Breaking News
Home / मनोरंजन / मगरीच्या तोंडात हात टाकत होता व्यक्ती, तितक्यात बाजुने जाणारा व्यक्ती पाय घसरुन पडला, बघा पुढे काय झालं ते

मगरीच्या तोंडात हात टाकत होता व्यक्ती, तितक्यात बाजुने जाणारा व्यक्ती पाय घसरुन पडला, बघा पुढे काय झालं ते

मगर किती क्रूर आणि हिं’स्त्र शिकारी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मगरीच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अगदी क्षणभरात हा जीव आपल्या शिकारीची चिरफाड करते. यामुळे म्हटलं जातं, की पाण्यात राहून मगरीसोबत दुश्मनी कधीच घेऊ नये. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. मगरीचं नुसतं नाव जरी निघालं तरी मनात धडकी भरू लागते. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यात एका माणसाने मगरीच्या चक्क तोंडात हात टाकला आहे.

खरं पाहिलं तर मगर हा समुद्रातील एक शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. वेळप्रसंगी तो अवाढव्य अशा दिसणाऱ्या शार्क माशासोबतही दोन हात करु शकतो. त्यामुळे अशा खतरनाक प्राण्याशी पंगा न घेणंच योग्य. शक्य तेवढं त्याच्यापासून दूर राहा असा सल्ला काही प्राणीतज्ज्ञ देखील देतात. मात्र काही लोक तरी देखील मगरीशी पंगा घेण्याचा प्रयत्न करतात. अन् त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतात.

 

अशाच एका मगरीचा धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एकाच वेळी आपली धडकी भरते आणि पुढच्या क्षणाला हसू फुटते, असा हा एका मगरीचा आणि 2 माणसांचा व्हिडीओ आहे. जिथे भल्या भल्या प्राण्यांचाही टिकाव लागत नाही, अशा मगरीच्या तोंडात हात घालून आपली ताकद व कौशल्य दाखवून देण्याचा प्रयत्न एक माणूस या व्हिडीओत आपल्याला करताना दिसून येईल.

जिथे अगदी बिबट्या, चित्ता अशा ताकदवान प्राण्यांची ताकदही मगरीसमोर कमी पडते. हे प्राणीसुद्धा मगरीची शिकार होतात अशा मगरीसमोर जाण्याची, तिच्याशी दोन हात करण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. पण एका भावाने रिस्क घेतली आणि थेट मगरीच्या जबड्यात हात घातला. आता अजून भारी गोष्ट म्हणजे हा थरारक प्रकार चालू असताना त्या पार्कमध्ये खुप लोक उपस्थित होते. आणि मगरीच्या जबड्यात हात घालणारा व्यक्ती ट्रेनर होता, जो त्याचे हे काम नियमितपणे करायचा. पण शेवटी ती मगरच… कितीही जीव लावला आणि काहीही केलं तरी प्राण्यांचा कोण भरोसा देणार…

व्हिडीओत हा ट्रेनर माणूस हळूहळू मगरीच्या तोंडात हात घालतो. मगरीला पण ट्रेन केली असल्याने ती आपली तोंड उघडून बसलेली असते. आजूबाजूला उभी असलेली पब्लिक हा प्रकार थक्क होऊन बघत असते. अशातच बाजूने एक मुलगा हळूहळू जात असतो आणि सगळंच पार्क पाण्याने चिंब झालेलं असल्याने त्याचा पाय निसटतो… त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

कधी कधी काही गंभीर प्रसंग चालू असताना गमती-जमती होतात, कुणाची तरी फजिती उडते. गंभीर असलेले सगळे चेहरे खुलतात आणि हास्याचे फवारे उडू लागतात, अगदी अशीच परिस्थिती या व्हिडीओत आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *