जगात सर्व काही मिळेल, पण दुसरी आई कधीच मिळणार नाही. आईच असते, जी अडचणीत सापडलेल्या आपल्या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीही करायला तयार असते. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका हरिणाने तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे. आणि फक्त जीव धोक्यात घातला नाही तर आपल्या पोटच्या पिलासाठी जीव दिला पण..
आईची माया आणि ताकद या दोन्ही गोष्टींना कुणी चॅलेंज करू नये असंच म्हणतात. कारण आई ही आईच असते तिच्या प्रेमाची परीक्षा कोणी घेऊ नये आणि घेतलीत तर मग परिणामांना सामोरं जाण्याची तयारी हवी. हा गुणधर्म केवळ मानवी जीवनातच लागू होतो असे नाही, तर निसर्गाने आई बाळाचे नात प्रत्येक जीवाला सोपवलेले आहे. अगदी प्राणी-पक्षी सगळीकडे आईच्या मायेचा गुण लागू होतो.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत लोक या हरिणाच्या धाडसाचे मोठे कौतुक करत आहेत… फक्त कौतुक नाही तर तिचे आपल्या पिल्यावर असणाऱ्या प्रेमापोटी आपल्या जीवाचा त्याग केला, त्याबद्दल लोकांच्या डोळ्याला हा व्हिडीओ पाहून अक्षरशः पाणी आले आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या नदीतून एक हरिणाचे पिलू चाललेले आहे. या पिलाचे वय आणि वजन कमी असल्याने ते हळूहळू नदी ओलांडत आहे. मात्र या नदीत मगरसारखे घातक प्राणी आहेत, हेही त्याला ठाऊक नाही. मात्र मगरेच्या नजरेतून आपले भक्ष्य कसे सुटेल.. मगरेचा या हरिणाच्या पिलावर डोळा आहे. मगर वाट पाहत आहे की, कधी एकदा हे पिलू नदीत घुसतंय आणि आपण त्याच्यावर हल्ला करतोय…. शेवटी शिकार करणे किंवा शिकार होणे हा प्राणिमात्रांच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. अगदी प्रागैतिहासिक काळी जेव्हा उत्पादनाची शेतीसारखी साधने मानवाला ज्ञात नव्हती तेव्हा मानवाचा अस्तित्त्वसंघर्ष हा प्रामुख्याने दोन कौशल्यांवर आधारीत होता – हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजेच शिकार आणि (कंदमुळे वगैरे) गोळा करणे.
निसर्गातील इतर प्राण्यांच्या शिकार करण्याच्या हेतूत आणि मानवाच्या हेतूत एक मोठा फरक हा होता की प्राण्यांसाठी शिकार हे अन्न मिळवण्याचे साधन होते, तर मानवासाठी शिकार अन्नप्राप्तीबरोबरच मनोरंजनासाठी केला जाणारा खेळही होता. आता आपण व्हिडीओकडे वळूयात… अचानक पिलू नदीत घुसते आणि मागून ते आई असलेले हरीण बघत असते. पुढे या हरीणीला दिसून येते की, आपल्या पिलावर मगरीचा डोळा आहे आणि ती पिलावर हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे… मग ही आई हरीणी थेट नदीत उडी घेते…
आपल्या पिलाला जोरात चालता येत नाही किंवा मोठ्या उड्या मारून नदी ओलांडता येत नाही, हे पाहून तिचा जीव कासावीस होत असल्याचं दिसतंय. अखेर आपल्या पिलाला वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट मगरीच्या पुढ्यात जाते आणि पुढे काय होतं… हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पहा… हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. संकट काळात माणसे आपल्याच जवळच्या माणसांना साथ देत नाही. मात्र प्राणी आपल्या माणसांना संकटात सोडून कधीत जात नाहीत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
बघा व्हिडीओ :