महाराष्ट्रात आणि देशभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. नदी-नाले ओसांडून वाहत आहे. नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जीव धो’क्यात घालून नदी ओलांडू नका, अशी सूचना वारंवार केली जात आहे पण लोक काही ऐकण्यासाठी तयार नाहीयेत. तसेच पर्यटन स्थळी गर्दी करून लोक जीव धो’क्यात घालत आहेत. पावसाळ्याचे एक वैशिष्ट्य आहे, पावसाळा येताना एकटा येत नाही तर आजारांना घेऊन येतो. विशेष बाब म्हणजे पाण्यापासून लांब राहण्याचा आणि पावसाळ्यात काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात अपघा’त फक्त रस्त्यावर किंवा पुराच्या भागातच नाही, तर शेतातही होत असतात. अशाच एका अपघा’ताचा भयंकर आणि मन सुन्न करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एका ट्रॅक्टरचालकाने नको ते धाडस करून सर्वांचा श्वास रोखला होता.
तर हा किस्सा झाला असा की, मध्यप्रदेशमध्येही धुमशान पाऊस सुरू आहे. अशातच शेतीतील बरीचशी कामे चालुय आहेत. बैलगाडी लावून कामे करून घेणे, ही जुनी परंपरा बऱ्यापैकी नामशेष झाली आहे. आता सगळीकडे अत्याधुनिक पध्दतीने शेतकी कामे करवून घेतली जातात. यापैकी बऱ्याचदा शेती कामात ट्रॅक्टरचा उपयोग होतो. मात्र कधी कधी ट्रॅक्टरचालकाने अति धाडस केलं तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. असाच एक प्रकार मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात घडला आहे.
या भागात रात्रंदिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले,ओढे ओसंडून वाहत आहे. काही रस्तेसुद्धा तर पाण्याखाली गेले आहे. सगळ्या शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे माणसे जरी शेतात उतरली तरी गुडघ्याभर पाय चिखलात जात आहे. असेच एक शेत पाण्याखाली गेलेला असतांना देखील एक चालकाने थेट चिखलात ट्रॅक्टर घातला. मात्र चिखलात ट्रॅक्टर रुतला आणि नंतर बाहेर निघेचना. त्यानंतर त्याने काही वेळ वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करूनही ट्रॅक्टर काही हलेना, जास्तच रुतत चालला होता.
अखेर अजून काही वेळ या ड्रायव्हरने वाट पाहिली आणि कंटाळून ट्रॅक्टर बंद केला. मग तिथे उभा असलेल्या आणि नव्याने ट्रॅक्टर ड्रायव्हिंग शिकलेल्या तरुणाने ट्रॅक्टर हातात घेतला आणि आता तो जास्त रेस करून ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढत होता. आसपास, शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला जास्त रेस करू नको, ट्रॅक्टर पलटी होईल, असा सल्ला दिला. पण, पठ्ठ्याने तसाच ट्रॅक्टरचा रेस वाढवतच नेला. अखेर नाही नाही म्हणता हा ट्रॅक्टर पलटला. आणि त्याचा रेस जास्त असल्याने तो इतक्या वेगाने पलटला की, ड्रायव्हिंग करणाऱ्या हा नवख्या तरुणाला बाहेर पडायलाही क्षणांची उसंत मिळाली नाही. आणि जे व्हायला नको होतं गेच घडलं.
ट्रॅक्टर पलटी होऊन हा मुलगा त्याखाली आला आणि पुढे त्याचा मृ’त्यू झाला असल्याचे समोर आले. नको तिथे अतिधाडस केलं की अगदी जीवावर बेतू शकते. एक छोटीशी चूक महागात पडू शकते. आता हा व्हिडीओ पहा आणि अतिआत्मविश्वासात असे जीवघेणे घोटाळे करू नका.
बघा व्हिडीओ :