Breaking News
Home / ठळक बातम्या / म गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले

म गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले

जगात जे काही होत असतं, त्यावर काही वेळेस विश्वास ठेवावा कि न ठेवावा असं वाटत राहत. आणि जेव्हा विश्वास बसतो तेव्हा तो आश्चर्याच्या धक्क्यासकटच. अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तर झालं असं, कि एक मलेशियामधे एक मुलगा आपल्या मित्रांबरोबर मासेमारी करायला जात होता. सर्केई गावात राहणारा. सोबत एक नातेवाईक होती. ते सगळे तिथे गेले. त्याचं वय वर्ष १४. अगदी कोवळ वय.

रिकी गायां त्या दुर्दैवी मुलाचं नाव. मी दुर्दैवी म्हणालो कारण गोगलगायी पकडताना त्याला मगरीने पकडलं. आपल्याला माहिती आहेच, आपल्याला कोणी गच्च मिठीत घेतलं तर त्याला मगर मिठी म्हणतो आपण. कारण जगात पुरातन काळापासून अस्तित्वात असलेला प्राणी म्हणजे मगर. आणि त्याची मिठी म्हणजे काळाने घातलेली झडपच. अशीच झडप त्या बिचाऱ्या मलेशियन मुलावर पडली.

 

त्याचे मित्र, कुटुंबीय यांना तो सापडेना म्हणून त्यांनी तो हरवला असल्याची तक्रार जवळच्या पोलिसांमधे केली. ते चिंतीत अवस्थेत होते. पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढण्यासाठी एक सर्च टीम तयार केली. पुढे एका महिलेने दिलेल्या माहिती नुसार त्याला खाल्लेल्या मगरीचे राहण्याचे ठिकाण लक्षात आले. तेव्हा असही लक्षात आलं, कि त्या मगरीची ताकद खूप आहे. म्हणून मग, जवळच्या गावकऱ्यांची मदत घेऊन, हे काम मग तडीस नेलं गेलं. त्या मगरीला जेरबंद करण्यात यश आलं आणि जेव्हा त्या १४ फुटी अज्रस्त मगरीला कापण्यात आलं, तेव्हा बाहेर पडले अवशेष आणि काही हाडे कपड्यांसकट. जे शेवटी, अंतिम संस्कारांसाठी त्या दुर्दैवी मुलाच्या घरच्यांना सुपूर्द करण्यात आले. हा प्रकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडला.

त्या मगरीचे लांबी १४ फूट होती. तिला पकडण्यासाठी SWAT ला गावातील लोकांची मदत घ्यावी लागली होती. ह्यानंतर त्यांनी त्या मगरीचे पोट फाडले तेव्हा त्याच्या आत १४ वर्षीय रिकीचे शरीर वेगवेगळ्या भागांमध्ये मिळाले. ह्याशिवाय मगरीच्या पोटात त्या मुलाचे कपडे सुद्धा मिळाले होते. मुलाचे पार्थिव मिळाल्यानंतर ते त्याच्या घरच्यांकडे अंतिम संस्कारासाठी सुपूर्द करण्यात आले.

इथे घडली होती घटना
फोटोत तुम्ही जी नदी पाहत आहेत ना, हेच ते ठिकाण आहे जिथे रिकीला ६ दिवसाअगोदर मगरीने खाल्ले होते. खरंतर त्या दरम्यान तिला एका महिलेने पाहिले होते. तेव्हाच रेस्क्यू टीम त्या मगरीला पकडण्यासाठी तयारीला लागली. रिकीचे वाचण्याचे मार्ग तर खूप कमी होते परंतु त्याच्या घरच्यांना त्याचे शरीर हवे होते. त्यांची इच्छा होती कि रिकीचे पार्थिव मिळाले तर त्याचे योग्यरितीने अंतिम संस्कार करून त्याला निरोप दिला जाऊ शकतो. त्यामुळेच मदतकार्य करणाऱ्या टीमने मगरीसाठी जाळे टाकले होते. ह्या घटनेचे फोटोज सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. ज्यांनी पाहिले आहेत त्यांनी खूप दुःख व्यक्त केले.

(Author : Vighnesh Khale)

About IrK0sFrKWQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *