Breaking News
Home / जरा हटके / भोवळ आल्यामुळे अचानक बिल्डिंगवरून खाली पडणाऱ्या मित्राला अश्याप्रकारे वाचवले, बघा व्हिडीओ

भोवळ आल्यामुळे अचानक बिल्डिंगवरून खाली पडणाऱ्या मित्राला अश्याप्रकारे वाचवले, बघा व्हिडीओ

मैत्री हे असं एक नातं आहे ज्याला शब्दांत बांधता येत नाही. कारण या नात्यातील भावबंध हे शब्दांच्या आणि अगदी रक्ताच्या नात्यांपलिकडले असतात. गेल्या आठवड्यात आमच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या एका लेखातून तुम्हाला याची एक झलक बघायला मिळाली होतीच. आपल्या दि’व्यांग मित्राला अगदी मायेने घास भरावणाऱ्या एका लहान मुलाच्या वायरल व्हिडियो विषयी हा लेख होता. आपल्या पैकी अनेकांनी आपल्या कमेंट्स द्वारे या मुला प्रति आपलं प्रेम आणि कौतुक व्यक्त केलंत. आजचा हा लेख वाचून तुम्ही हीच बाब पुन्हा कराल हे नक्की. हा लेख आहे दक्षिण भारतातील एका मित्रांच्या जोडीचा. एका इमारतीत ही मित्रांची जोडी उभी असते. साधारण तिशीच्या आसपासचे हे तरुण इमारतीच्या कठड्याला टेकून उभे असतात. पण हा कठडा असतो लहान. इतका लहान की कंबरेच्या खाली यावा इतकीच उंची.

हे दोघेही मित्र त्या छोट्या कठड्याला रेलून उभे असतात, कदाचित कोणाची तरी वाट बघत. पण तेवढ्यात एक अघ’टित घटना घडते. त्या जोडगोळी मधल्या एका मित्राला भोवळ येते. भोवळ आल्यामुळे हा मित्र पाठी कलंडतो. पण पाठी असलेला कठडा तर छोटा असतो त्यामुळे हा मित्र थेट खाली पडणार असं वाटू लागतं. हे एवढ्या गतीने होतं की आपल्याला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळत नाही. पण त्याच्या बाजूला उभा असलेला त्याचा मित्र मात्र हे दृश्य टिपतो. त्याची पहिली प्रतिक्रिया असते ती त्याचा शर्ट पकडण्याची. पण तो एवढ्या वेगाने खाली जातो की त्या मित्राचा केवळ एक पायच तो पकडू शकतो. सुदैवाने बाजूला उभे असलेले काका दुसरा पाय धरून ठेवण्यात यशस्वी होतात. दरम्यानच्या काळात हल्लक’ल्लोळ झालेला असतो. आजूबाजूच्या स्त्रिया आणि पुरुष मदतीला धावून येतात. त्यात एक तर थेट हेल्मेट घालूनच आलेला असतो. यावरून किती तातडीने हि व्यक्ती आली असावी हे कळतं. सोबत एक पो’लीस कर्मचारी ही येतात. सुदैवाने तोपर्यंत या खाली पडणाऱ्या मुलाला वर ओढून घेण्यात लोकांना यश मिळालेलं असतं.

मग त्याच्यावर उपचार सुरू होतात. परिस्थिती एवढी चिंताजनक असते की एक काका तर सतत कपाळावर हात मा’रून घेताना दिसतात. पुढे काही वेळातच हे सी सी टी व्ही फुटेज थांबतं आणि हा वायरल व्हिडियो सुद्धा थांबतो. एखाद्या सिनेमात शोभावा असाच हा प्रसंग. अगदी एखाद्या साऊथ इंडियन सिनेमात तर चपखल शोभेल असा. पण हा तर खऱ्या आयुष्यात घडलेला प्रसंग. या प्रसंगात अनेकांनी मदत केली, पण खरं श्रेय जातं ते त्या मित्राला ज्याने पहिल्यांदा आपल्या मित्राचा पाय पकडून ठेवला. तो क्षण जसा काळजाचा ठाव घेणारा होता तसाच निर्णायक होता. जर तो क्षण घडला नसता, तर पुढे सगळं अघटित घडलं असण्याची शक्यता वाढली असती. पण म्हणतात ना, की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. यावेळी अगदी दे’वदूतासमान धावून आला तो एक सच्चा मित्र, ज्याने या प्रसंगात निर्णायक भूमिका बजावली. अशा या प्रसंगावधान राखून वागणाऱ्या मित्राला मराठी गप्पाच्या टीमचा सलाम.

आपल्याला हा लेख आवडला असेलच, त्यामुळे हा लेख नक्की शेअर करा. पण केवळ त्यावर थांबू नका. तुम्हाला या व्हिडियोतील घटनेबाबत काय वाटतं हे क’मेंटमध्ये मध्ये नक्की लिहा. तसेच आमच्या वे’बसाई’टवर असलेले वायरल व्हिडियोज विषयी, मैत्री विषयीचे विविध लेख वाचायला विसरू नका. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.