सोशल मीडिया हे माध्यम आता आपल्याला नवीन राहिलेलं नाहीये. किंबहुना आपल्या पैकी अनेकांचा एखादा दिवस ही जात नसेल की जेव्हा आपण सोशल मीडिया अकाउंट्स बघत नाही. निदान एकदा तरी आपण या सोशल मीडिया साईट्स वर जात असतोच. अगदी आपलं इतर कुठेही अकाउंट नसेल तर युट्युबचा वापर तर ठरलेलाच असतो. कारण दिवसभरात कामाच्या निमित्ताने, किंवा मनोरंजनासाठी किंवा अगदी काही तरी नवीन शिकण्यासाठी आपण युट्युब बघत असतो.
त्यातही काही गोष्टी अगदी ठरलेल्या असतात. एकदा का शॉर्टस व्हिडियो बघायला सुरुवात केली की मग काय वेळ कसा जातो कळत नाही. पण याचा परिणाम असा होतो की मग छोटे छोटे व्हिडियोज बघण्याकडे आपला कल जातो. पण काही वेळेस एखादा व्हिडियो असतोच एवढा मोठा की वेळ द्यावाच लागतो. अर्थात यावेळी धावून येतं ते युट्युबवर उपलब्ध असलेलं एक फिचर – प्ले बॅक स्पीड. याद्वारे आपण एखादा व्हिडियो कमीत कमी .२५x ते जास्तीत जास्त २x (म्हणजे दुप्पट) वेगाने बघू शकतो आणि बघतो सुद्धा.
अर्थात आपण याचा फायदा उचलतोच आणि आपला वेळ वाचवतोच. पण काही वेळेस एखादा व्हिडियो त्याचा वेग वाढवल्याने एवढा विनोदी होतो की विचारू नका. आपल्या पैकी जवळपास प्रत्येकाच्या बाबतीत हे झालं असणार हे नक्की. पण काही वेळेस असे ही व्हिडियोज समोर येतात की ज्यांचा मूळ व्हिडियो हा संथ गतीने चालतो. पण काही वेळेस याच व्हिडियोजचं गतिमान वर्जन ही पाहायला मिळतं. असाच एक व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. हा व्हिडियो आहे एका माणसाचा जो दारोदारी जाऊन गाणी गात असे. त्याला त्याचे पैसे ही मिळत असावेत. खासकरून त्याचा अंदाज बघता त्याला पैसे नक्कीच मिळत असावेत. कारण त्याच्या गाण्याला गंमतीदार हावभावांची जोड असलेली दिसून येते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा हा भाऊ आपल्या समोर उभा असतो. एखाद्या बैठ्या चाळीच्या ठिकाणी तो गेला असावा असं वाटतं. एका खांद्यावर झोळी असते आणि हातात टाळ असते. पायात चपला नसतात. त्यामुळे याची परिस्थिती हलाखीची असून कदाचित हा गाणी गाऊनच आपली उपजीविका चालवत असावा असा समज होतो. तो गाणं सुरू करतो आणि त्याच्या गंमतीदार परफॉर्मन्स ला सुरुवात होते. तो जे गाणं गात असतो त्याचे शब्द कळत नसतात. पण मजा येत असते.
त्यात थोड्या वेळाने तो गाण्याचं म्युझिक सुद्धा गायला लागतो. नेमक्या याचवेळी त्याचे गंमतीदार हावभाव सुरू होतात आणि मजा अजून वाढते. ही मजा नेहमीच्या वेगाने बघितली तर जवळपास दोन मिनिटं बघता येते. पण हाच वेग दुपटीने वाढवला तर अशी काही धमाल येते की विचारू नका. याच व्हिडियोचं वेगवान व्हर्जन ही पाहण्यात आलं. तोच आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो होय. आपणही कदाचित दोन्ही किंवा निदान एखादा तरी व्हिडियो पाहिला असेल. पण नसेल पाहिला तर जरूर पाहा.
तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आज पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरील लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :