घरात एकतरी ताईगिरी करणारी चिमुकली असावी. तरच घराला घरपण येतं असंतं, आई घरी असतेच पण ताईसारखं माया लावणारंही आपल्या वयाचं कुणीतरी असावं लागतंयं. हा व्हीडिओ पूर्ण पहा… या घरातल्या ताईच्या दादाला तिच्या पप्पांनी मस्ती केल्यानं हाणला. आता या वयात पोरांना दोन रट्टे दिलं नाहीत तर पोट्टी सुधारणात आहेत का, त्यांच्या वळणाला दळणवळण बालपणापासूनच नाही लावलं तर पुढे जाऊन हाताबाहेर जातील, म्हणून वडिलांनी पोराला ठेवून दिले दोन रट्टे. पण त्याला काही मारलेलं, हाणलेलं रट्टे पडलेले आणि लाथा पडलेल्या ताईला बघावलंया नाहीत. म्हणून ताईनं डायरेक्ट वडिलांनाच जाब विचारला. दुसरी तिसरी म्हटली असती कशाला बाप लेकाच्या मधे पडा आपण, अभ्यास केला नाही म्हणून उलटे दोन आपल्यालाच पडतील पण दादाची बाजू घेणारी ही बहिणीची माया बघा. दादाला फटके पडले ही गोष्ट कळल्यावर लगेच धावून येते, त्याला जवळ घेते, लागलं का दादा असं विचारते. बापाला म्हणते तुमचाही मुलगा आहे त्यो बापालाही समजावते. दादा माझा आहे. त्यामुळं त्याला हात लावू नका, असं दटावून सांगते.
पुन्हा जर का त्याला लाथ माराल तर लक्षात ठेवा, असं दटावण्याची हिंमत ठेवते. त्यांना दोघांनाही समजावते. ही असते् घरची लक्ष्मी. दोघांनाही समजवणारी. दादाला विचारते पाणी आणून देऊ का, लागलं तर नाही ना. दादाही आपल्या लाडक्या छोट्याशा बहादूर बहिणीला जवळ घेतो आणि लाड करतो. बहिण पाण्याचा ग्लास आणायला जाते. इतक्यात बाबा म्हणतात हा बघ इथंच ठेवलायं ग्लास, त्याला ग्लास दिसंनात टीव्हीपाशी. पण बापालाच टोमणा देत म्हणते टिव्ही हाय का त्यो. असं म्हणत ग्लासातलं थोडं पाणी आधी स्वतः पिते मग भावाला आणून देते. खरंच बहिण अशीच असते. जिची माया कधही आटत नाही. भावासाठी अख्ख जग डोक्यावर घेणारी. ती नसेल तेव्हा घर अगदी सुनं सुंनं होऊन जातं. सगळ्यांना आठवत राहतं. दादा. बाबा, आई ताईशी हक्काने भांडेल, पण अशी बहिणी जिच्या दटावण्यानं भले भले बसतील गप्प आणि ती नसली तर घर खायला उठलं म्हणूनही बसतील गप्प, अशी ही ताई असते. या ताईला एवढ्या लहान वयात कळलेली माया किती आहे ती पहा ना. भावाला मार पडू नये म्हणून किती काळजी घेतेयं इतकी संवेदना फक्त आणि फक्त बहिणीच्या प्रेमातून येईल.
आईची माया वेगळी असते. एकदा का बापाचे रट्टे पोराला पडू लागले की आई सुद्धा मध्ये यायची हिंम्मत करत नाही. ती सुद्धा म्हणते दोन फटके पडल्या शिवाय सुधारणार नाहीत पोरं. आज्जी-आजोबा नसतील तर मग अशा संकटातून भावाला वाचविण्यासाठी बहिणच कंबरेला पदर खोचून येते. बापाच्या डोळ्यात डोळे घालून उभी रहाते. भावाला वाचवते. स्वतःला फटके पडतील हे माहिती असतानाही ती भावासाठी रिस्क घ्यायला तय्यार होते. हीच बहिण असते ती छोट्या छोट्या गोष्टीवरुन भावाशी वाद घालत असेल पण अशावेळी भावाच्या बाजूने उभी राहते हे दिसून येतं. ही तिच बहिण र्आहे जिच्या पाठवणीच्या वेळी सगळ्या घराला खाली करुन सोडते. कितीही गजबजलेलं घर असूद्या पण बहिणीीची पाठवणी केली की तिच्या जाण्यानंतर घर जसं खायला उठतं. हे क्षण नकोसे करुन सोडत असतात. बहिणीला पाठवणी करताना तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिम्मत बापाचीही होत नाही. त्यामुळं बहिण ही बहिणच असते.
बघा व्हिडीओ :