साल २००७ मध्ये आलेल्या सुपरहिट हॉरर कॉमेडी ‘भूलभुलैया’ चित्रपटाच्या येणाऱ्या सिक्वेलमध्ये मुख्य अभिनेत्यासंबंधी खूप चर्चा चालू होती. ह्या चित्रपटाचा एक टीजर पोस्टर रिलीज झाला होता. त्या टीजरमध्ये कार्तिक आर्यन दिसला होता. त्यावर अनेकांचा समज झाला कि ह्या सिक्वेल मध्ये चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून अक्षय कुमारच्या ऐवजी कार्तिक आर्यन ह्याला घेतले आहे. अनेकांनी हे पोस्टर पाहून नाराजी व्यक्ती केली. भूलभुलैया साठी अक्षय कुमार पेक्षा उत्तम भूमिका कोणीच करू शकणार नाही. त्यामुळे अक्षय नसणार तर चित्रपटाला मजा नाही. असा सूर अनेकांनी सोशियल मीडियावर लावला. अश्या चर्चा येत होत्या कि मूळ चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा अक्षय कुमार ह्या सिक्वेल मध्ये पाहुणा कलाकाराची भूमिका निभावणार.
परंतु चित्रपटाशी संबंधीत काही सूत्रांनी ह्या गोष्टी खोडून काढल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘हे खरं आहे कि कार्तिकला भूलभुलैयाच्या सिक्वेल मध्ये घेतले आहे. परंतु तो अक्षयची जागा घेणार नाही. चित्रपटात दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका असणार आहेत. एकीकडे कार्तिक ह्या चित्रपटात एका तरुण मुलाची भूमिका साकारणार आहे तर दुसरीकडे अक्षय एका पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावणार नाही तर एक मुख्य पात्र साकारणार आहे.’ भूलभुलैया चित्रपट आतापर्यंतच्या अप्रतिम हॉरर कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ह्यात कोणतंच वावगं नाही. २०१८ मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटात देखील हॉरर कॉमेडी शैली होती. परंतु हि शैली सर्वात अगोदर अक्षय कुमारच्या भूलभुलैयात दिसली होती.
हि कहाणी एका नवविवाहित दाम्पत्य (शायनी अहुजा आणि विद्या बालन) ह्यांच्या जीवनावर आधारित होती. ह्या चित्रपटात विद्याच्या पात्राला सुरुवातीपासूनच भूत मानलं जात असतं. परंतु अक्षय कुमार जो ह्या चित्रपटात सायकॅट्रिस्टच्या भूमिकेत होता, तो सांगतो कि विद्या एका मानसिक आजाराने पीडित आहे आणि तो विद्याला सामान्य स्थितीमध्ये सुद्धा आणतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘अक्षय चित्रपट भुलभुलैयाचा सर्वात प्रमुख चेहरा राहिला आहे. चित्रपट प्रशंसकांनी भूलभुलैया चित्रपटाला खरं म्हणजे अक्षय आणि विद्याच्या दमदार भूमिकेमुळे आज सुद्धा लक्षात ठेवलं आहे. आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनासुद्धा ह्या गोष्टीची जाणीव आहे. ह्याच कारणामुळे ह्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुद्धा अक्षय कुमार मागच्या चित्रपटाप्रमाणेच एका विशेतज्ज्ञच्या भूमिकेत दिसणार. दुसरीकडे कार्तिक आर्यन एका तरुणाची भूमिका निभावणार आहे जो अक्षय कडून मदद मागताना दिसेल.’