भारतात टीव्ही सीरिअल्सना एक वेगळी दिशा देणारी एकता कपूर धर्म आणि कर्म ह्यात विश्वास ठेवते. एकता जेव्हा पण आपला शो किंवा चित्रपटाचे नामकरण करते तेव्हा ती ज्योतिषांचा सल्लासुद्धा घेत असते. ती स्वतःसाठी ‘क’ शब्दाला खूप लकी मानते. हेच कारण आहे कि तिचे अनेक शो ‘क’ पासूनच सुरू होतात. आताच्या काही दिवसांत एकताचा एक व्हिडीओ खूप जास्त वायरल होत आहे. ह्या व्हिडिओत एकता कपूर मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबांना केळं वाटत आहे. खरंतर हि खूप चांगली गोष्ट आहे.
परंतु एकताने ज्या प्रकारे सर्व गरिबांना केळं वाटले, ते तिच्यासाठी टीकेचे लक्ष्य ठरले. खरंतर, ह्या व्हिडीओ मध्ये असं दिसून येत आहे कि, एकताला गरिबांना स्पर्श न करताच केळे द्यावेसे वाटत आहे. ह्याच गडबडीत ती गरिबांच्या हातात केळं थोड्या लांबूनच देत आहे. हे पाहून सोशिअल मीडियावर लोकं खूप नाराज झाले आणि बोलू लागले कि एकता भिकार्यांना फेकून केळे देत आहे. ह्या गोष्टीसाठी तिला सोशिअल मीडियावर खूप जास्त ट्रॉल केले जात आहे. सोशिअल मीडियावर हा व्हिडीओ लोकप्रिय फोटो जर्नालिस्ट वायरल भयानी ह्या पेजने टाकले आहे. चला तर सर्वात अगोदर व्हिडीओ पाहूया, नंतर जाणून घेऊया जनतेने ह्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते.
ह्या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया
ह्या व्हिडीओला पाहून अनेक लोकं एकतावर टीका करत आहेत. एका युजरने लिहिले कि, ‘एकता केळं फेकत आहे. ती श्रद्धेने केले देत नाही आहे. मला विश्वास आहे कि ती हे सर्व शो ऑफ साठी करत आहे. जेणेकरून देवाच्या गुडबुक मध्ये येऊ शकेल.” नंतर एकाची कमेंट आली “गरिबांना अन्न देऊन उपकार करत आहे. असं देतात प्रसाद. हात सुद्धा स्पर्श होऊ देत नाही आहे. कमाल आहे.” एका यूजरने रागाने सांगितले, ” एकता अश्या प्रकारे केळे फेकत आहे जसे समोर जनावर आहेत.” नंतर एका यूजरने लिहिले, “केळं खूप स्वस्त गोष्ट आहे. अरे आम्ही पण लोकांना सामोसे देतात. ह्या लोकांकडे पैसे जास्त आहेत, पण मन कमी आहे.” अश्याच प्रकारचे अनेक कमेंट्स ह्या व्हिडीओ वर येऊ लागले. तर तुमचे ह्या व्हिडीओ बद्दल काय मत आहे, कमेंट्समध्ये नक्की सांगा.