची मुले अर्थात स्टार किड्सचा. कलाकार आणि त्यांच्या आयुष्याविषयी आपल्याला उत्सुकता असते. त्यातही कलाकारांची मुले हा एक औत्सुक्याचा विषय असतो. जेव्हा ही मुले स्वतःचं असं काही काम सुरू करतात तेव्हा या औत्सुक्यासोबतच त्यांच्याविषयी कौतुक वाटू लागतं. आज अशाच एका स्टार किडविषयी आपण जाणून घेणार आहोत जिने स्वतःचं युट्युब चॅनेल सुरू केलं असून मनोरंजक असा उत्तम कंटेंट ती प्रेक्षकांना देते आहे.

या स्टार किडचं नाव आहे, मृण्मयी कदम. मृण्मयी ही भाऊ कदम यांची थोरली कन्या. आपण तिला काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमातुन भेटलो आहोत. पण सध्या ती गेला काही काळ, आपल्या भेटीस आली आहे ते तिच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून. काही काळापूर्वी तिने स्वतःच्या नावाने Mrunmayee Kadam हे चॅनेल सुरू केलं आहे. यात तिने अगदी उत्तम असे मनोरंजक व्हिडियोज प्रेक्षकांसाठी अपलोड केलेले आहेत. यात तिच्या आई आज्जी सोबतची गंमत असो, वा लहान भावंडसोबतची मस्ती अशी धमाल पाहायला मिळते. मध्यंतरी तिने तिच्या भावंडसोबत एक मस्त धमाल असा फॅशन शो घरच्या घरी केला होता. तसेच काही व्हिडियोज मध्ये ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत मजा करताना दिसते. धमाल करण्यासोबतच मृण्मयी ही उत्तम डान्स करते. त्याचेही काही व्हिडियोज प्रेक्षकांना पाहायला मिळतात. सोबतच तिला भटकांतीचीही आवड आहे. त्यामुळे ती जिथे जिथे फिरते तिथला प्रवास आणि अर्थातच तिथलं खाणं याविषयीचे तिचे ब्लॉग्सही खूप प्रसिद्ध होत आहेत. खाण्यासोबत तिला केक बनवायलाही आवडतात आणि ती ते चांगले बनवतेही. तिच्या आईने, म्हणजे ममता कदम यांनीही एका व्हिडीओमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला होता.

तिचा एक केक बनवण्याचा व्हिडियो ही प्रसिद्ध झाला आहे. पण सगळ्यांत जास्त प्रसिद्धी मिळाली आहे ते तिच्या अलिबाग ला प्रवास करतानाच्या एका व्हिडीयोला. हा लेख लिहीत असतात या व्हिडीओला जवळपास ४५००० लोकांनी पाहिलं आहे. तसेच मृण्मयी ही फॅशन डिझायनिंग चं शिक्षण घेते आहे. त्यामुळे मेकअप आणि फॅशन हा सुद्धा तिच्या काही व्हिडीयोजचा महत्वाचा विषय असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच मृण्मयीच्या या चॅनेलने २००० चा टप्पा पार केला आहे. मृण्मयीने त्यानिमित्ताने छोटंसं सेलिब्रेशनही केलं होतं. सध्या तिच्या या चॅनेलची सबसक्रायबर संख्या २६००+ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अतिशय कमी काळातच ती ३००० चा टप्पाही पार करेल अशी खात्री वाटते. तिचा हा प्रवास गेले काही महिने चालू आहे. या काळात कुकिंग, डान्स, फॅशन, घरातील गंमती असे वैविध्यपूर्ण मनोरंजन तिने प्रेक्षाकांना दिले आहे. येत्या काळातही ती हा प्रवास उत्तमरीतीने चालू ठेवेल हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *