Breaking News
Home / मनोरंजन / भारतीय जवानाने उलटे होऊन हाताच्या साहाय्याने केला अप्रतिम ‘बी बोईंग’ डान्स, बघा व्हिडीओ

भारतीय जवानाने उलटे होऊन हाताच्या साहाय्याने केला अप्रतिम ‘बी बोईंग’ डान्स, बघा व्हिडीओ

वायरल व्हिडियोज म्हंटले की काही व्हिडियोज आपल्या डोळ्यासमोर चट्कन येतात. त्यात आघाडीवर असतात ते अर्थातच असतात ते डान्स व्हिडियोज. बरं त डान्स व्हिडियोज ची मोहिनी ही काही केवळ काही दिवसांपूर्ती किंवा ठराविक काळापूर्ती नसते. हे व्हिडियोज आपण कधीही पाहिले की आवडावे असेच असतात. अर्थात त्यात डान्स व्यवस्थित असावा हीच एक अट असते. बऱ्याचदा यातील डान्स करणारी मंडळी ही उत्तम डान्सर असतातच. त्यांना केवळ एक माध्यम हवं असतं स्वतःला व्यक्त करण्याचं. आता आपल्या आर्मी मधील एका जवानाचं उदाहरण घ्या ना.

दीपेश थापा असं या जवानाचं नाव. भारतीय सैन्यात भरती झालेला हा तरुण भारतमातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो. सोबतच तो आपली एक आवडही जोपासतो. ही आवड म्हणजे डान्सची आवड. त्यातही बी बोईंग हा डान्स प्रकार त्याचा विशेष आवडता आहे. त्यातही एका हाताच्या मनगटाचा वापर करत केलेल्या स्टेप्स करणं ही जणू त्याची खासियत म्हणावी लागेल. सोबतच दोन्ही हातांवर विविध डान्स स्टेप्स करणं यातही त्याचं कौशल्य दिसून येतं. आपली टीम डान्स प्रकारातील तज्ञ नाही. परंतु या तरुण जवानाचा डान्स बघुन इसमे कुछ बात जरूर हैं, हे जाणवतं.

त्याचा याच डान्स प्रकारातील एक व्हिडियो दोन वर्षांपूर्वी वायरल ही झाला होता. आपल्या भारतीय जवानांच्या समोर त्याने एक डान्स परफॉर्मन्स दिला होता. ‘आलू चाट’ नावाच्या सिनेमातलं त्याच नावाचं गाणं या व्हिडियोत वाजताना आपण ऐकतो. हे गाणं जेवढं उर्जाशील आहे तेवढाच किंबहुना काकणभर सरस असा दीपेशचा परफॉर्मन्स असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याने केलेला हातांचा वापर तर अप्रतिम. या व्हिडियोतील एका मिनिट १७ आणि २७ सेकंदाच्या दरम्यान त्याने केलेल्या स्टेप्स तर अफलातून. एका अर्थाने जबर दमावणार हा डान्स प्रकार आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. दमखम असल्याशिवाय हा डान्स करणं अवघड. पण दीपेश मात्र अगदी सहजतेने हा डान्स परफॉर्मन्स देताना दिसतो. अर्थात त्याची इतक्या वर्षांची असलेली मेहनत आणि या डान्स प्रकाराबद्दलची आपुलकी या डान्स परफॉर्मन्स मधून दिसून येते. हा व्हिडियो वायरल झाल्यानंतर ही काही काळ दीपेश याने हा व्हिडियो स्वतःच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केला नव्हता.

पण काही काळाने जेव्हा संपूर्ण भारतातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला तेव्हा त्याने आपल्या युट्युब चॅनेल वरून हा व्हिडियो शेअर केला. soldier NoProblem असं नाव असलेलं युट्युब चॅनेल हे त्याचं असल्याचं कळतं. या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपला हा जवान वेळोवेळी आपल्या भेटीस येत असतो. काही काळापूर्वी त्याने एक छान नोट लिहिली होती आणि आपल्या चाहत्यांना तो मिस करत असल्याचं त्यात म्हंटलं होतं. भारतीय संरक्षण दलात सामील असल्याने दीपेशला वेळात वेळ काढून आपल्या या आवडीला जोपासाव लागतं. कौतुकाची बाब अशी की ही तारेवरची कसरत दीपेश अगदी हसतमुखाने करत असतो. तसेच आपल्या संरक्षण दलांचं ही कौतुक. आपल्या या जवानाला त्याची कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. तेव्हा त्यांचे ही कौतुक. तसेच या लेखाच्या निमित्ताने आपल्यासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या, वेळप्रसंगी बलिदान देत आपल्या भारत भूमीच रक्षण करणाऱ्या प्रत्येक भारतीय जवानाला आपल्या टीमचा मानाचा मुजरा. आपण सदैव यशस्वी आणि विजयी राहाल ही सदिच्छा.

आपण आपल्या टीमने लिहिलेले लेख नेहमीच आवडीने वाचत असता आणि शेअर करत असता. हा लेखही यास अपवाद नाहीये हे नक्की. तेव्हा आपण हा लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करणार आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. तसेच वाचक म्हणून आपण कमेंट्स मधून आपल्या टीमला जे प्रोत्साहन देता, आपली पाठराखण करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला या टीमवर असलेला लोभ कायम असू द्या ही विनंती !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *