Breaking News
Home / मनोरंजन / मराठमोळ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार ह्यांनी केला जबरदस्त डान्स, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

मराठमोळ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार ह्यांनी केला जबरदस्त डान्स, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

नवरात्रीचा सण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. या नऊ दिवसात देवीची मनोभावे सेवा करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. तसेच यानिमित्ताने प्रत्येक जण यथाशक्ती तिच्याविषयी असलेली भक्ती व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. यात कलाकार ही आघाडीवर असतात. यावर्षी या मांदियाळीत अजून एका उत्तम अभिनेत्रीची भर पडली आहे. त्यांनी त्यांच्या नृत्य कलेतून देवीविषयी असलेली भक्ती व्यक्त केली आहे आणि त्यास सोशल मीडियावरही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. चला तर मग या अभिनेत्री विषयी आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाविषयी जाणून घेऊयात.

या अभिनेत्रीचं नाव आहे – विशाखा सुभेदार. होय, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या विशाखा ताई. त्यांचा तरल अभिनय, सोबत त्याला लाभलेली विनोदाच्या टायमिंगची जोड यांमुळे त्यांनी साकारलेलं प्रत्येक व्यक्तिमत्त्व, प्रत्येक कार्यक्रम आपल्या नेहमीच लक्षात राहत आला आहे. सध्या चालू असलेला, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम तर याचं प्रातिनिधीक उदाहरण म्हणायला हवा.

प्रत्येक आठवड्यात विशाखा ताई असलेलं प्रत्येक प्रहसन हे उत्तमच वठतं. त्यातील त्यांनी रंगवलेली बाबू म्हणणारी आई असो वा कर्मचाऱ्याला वैतागलेली बॉस असो त्यांच्या सगळ्या व्यक्तिरेखा आपलं मनोरंजन करून जातात. पण मनोरंजन करताना केवळ अभिनय याच एका माध्यमामार्फत त्या आपलं मनोरंजन करत नाहीत. तर कविता, नृत्य या माध्यमातून ही त्या उत्तम कलाकृती रचत असतात, त्यांचा भाग होत असतात. आज त्यांनी यातील नृत्य कलेचा आधार घेत देवीला मानवंदना दिली आहे. यात त्यांनी कोरिओग्राफर लतिका श्रीयन यांच्या सोबत कोलॅबोरेशन केलेलं दिसून येतंय. एक दोन महिन्यांपूर्वीही या जोडीने एकदा कोलॅब करत उत्तम डान्स सादर केला होताच. यंदा नवरात्रीच्या निमित्ताने ही नृत्यनिपुण जोडी पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यांनी सादर केलेला डान्स त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केलेल्या व्हिडियोत पाहता येतो. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला काळोख दिसत असतो आणि एक ओळखीची धून कानावर पडत असते. ही धून म्हणजे जोगवा चित्रपटातलं गाणं आहे हे आपण चट्कन ओळखतो.

एव्हाना व्हिडियोच्या सुरुवातीलाच जोगवा प्रकाराबद्दल सांगितलं जातं. मग आपल्या समोर येतात त्या विशाखा ताई. मग येतात त्या लतिकाजी. एव्हाना म्युझिक संपून गाण्यातील शब्द कानावर पडायला सुरवात झालेली असते. तत्क्षणी या दोघीही आपल्याला एकत्र नृत्य करताना दिसतात. गाण्याला साजेशी अशी जबरदस्त ऊर्जा, प्रसन्नता यांमुळे अगदी पहिल्या क्षणांपासून हा व्हिडियो आपल्या मनावर पकड घ्यायला सुरुवात करतो. त्यात कोणतेच प्रॉप्स न वापरता केवळ स्वतःचा लूक, अभिनय आणि नृत्य यांवर विसंबून राहत या दोघी एकदम छाप पाडून जातात. सोबतच दोघींनी प्रत्येक बिट पकडत डान्स केल्याने त्यांचा डान्स आणि गाणं अगदी हातात हात घालून पुढे जाताना दिसतं. या व्हिडियोचे एडिटर आदित्य भन्साली यांचं ही कौतुक करायला हवं. त्यांनी केलेली एडिटिंग यांमुळे हा व्हिडियो अजुन उत्साहवर्धक होतो आणि दोघींचा डान्सही अधोरेखित होतो. तसेच दोघींचा पारंपरिक लूक हा ही उत्तम आहेच. यात त्यांच्या हेअरस्टाईलिस्ट म्हणून सुलभा सोनवणे यांनी काम पाहिलं आहे. बघायला गेलं तर केवळ दोन मिनीटांचा असा हा डान्स व्हिडियो आहे. पण तरीही त्यातून मिळणारी ऊर्जा आणि प्रसन्न भाव आपल्यासोबत बराच काळ राहतात.

एकूणच काय तर या परफॉर्मन्स साठी सगळीच भट्टी जमून आली आहे असं चित्र आहे. आपल्या टीमला तर हा परफॉर्मन्स खूप आवडला. आपल्या टीमकडून विशाखा ताई, लतिकाजी आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. येत्या काळातही त्यांच्या कोलॅबोरेशन मधून उत्तमोत्तम कलाकृती आपल्या भेटीस येतील हे नक्की. आपणही हा परफॉर्मन्स पाहिला असेलच. जर नसेल पाहिला तर जरूर पहा, आपल्याला खूप आनंद देऊन जाईल.

तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तम लेख लिहीत असते. आपणही प्रत्येक वेळी त्यास प्रोत्साहन देत असता. त्यातूनच मग अजून लेखन करण्याची ऊर्जा मिळते आणि टिकून राहते. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आपली टीमही आपल्यासाठी नेहमीच उत्तमोत्तम लेखांची मेजवानी आणेल याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे न वाचलेले अन्य लेख आवर्जून वाचा. सगळेच लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *