Breaking News
Home / मनोरंजन / भाषा समजली नाही तरीही चालेल पण भांडायला आलं पाहिजे, बघा भांडणाऱ्या पोपटाचा हा वा’यरल झालेला व्हिडीओ

भाषा समजली नाही तरीही चालेल पण भांडायला आलं पाहिजे, बघा भांडणाऱ्या पोपटाचा हा वा’यरल झालेला व्हिडीओ

कसं असतं. मुक्या जीवांना मन नसतं. त्यांना विचार करता येत नाही म्हणतात, त्यांचा मेंदू इतका विकसित झालेला नसतो असं म्हणतात. पण त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. हा हे मात्र माणसांबद्दल सांगाल तर पटेल, कारण काही लोकं इतकी बधीर असतात की त्यांचा मेंदू अद्याप विकसित झाला असेल की नाही यालाच प्रश्न पडतो. असो विषयांतर नको ज्यांना मेंदूच नाही त्यांच्याबद्दल आपण तरी कीती बोलावं. आपला हा आजचा व्हीडिओ पहा. कितीही वेळा पहाल तरीही जुना झाला असा वाटतच नाही. मिठू आणि त्याच्या ताईचं हे भांडण काही संपायच्ं नाव घेईना. संपेल तर आम्हाला पण सांगा. ताई आणि मिठू कधी शांतपणे एकत्र बसून बोलतलील का. असलं क्युट भांडण ज्या घरात होणार असेल ना तर तिथली सकाळ सगळ्यांना आवडेल. प्राणी असले तरीही त्यांची एक वेगळं जग आहे. पण ते जग सोडून ते मानवासोबत राहतात ना तेव्हा अशा गोष्टी आपोआप शिकू लागतात. आता ताईशी कसला कचाकच भांडण करतोय हा मिठू, पण तितकीच गोड ताई त्याला तसाच जाब विचारालया लागतेयं.

आता कुठला पोपट भात खातो. कुठला पोपट बॉर्नवीटा पितो म्हणून ताईनं त्याला हटकलंयं. तर त्याला याचं उत्तर काय येतंयं ते ऐका. नाही कळलं ना पुन्हा पुन्हा ऐका तुम्हाला शेवटपर्यंत त्याचं म्हणणं काय आहे ते नक्की कळेल. ताईच्या या रागाला पुरुन उरतोय हा मिठू. अगदी नळावरची भांडणं असतात ना की जिथं कुणालाच कुणाचं ऐकायचं नसतंयं, तसली लोकं इथं येऊन ठेपली आहेत. त्यांच्या या सगळ्या कुरघोड्यांना घरातली मंडळी असलं भारी एन्जॉय करतायतं ना एका क्षणाला वाटू लागतं ही ताई आणि हा मिठू आपल्या घरात का नाही राहत. नाही म्हणजे कुठला पोपट भात खातोय. चला भात एकवेळ समजून घेऊ पण आम्ही पण बॉर्नविटा कोण पीतं नाही म्हणजे याला कुठल्या स्पर्धेत धावून जायचंयं. तिच्या या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्याची आईपण तिथंचं राहते. आई समोर असताना ताईशी एवढं भांडतोयं याला डेरींग लागते. माझी आई असती तर एवढ्यात पाठीत रट्टा घालून गेली पण असती. पण त्याला कचाकच भांडताना बघून हसून हसून लोटपोट व्हायला देखील होतंयं त्यांचं काय चाललंयं हे अगदी शेवटपर्यंत कळलं नाही.

पण हा मिठू घरात सगळीकडे पसारा करुन ठेवतोय. एवढं फक्त कळलंयं. त्यामुळे काय ते एकदाचं भांडणं मिटवा आणि बेस्ट फ्रेंड व्हा. तुम्हीच असे कचाकच भांडत बसाल तर आम्ही कुणाकडं बघायचं. ताईचं ठिक आहे तिला एवढा राग येणार पण नाही, पण मिठूला राग आला आणि कुठं गेला म्हणजे. ताईनं करावं तरी काय त्यामुळं एवढं भांडणं चांगलं नाही मिठू. गप्पपणे जा अंघोळ कर ताईला बुरसं आवडंत नाही. छान दिसतोयसं तर रोज अंघोळ करुन घेत जा नुसतं नळावरच्या बायकांसारख ताईशी भांडायला येऊ नकोस, लोकं तुला हसून राहिली तायडेला नाही. तिचं तर कौतूक होतंयं पण तुला बोलतील. एकदम फ्रेण्ड रहा आणि मस्त रहा. बिलकुल भांडू नका. मिठूच्या या व्हीडिओमुळं एक गोष्ट नक्की झाली की प्राण्यांना तुमचे हावभाव भाव भावना सहज कळू शकतात. फक्त गरज असते ती त्यांना माया लावण्याची.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.